Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक; प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेफ्टी ऑडिटचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 05, 2026 | 04:57 PM
नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक; प्रशासनाला दिले 'हे' निर्देश

नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक; प्रशासनाला दिले 'हे' निर्देश

Follow Us
Follow Us:

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेफ्टी ऑडिटचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना आणि स्वारगेट बसस्थानकावरील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली. स्वयंसेवी संस्थांमार्फत राज्यातील २४२ ठिकाणी करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिटमधील शिफारशी तातडीने आणि निश्चित कालमर्यादेत अंमलात आणाव्यात, असे स्पष्ट निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिले.

 

अहवालात बसस्थानके, रेल्वे स्थानके व सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून सीसीटीव्ही, प्रकाशव्यवस्था, महिला पोलिसांची गस्त, हेल्पलाईन, पॅनिक बटण, स्वच्छतागृहे, तक्रार नोंदणी प्रणाली आणि ‘हिरकणी कक्ष’ यांची स्थिती तपासण्यात आली. अनेक सुविधा अस्तित्वात असूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले. विशेषतः पॅनिक बटण प्रणाली कार्यक्षम नसल्याचे आढळल्याने ती नियंत्रण कक्षाशी तसेच व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाशी थेट जोडण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळेल.

डॉ. गोऱ्हे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देत शालेय बस चालक व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणे, बसस्थानकांवर सीसीटीव्ही संदर्भातील स्पष्ट फलक लावणे, पॅनिक बटणाविषयी जनजागृती वाढवणे आणि शाळांनी बस शाळेच्या आवारातच उभ्या करण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पीडित मुलींना शासकीय योजनांचा लाभ मिळतोय का याची पडताळणी करून आवश्यकतेनुसार समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र उपाययोजना आखून त्यांच्या नोंदीसाठी विशेष ॲप विकसित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच वन स्टॉप क्रायसिस सेंटरचा नियमित आढावा घेऊन प्रत्यक्ष लाभार्थींना मदत मिळते का याचे मूल्यमापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

परिवहन विभागाने ६३३ ठिकाणी सीसीटीव्ही बसविल्याची माहिती दिली असून, प्रत्येक बसस्थानकावर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आल्याचे सांगितले. शालेय बसमध्ये महिला सहाय्यक नेमणे बंधनकारक करण्यात आले असून, लवकरच सर्व बसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस आणि पॅनिक बटण प्रणाली अनिवार्य करून ती पोलीस विभागाशी जोडण्यात येणार आहे. पोलीस विभागाने शाळा सुटण्याच्या वेळेत गस्त वाढवली असून, प्रत्येक पोलीस चौकीत ‘भरोसा सेल’ कार्यरत असल्याचे स्पष्ट केले.

बैठकीस अपर पोलीस महासंचालक अश्वती दोर्जे, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, उपसचिव (शालेय शिक्षण) तुषार महाजन, कामगार कल्याण आयुक्त भास्कर मोराडे, उपायुक्त (महिला व बाल कल्याण) राहुल मोरे तसेच एस.टी. महामंडळाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी तिकोटकर, शारदा साठे, स्त्री मुक्ती परिषद आदी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

Web Title: A high level meeting on womens safety was held in mumbai under the chairmanship of neelam gorhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • dr. Neelam Gorhe
  • school bus

संबंधित बातम्या

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल
1

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
3

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित
4

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.