Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इमारतीत जाण्यास नकार दिल्याने सुरक्षा रक्षकाला मारहाण; जिम ट्रेनरला अटक, मुंबईतील घटना

भांडूपमध्ये एका सोसायटीत ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने जिम ट्रेनरला आत जाऊ देण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग अनावर झाल्याने जिम ट्रेनरने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी जीम ट्रेनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 01, 2024 | 11:49 AM
मध्यवर्ती कारागृहात क्षमता फक्त 1800,

मध्यवर्ती कारागृहात क्षमता फक्त 1800,

Follow Us
Follow Us:

मुंबईतील भांडूपमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीत जाण्यास नकार दिल्याने जीम ट्रेनरने सुरक्षकाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जीम ट्रेनरला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. विशाल गावडे असं अटक करण्यात आलेल्या जीम ट्रेनरचं नाव आहे. तर शिवाजी बर्वे (वय ६० वर्षे) असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.

हेदेखील वाचा- मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पुढील आदेशापर्यंत राहणार बंद! काय आहे कारण, वाचा

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, एका सोसायटीत ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने जिम ट्रेनरला आत जाण्यास नकार दिला. या रागातून जिम ट्रेनरने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. या घटनेत सुरक्षा रक्षक शिवाजी बर्वे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी जीम ट्रेनर विशाल गावडे विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी बर्वे हे भांडुपच्या ड्रीम सोसायटीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. विशाल गावडे हा देखील याच सोसायटीत काही वर्षांपासून जिम ट्रेनर आहे. विशाल गावडे रात्री सोसायटीत आला असता सुरक्षारक्षक शिवाजी बर्वे यांनी त्याला आत जाण्यापासून रोखले. याच गोष्टीचा राग मनात ठेऊन जिम ट्रेनर विशाल गावडे याने सुरक्षा रक्षक शिवाजी बर्वे यांना मारहाण केली. या हल्ल्यानंतर शिवाजी बर्वे यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. यानंतर तेथे उपस्थित इतर लोकांनी गंभीर जखमी झालेल्या शिवाजी बर्वे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी जीम ट्रेनर विशाल गावडे विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- संधी सुदैवाने मिळते, मिळालेल्या संधीतून उत्तमोत्तम कार्य करावं; आमदार प्रशांत ठाकूरांचं वक्तव्य

ऑडी मालकाची कॅब ड्रायव्हरला मारहाण

घाटकोपर परिसरात ओला कॅब ड्रायव्हर आणि ऑडी कारची धडक झाली. त्यामुळे रागात असलेल्या ऑडी कारच्या मालकाने ओला कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कयामुद्दीन मैनुद्दीन कुरेशी (वय २४) असं मारहाण करण्यात आलेल्या ओला कॅब ड्रायव्हरचं नाव आहे. तर ऋषभ चक्रवर्ती असं कॅब ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या ऑडी कार मालकाचं नाव आहे.

या घटनेत ओला कॅब ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. ओला कॅब चालक नवी मुंबईतील उलवेच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ऑडी कार मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Gym trainer beats up security guard police arrested accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 11:49 AM

Topics:  

  • crime news
  • Mumbai Crime
  • Mumbai News

संबंधित बातम्या

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी
1

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
2

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
4

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.