Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Hoarding: मोठी बातमी! मुंबईत आता ४०x४० फुटांपेक्षा मोठे होर्डिंग्ज लावता येणार नाहीत; BMC ने जारी केली नवीन धोरणे

New Hoarding Policy 2025: मुंबईत आता ४०x४० फुटांपेक्षा मोठ्या होर्डिंग्जवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, इमारतीच्या छतावर आणि फुटपाथवर जाहिराती लावण्यास मनाई असून, डिजिटल होर्डिंग्जच्या चमकेवरही कठोर निर्बंध लादले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 27, 2025 | 10:24 PM
मुंबईत आता ४०x४० फुटांपेक्षा मोठे होर्डिंग्ज लावता येणार नाहीत (Photo Credit - X)

मुंबईत आता ४०x४० फुटांपेक्षा मोठे होर्डिंग्ज लावता येणार नाहीत (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • सुरक्षेसाठी BMC चा कठोर निर्णय!
  • मुंबईत आता ४०x४० फुटांपेक्षा मोठ्या होर्डिंग्जवर बंदी
  • डिजिटल जाहिरात फलकांनाही नियम
New Hoarding Policy for Mumbai: मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) क्षेत्रात जाहिरातींसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नवीन जाहिरात फलक (होर्डिंग) धोरण २०२५ (New Hoarding Policy 2025) जारी केले आहे. या नवीन धोरणानुसार, आता ४०x४० फुटांपेक्षा मोठ्या आकाराचे होर्डिंग्ज लावता येणार नाहीत.
New hoarding policy for Mumbai: The @mybmc on Wednesday released the new outdoor advertising policy, which prohibit ads on footpaths and building terraces—spaces that until now were commonly used for hoardings. The revised policy, which updates the earlier 2008 guidelines, also… — Richa Pinto (@richapintoi) November 27, 2025


नवीन होर्डिंग धोरणातील महत्त्वाचे बदल

जांच समितीच्या शिफारशीनंतर बीएमसीने या नवीन धोरणाची घोषणा केली आहे. या नवीन नियमांनुसार, भविष्यात अपघात घडण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जाहिरातींना आता परवानगी दिली जाणार नाही.

  • मुंबई शहरात आता ४०x४० फुटांपेक्षा मोठ्या आकाराच्या जाहिरात फलकांना परवानगी नसेल.
  • फुटपाथवर तसेच इमारतींच्या छतांवर जाहिराती प्रदर्शित करण्यास परवानगी नाही.
  • डिजिटल जाहिरात फलकांची (Digital Hoardings) चमक (Luminance Ratio) ३:१ च्या प्रमाणापेक्षा अधिक ठेवता येणार नाही.
  • झिलमिलणाऱ्या (Flickering) जाहिराती प्रदर्शित करण्यास परवानगी नसेल.
हे देखील वाचा: IIT बॉम्बेचे नाव बदलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाले?

या ठिकाणी जाहिरातींना परवानगी

मॉल्स, मल्टीप्लेक्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यावसायिक इमारती (Commercial Buildings) आणि पेट्रोल पंपांवर एलईडी (LED) जाहिरात फलक प्रदर्शित करता येतील. निर्माणाधीन (Under Construction) किंवा दुरुस्तीचे काम चालू असलेल्या इमारतींच्या कंपाऊंड वॉल आणि इमारतींच्या बाहेरील भागावर व्यावसायिक आणि अव्यावसायिक दोन्ही प्रकारच्या जाहिराती प्रदर्शित करता येतील.

पहिल्यांदाच ‘या’ आकाराच्या होर्डिंग्जला परवानगी

नवीन स्वरूप: महानगरपालिकेने प्रथमच काही नवीन आकारांच्या फलकांना परवानगी दिली आहे. यापुढे एकेरी (Single) आणि पाठपोट (Back to Back) फलकांसोबतच ‘व्ही’ (V) आणि ‘एल’ (L) आकार तसेच त्रिकोणी (Tri-Vision), चौकोनी (Square Vision), पंचकोनी (Pentagon Vision) आणि षटकोनी (Hexagon Vision) स्वरूपाच्या जाहिरात फलकांनाही परवानगी दिली जाईल.

बंधन: मात्र, या नवीन आकारांच्या फलकांसाठी वाहतूक पोलिसांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेणे बंधनकारक असेल.

इतर ठिकाणी जाहिरात: याव्यतिरिक्त, बांधकाम सुरू असलेल्या (Under Construction) आणि दुरुस्तीची कामे सुरू असलेल्या इमारतींच्या कुंपणावर (Compound Wall) तसेच बाह्यभागावर व्यावसायिक आणि अव्यावसायिक जाहिराती लावता येतील.

घाटकोपर दुर्घटनेनंतर कठोर निर्णय

दरम्यान, १३ मे २०२४ रोजी घाटकोपर येथे १२० स्क्वेअर फूट आकाराचे एक भलेमोठे होर्डिंग कोसळले होते. या भीषण दुर्घटनेत १७ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर ७० लोक जखमी झाले होते. या दुर्घटनेच्या सखोल चौकशीनंतर आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला नवीन जाहिरात धोरण (New Hoarding Policy) तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

हे देकील वाचा: Mumbai Traffic : मुंबईकरांची वाहतूक कोंडी कायमची फुटणार! कुर्ला ते घाटकोपर प्रवास सुसाट, BMC चा 1365 कोटींचा मेगा प्लॅन जाहीर

Web Title: Hoardings larger than 40x40 feet will no longer be allowed in mumbai bmc issues new policies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 09:14 PM

Topics:  

  • BMC
  • Hoarding Collapse
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई! ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक
1

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई! ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक

Mumbai Crime: मुंबईतील आणखी एक कॉन्सर्ट ठरला जीवघेणा; NSCI डोममध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू
2

Mumbai Crime: मुंबईतील आणखी एक कॉन्सर्ट ठरला जीवघेणा; NSCI डोममध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Vakola BKC Flyover: वकोला-BKC प्रवास अवघ्या 5-10 मिनिटांत! 98% काम पूर्ण, फ्लायओव्हर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
3

Vakola BKC Flyover: वकोला-BKC प्रवास अवघ्या 5-10 मिनिटांत! 98% काम पूर्ण, फ्लायओव्हर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

Environment News: पर्यावरणासाठी मोठे पाऊल! मुंबईतील कचरा डेपोचे होणार जंगलात रूपांतर, ‘रीरूट’ उपक्रमांतर्गत 15 हजार वृक्ष लागवड
4

Environment News: पर्यावरणासाठी मोठे पाऊल! मुंबईतील कचरा डेपोचे होणार जंगलात रूपांतर, ‘रीरूट’ उपक्रमांतर्गत 15 हजार वृक्ष लागवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.