Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी सेवा मंडळाच्या ‘नवसाला पावणारा विश्वाचा राजा’ महागणपतीच्या आगमनाचे यंदा ७२ वे वर्ष आहे. गणेशोत्सवानिमित्त मंडळाने तब्बल ७०३.२७ कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले असून, महागणपतीला ६६ किलोहून अधिक सोन्याचे दागिने, ३३५ किलोहून अधिक चांदी आणि मौल्यवान रत्नांनी सजविण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 02, 2026 | 06:20 PM
जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण

जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण

Follow Us
Follow Us:
  • जीएसबीच्या महागणपतीचे यंदा ७२ वे वर्ष;
  • ‘नवसाला पावणाऱ्या विश्वाच्या राजा’ला ७०३.२७ कोटींचे विमा कवच
  • ६६ किलो सोन्याने सजणार महागणपती
GSB Ganeshotsav 2026: मुंबईमधील माटुंगा येथील किंग्ज सर्कल येथे जी.एस.बी. (गौड सारस्वत ब्राह्मण) सेवा मंडळ गणेशोत्सव अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा करते, जो भव्यता आणि कडक धार्मिक शिस्तीवर आधारित आहे. या मूर्तीला ‘नवसाला पावणारा विश्वाचा राजा’ म्हणून ओळखले जाते.

शहरातील सर्वात श्रीमंत जीएसबी गणेश सेवा मंडळ सध्या सर्व विक्रम मोडीत काढण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध जीएसबी सेवा (GSB Ganeshotsav 2026) मंडळाच्या ‘महागणपती’च्या आगमनाचे यंदा ७२ वे वर्ष साजरे केले जाणार आहे. ‘नवसाला पावणारा विश्वाचा राजा’ अशी भाविकांमध्ये श्रद्धा असलेल्या या महागणपतीच्या गणेशोत्सवाची (GSB Ganeshotsav 2026) तयारी जोरात सुरू आहे. यंदाच्या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंडळाने तब्बल ७०३.२७ कोटी रुपयांचे गणेशोत्सव विमा संरक्षण घेतले आहे.

नवसाला पावणाऱ्या ‘लालबागच्या राजा’ची स्थापना कधी झाली? जाणून घ्या गणपतीमागचा इतिहास आणि परंपरा

७०३.२७ कोटींचे विमा संरक्षण

जीएसबी सेवा मंडळाने घेतलेल्या विमा संरक्षणामध्ये गणेशोत्सवाचा मंडप, महागणपतीची मूर्ती, सोन्या-चांदीचे दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. त्याचबरोबर मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवाधारी आणि दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांच्या सुरक्षेलाही विमा संरक्षण देण्यात आले आहे. लाखो भाविक उत्सवात सहभागी होत असल्याने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी

जीएसबीच्या महागणपतीचा दागिन्यांचा थाटही यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे. जीएसबीच्या या महागणपतीला ६६ किलोहून अधिक वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३३५ किलोहून अधिक चांदी, तसेच विविध मौल्यवान रत्नांनी सजविण्यात येणार आहे. हे दागिने आणि मौल्यवान वस्तू प्रामुख्याने भाविक व सेवाधाऱ्यांकडून देणगी स्वरूपात प्राप्त झाल्याची माहिती समोर येत आहे.

१२ सप्टेंबरला ‘विराट दर्शन’

महागणपतीचा ‘विराट दर्शन’ सोहळा १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर १४ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. धार्मिक परंपरा आणि वैदिक पद्धती जपत उत्सवातील सर्व विधी पार पडणार आहेत.

दररोज ४० हजारांहून अधिक भाविकांसाठी अन्नदान

जीएसबीच्या मंडपात सरासरी एक लाखांहून अधिक भाविक आणि सेवाधारी महागणपतीला पूजा व सेवा अर्पण करतात. पूजा, अर्चना, सेवा, अन्नदान, तुलाभार आणि गणहोम यांसारखे धार्मिक विधी शास्त्रोक्त आणि वैदिक परंपरेनुसार केले जातात.

अन्नदान हे या गणेशोत्सवाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. दररोज ४० हजारांहून अधिक, तर पाच दिवसांत दोन लाखांहून अधिक भाविक अन्नदान सेवेचा लाभ घेतात. विशेष म्हणजे भाविकांना पारंपरिक पद्धतीने केळीच्या पानावर प्रसाद दिला जातो.

‘गो ग्रीन’ उपक्रमावर भर

पर्यावरण संरक्षणासाठी जीएसबी सेवा मंडळाने यंदाही ‘गो ग्रीन’ उपक्रमावर भर दिला आहे. मंडळाने पारंपरिक छापील पावत्यांऐवजी डिजिटल पद्धतीचा स्वीकार केला असून त्यामुळे कागदाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागणपतीची मूर्तीही पर्यावरणपूरक असून गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

Ganapati Special Trains: गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर! ९ सप्टेंबरपासून २६२ विशेष ट्रेन फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

Web Title: Gsb seva mandal mahaganpati ganeshotsav 2026 rs 703 crore insurance cover gold silver jewellery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Mumbai

संबंधित बातम्या

‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन
1

‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता
2

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता

नवसाला पावणाऱ्या ‘लालबागच्या राजा’ची स्थापना कधी झाली? जाणून घ्या गणपतीमागचा इतिहास आणि परंपरा
3

नवसाला पावणाऱ्या ‘लालबागच्या राजा’ची स्थापना कधी झाली? जाणून घ्या गणपतीमागचा इतिहास आणि परंपरा

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका
4

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.