Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Robotic Knee Replacement: मुंबईत पहिल्यांदाच महापालिका रुग्णालयात मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण; दोन शस्त्रक्रिया यशस्वी

Health News : मुंबईतील कांदिवली येथील बीडीबीए रुग्णालयाने प्रथमच दोन मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 25, 2026 | 10:05 AM
Robotic Knee Replacement: मुंबईत पहिल्यांदाच महापालिका रुग्णालयात मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण; दोन शस्त्रक्रिया यशस्वी

Robotic Knee Replacement: मुंबईत पहिल्यांदाच महापालिका रुग्णालयात मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण; दोन शस्त्रक्रिया यशस्वी

Follow Us
Follow Us:
  • खासगी रुग्णालयात सुमारे ४ लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया महापालिका रुग्णालयात मोफत करण्यात आली.
  • गुडघेदुखीने त्रस्त दोन रुग्णांवर रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वी उपचार करण्यात आले.
  • अत्याधुनिक उपचार सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा महत्त्वाचा टप्पा.
खासगी रुग्णालयात सुमारे चार लाख रुपये खर्च येणारी अत्याधुनिक रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता सर्वसामान्य रुग्णांसाठीही उपलब्ध होऊ लागली आहे. कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बीडीबीए) रुग्णालयाने पहिल्यांदाच दोन यशस्वी रोव्हेटिक पूर्णतः गुडाघा, सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत नवा टप्पा गाठला आहे. गेली आठ वर्षे दोन्ही गुडघ्यांच्या तीव्र वेदनांनी त्रस्त असलेल्या ५२ वर्षीय नागम्मा हिराना यांना चालणेही कठीण झाले होते.

‘तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटींची सुपारी, पुढील आठवड्यात…’; जितेंद्र आव्हाडांनी नेमकं काय म्हटलं?

उपचारांनंतर महिलांना मिळाली वेदनेपासून मुक्ती

गुडघ्यातील गंभीर विकृतीमुळे हिराना यांच्या पायांचा आकारही बदलला होता. आर्थिक अडचणीमुळे शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याने त्या वेदना सहन करत होत्या. बीडीबीए रुग्णालयात त्यांच्यावर रोबोटिक साहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात तंत्रज्ञानाच्या आली आणि विकृतीही पूर्णपणे दुरुस्त करण्यात आली. तसेच निर्मला कोळी या रुग्णालाही गेल्या पाच वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होता. त्यांना दोन वर्षांपासून दैनंदिन कामे करणेही कठीण झाले होते. त्यांच्यावरही मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ही कामगिरी अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. अमित धोंड आणि त्यांच्या शस्त्रक्रिया, भूलतज्ज्ञ, परिचारिका व सहाय्यक पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये

  • रोबोटिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेतील अचूकता वाढते, ऊतींचे नुकसान कमी होते, रुग्ण लवकर बरा होतो आणि उपचारांचे परिणाम अधिक चांगले मिळतात.
  • महागड्या आणि अत्याधुनिक उपचारांचा लाभआर्थिकदृष्ट्‌या दुर्बल रुग्णांनाही मिळू शकतो, हे बीडीबीए रुग्णालयाने सिद्ध करून दाखविले आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड मानला जात आहे.
Mumbai Rain News : उघड्या मॅनहोलचे वास्तव महापौरांसमोरच उघड! पाहणीदरम्यान एकजण गटारात पडला, माटुंग्यातील धक्कादायक प्रकार

वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांनी सांगितलं की, “८८ अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान हे केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम रुग्णांपुरते मर्यादित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे. रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणासारखी सुमारे चार लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया महापालिका रुग्णालयात पूर्णपणे मोफत करून आम्ही सर्वसामान्य रुग्णांसाठी नवी आशा निर्माण केली आहे”.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Free robotic knee replacement surgeries successfully performed at bdba hospital mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Government Hospital
  • Health Tips
  • lifestyle news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
2

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
4

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.