ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद (फोटो सौजन्य-X )
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. परिणामी टिटवाळा स्थानकादरम्यान एक्सप्रेस थांबवल्यामुळे कसाऱ्याकेड जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली. अनेक लोकल गाड्या अडकून पडल्या आहेत. तसेच कल्याणकडू ते कसाऱ्याकडे वाहतूक ठप्प झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी टिटवाळा स्थानकाजवळ गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेस रखडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. इंजिनमधील बिघाड दुरूस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र यामुळे कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद आहे. तसेच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंजिन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. बिघाड दुरुस्त झाल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
‘लाइफलाइन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर गेल्या 20 वर्षांत 23 हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच विविध अपघातांमध्ये २६ हजार ५७२ प्रवासी जखमी झाले आहेत. विशेषत: पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर 15 वर्षात 29 हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर अतिरिक्त विभागीय रेल्वे प्रशासक शशी रिशन यांनी ही माहिती दिली. पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गांवर अपघातांची संख्या अधिक आहे. 2009 ते जून 2024 दरम्यान, 29,321 प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडणे, ट्रेनमधून पडणे, कोसळणे, फलाट आणि फूटबोर्डवरून पडणे इत्यादी अपघातांमुळे मृत्यू झाला.