Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धरणग्रस्तांना मोठा दिलासा; उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 05, 2026 | 03:07 PM
धरणग्रस्तांना मोठा दिलासा; उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती

धरणग्रस्तांना मोठा दिलासा; उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती

Follow Us
Follow Us:
  • उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण नोटिसांना स्थगिती
  • धरणग्रस्तांना मोठा दिलासा
  • मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निर्णय
इंदापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला असून, त्यामुळे धरणग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच संपादित गाळपेर जमीन धरणग्रस्त शेतकऱ्यांना कराराने भाडेपट्ट्यावर देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

 

मुंबई येथे जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीत अनेक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

उजनी पाणलोट क्षेत्रातील इंदापूर, दौंड, कर्जत, करमाळा व माढा या तालुक्यांमधील सुमारे १३ हजार हेक्टर संपादित गाळपेर जमीन जाहीर प्रकटन करून धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ११ महिन्यांच्या कराराने व १२ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून जमिनीची वहीवाट करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

उजनी धरणालगत प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देऊन त्यांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच उजनी धरणालगत सुमारे ३५० हेक्टर आणि उजनी गावठाण परिसरातील २५० ते ३०० हेक्टर जागेवर प्रस्तावित पर्यटन प्रकल्पाबाबत सविस्तर अहवाल तयार होईपर्यंत कोणतीही पुढील कार्यवाही करू नये, असा निर्णयही घेण्यात आला आहे.

याशिवाय उजनी कॉलनी परिसराला स्वतंत्र गावठाण किंवा स्वतंत्र महसूल सजा देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर पुणे येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात धरणग्रस्त शेतकऱ्यांसोबत सविस्तर बैठक घेण्याचे ठरले असून, उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा : पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

Web Title: The government has decided to immediately suspend the encroachment removal notices in the ujani watershed area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Ujni

संबंधित बातम्या

दौंड तालुक्यात भेसळयुक्त गुळाचा काळा धंदा, दारूसाठी परराज्यात पुरवठा; विनापरवाना गुऱ्हाळांवर कारवाईची मागणी
1

दौंड तालुक्यात भेसळयुक्त गुळाचा काळा धंदा, दारूसाठी परराज्यात पुरवठा; विनापरवाना गुऱ्हाळांवर कारवाईची मागणी

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला; जुन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड
2

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला; जुन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड

‘मुंढे साखर आयुक्त झाल्यास कारखानदार सरळ होतील’, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ पंढरपुरात दूध अभिषेक; शेतकऱ्यांचा मोठा दावा
3

‘मुंढे साखर आयुक्त झाल्यास कारखानदार सरळ होतील’, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ पंढरपुरात दूध अभिषेक; शेतकऱ्यांचा मोठा दावा

मोसंबीला ‘मिठाईचा दर्जा’ द्या! दर मिळत नसल्याने आर्थिककोंडी; मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी
4

मोसंबीला ‘मिठाईचा दर्जा’ द्या! दर मिळत नसल्याने आर्थिककोंडी; मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.