
IIT बॉम्बेचे नाव बदलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान (Photo Credit - X)
“बॉम्बेचा नामोनिशान मिटायला हवा”
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विधानामध्ये नाव बदलण्याची गरज स्पष्ट केली. ते म्हणाले, “आमच्यासाठी बॉम्बे नाही, तर मुंबई आहे. बॉम्बेचे मुंबई नामकरण करण्यात भाजप नेते रामाभाई नाईक यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे IIT बॉम्बेचे नाव IIT मुंबई केले पाहिजे.” बॉम्बेचा नामोनिशान मिटायला हवा. जिथे जिथे बॉम्बे आहे, तिथे तिथे मुंबई आले पाहिजे, असेही ते म्हणाले.
“Will write letter to PM Modi, Union education Minister to change IIT Bombay’s name to IIT Mumbai.” – Maharashtra CM Devendra Fadnavis pic.twitter.com/Xfsyx5YC81 — News Arena India (@NewsArenaIndia) November 26, 2025
IIT बॉम्बेचा इतिहास
आयआयटी बॉम्बेची पायाभरणी १९५८ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. १९६१ मध्ये संसदेने या संस्थेला राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेचा (Institute of National Importance) दर्जा दिला. देशातील प्रतिष्ठित तांत्रिक महाविद्यालयांमध्ये याची गणना होते. महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबईलाही पूर्वी बॉम्बे याच नावाने ओळखले जात होते, परंतु ४ मार्च १९९५ रोजी महाराष्ट्र सरकारने त्याचे नाव अधिकृतपणे ‘मुंबई’ केले.
‘बॉम्बे’ शब्दाचा अर्थ काय?
बॉम्बे हा शब्द मूळतः पोर्तुगीजांकडून आला आहे. १६ व्या शतकात जेव्हा पोर्तुगीज भारतात आले, तेव्हा त्यांनी सात बेटांचा हा समूह पाहिला. येथे स्थानिक कोळी बांधव ‘मुंबा’ किंवा ‘महा-अंबा’ (मुंबादेवी) या देवीची पूजा करत असत. या ठिकाणी एक चांगली खाडी (Bay) देखील होती. पोर्तुगीज भाषेत “बॉम” (bom) चा अर्थ ‘चांगला’ आणि “बाहिया” (bahia) चा अर्थ ‘खाडी’ त्यामुळे पोर्तुगीजांनी या जागेला “Bombaim” किंवा “Bom Bahia” (अर्थात, ‘चांगली खाडी’) असे नाव दिले. कालांतराने त्याचे रूपांतर ‘बॉम्बे’मध्ये झाले. १९९५ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्याचे नाव ‘मुंबई’ केले.