Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena Dasara Melava : शिंदेंचा दसरा मेळावा यंदा शेतकऱ्यांसाठी; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक निघणार

Shivsena Dasara Melava : दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन मदतीचे तोरण लावावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 19, 2026 | 09:01 PM
eknath shinde farmer help

eknath shinde farmer help

Follow Us
Follow Us:

 

  • शिंदेंचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित
  • मदतीचे ट्रक रवाना होणार
  • शेतकऱ्यांच्या दारी मदतीचे तोरण बांधा, शिवसैनिकांना आवाहन
 

Shivsena Dasara Melava : राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता दसरा मेळाव्याला मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन मदतीचे तोरण लावावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

गोरेगाव येथील नेस्कोमध्ये दसऱ्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दुष्काळाच्या संकटामुळे यंदा सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी शिवसेना नेत्यांच्या भाषणाने थेट मेळाव्याला सुरुवात होईल. या मेळाव्यात शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांसाठी दिवाळीचा शिधा; मदतीचे ट्रक रवाना

दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून, शेतकरी कुटुंबांना या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे ट्रक राज्यातील विविध भागांमध्ये रवाना केले जातील. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे शिवसैनिकांना राज्यव्यापी कार्यक्रम देतील.

Shivsena Dasara Melava : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दसरा मेळाव्यातील ‘ते’ कार्यक्रम रद्द

‘शेतकऱ्यांच्या दारी मदतीचे तोरण बांधा’

दसरा मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने मुंबईत येत असतात, मात्र यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता मुंबईत येण्याऐवजी दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिकांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या दारी मदतीचे तोरण लावावे तर दसरा मेळाव्यासाठी मुंबई आणि परिसरातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत असून, दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठीही शिवसेनेच्या वतीने मदत करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांसाठी मदतनिधीचे धनादेश उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले.

‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा,’ संजय राऊतांची मोठी मागणी; पूर्णेकर हत्या अन् टायगर श्रॉफ गोळीबारावरून फडणवीसांना घेरलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा 2026 कधी आणि कुठे होणार?

    Ans: दसरा मेळावा मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे.

  • Que: यंदा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय विशेष असणार आहे?

    Ans: यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी थेट भाषणांवर भर असेल. तसेच दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे ट्रक विविध भागांत रवाना केले जाणार आहेत.

  • Que: दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना कोणती मदत दिली जाणार आहे?

    Ans: शेतकरी कुटुंबांना दिवाळीचा शिधा, महिलांना रोजगारासाठी शिलाई मशीन आणि मुलींच्या विवाहासाठी मदत दिली जाणार आहे.

Web Title: Shivsena dasara melava eknath shinde drought affected farmers help vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • Dasara Melava
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

Shivsena Dasara Melava : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दसरा मेळाव्यातील ‘ते’ कार्यक्रम रद्द
1

Shivsena Dasara Melava : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दसरा मेळाव्यातील ‘ते’ कार्यक्रम रद्द

Pradeep Purnekar Case : टायगर श्रॉफसाठी एकनाथ शिंदेंची तातडीची धाव, पण पूर्णेकरांना न्याय कधी? राम पूर्णेकरांचा उपोषणाचा इशारा!
2

Pradeep Purnekar Case : टायगर श्रॉफसाठी एकनाथ शिंदेंची तातडीची धाव, पण पूर्णेकरांना न्याय कधी? राम पूर्णेकरांचा उपोषणाचा इशारा!

Kiran Sarnaik Election Campaign : सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार – एकनाथ शिंदे
3

Kiran Sarnaik Election Campaign : सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार – एकनाथ शिंदे

Eknath Shinde : ‘मी धाडस केलं नसतं तर…’ शिवसेना बंडखोरीची आठवण काढत एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला
4

Eknath Shinde : ‘मी धाडस केलं नसतं तर…’ शिवसेना बंडखोरीची आठवण काढत एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.