Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime News: मैदानात खेळत होता १२ वर्षीय मुलगा; मागून आले अन् मानेत इंजेक्शन टोचलं, घाटकोपरमध्ये खळबळ

मित्रांसोबत मैदानात खेळणाऱ्या १२ वर्षीय यशला पुढच्या क्षणी असा धक्का बसला की त्याला काही कळण्याआधीच मानेत इंजेक्शन टोचले गेले. काही वेळातच चक्कर आणि तापाने तो मैदानातच खाली बसला. नेमकं ते इंजेक्शन कोणतं होतं आणि मुलाला लक्ष्य का करण्यात आलं, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 06, 2026 | 05:17 PM
Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

Follow Us
Follow Us:
  • १२ वर्षीय विद्यार्थ्याच्या मानेत इंजेक्शन टोचल्याचा आरोप
  • चक्कर आणि ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल
  • पोलिसांकडून मुलाचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया
 

मुंबई: मुंबईतील घाटकोपरच्या बर्वेनगर परिसरात शाळेसमोर मित्रांसोबत खेळणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थ्याच्या मानेत काही जणांनी कथितरीत्या नशेचे इंजेक्शन टोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यश चौरसिया असे विद्यार्थ्याचे नाव असून तो बर्वेनगर येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ३ मध्ये शिकतो. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मैदानात खेळत असताना मागून आले

मिळालेल्या माहितीनुसार, यश शाळेसमोरील मैदानात मित्रांसोबत खेळत होता. या मैदानात सहा ते सात जण नशा करण्यासाठी बसत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. यश खेळत असताना याच गटातील काही जण मागून आले आणि त्यांनी त्याच्या मानेत इंजेक्शन टोचल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर काही वेळातच यशला चक्कर येऊ लागली. त्याला तापही आला आणि तो मैदानातच खाली बसला.

हेही वाचा: Kolhapur Crime: भरदिवसा गोळ्या झाडल्या, १३ वर्षांनी लागला हिशेब; हेमंत गायकवाड हत्या प्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप

प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

यशची प्रकृती अचानक बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला जवळच्या महापालिकेच्या मुक्ताबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती आहे. घटनेमुळे कुटुंबीयांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.

पोलिसांकडून जबाब नोंदवण्याची प्रक्रिया

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यशचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्या जबाबाच्या आधारे संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शाळा आणि मैदानाच्या परिसरात नशेखोरांचा वावर होत असल्याच्या तक्रारी असल्यास त्याबाबतही तपास केला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत

पालकांमध्ये भीतीचे वातावरण

अल्पवयीन विद्यार्थी खेळत असलेल्या मैदानातच अशा प्रकारची घटना घडल्याने पालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा परिसर आणि सार्वजनिक मैदानांमध्ये नशा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुलाच्या मानेत नेमके कोणते इंजेक्शन टोचण्यात आले आणि हा प्रकार का करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: Ghatkopar barvenagar 12 year old student injection incident sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Mumbai crime news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Tiger Shroff Firing Case: केवळ गोळीबार की मोठे नेटवर्क? टायगर श्रॉफ प्रकरणात प्रेयसीच्या एन्ट्रीने उडाली खळबळ!
1

Tiger Shroff Firing Case: केवळ गोळीबार की मोठे नेटवर्क? टायगर श्रॉफ प्रकरणात प्रेयसीच्या एन्ट्रीने उडाली खळबळ!

Mumbai News: हवामान बदलासाठी ‘कूल क्रायम्ब’ प्रकल्प! मुंबई विद्यापीठ-ब्रिस्टल विद्यापीठासोबत राबविणार संयुक्त मोहीम
2

Mumbai News: हवामान बदलासाठी ‘कूल क्रायम्ब’ प्रकल्प! मुंबई विद्यापीठ-ब्रिस्टल विद्यापीठासोबत राबविणार संयुक्त मोहीम

Mumbai News : ज्ञानेश कुमारांविरोधात पुन्हा एल्गार! SIR वरून मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक
3

Mumbai News : ज्ञानेश कुमारांविरोधात पुन्हा एल्गार! SIR वरून मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक

Mumbai News : मुंबईकरांनो, लक्ष द्या! 25 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी, मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा आदेश
4

Mumbai News : मुंबईकरांनो, लक्ष द्या! 25 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी, मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.