Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC News : राज्यातील अवैध वाहतुकीमुळे एसटी संकटात? अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

राज्यात अवैध वाहतूक वाढल्याने एसटी महामंडळाला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसत आहे. या प्रकरणात अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवरही गंभीर आरोप होत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 26, 2026 | 11:24 AM
राज्यातील अवैध वाहतुकीमुळे एसटी संकटात; अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह (फोटो सौजन्य-ChatGPT)

राज्यातील अवैध वाहतुकीमुळे एसटी संकटात; अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • राज्यात अवैध वाहतूक अजूनही बेधडक सुरू
  • एसटी आणि आर.टी.ओ. विभागाने संयुक्त मोहीम राबवली नाही
  • राज्यात आजही हजारो अवैध छोटी वाहने
मुंबई : राज्यातील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला हादरा देणारी अवैध वाहतूक अजूनही बेधडक सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून एसटी आणि आर.टी.ओ. विभागाने संयुक्त मोहीम राबवली नाही, तर सुरू असलेल्या कारवाया केवळ दिखाऊ ठरतील, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

अलीकडेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी एसटी आणि आर.टी.ओ. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, स्थानिक स्तरावर या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा पातळीवरील एसटी अधिकारी आर.टी.ओ.ने केलेल्या कारवाईची आकडेवारी स्वतःच्या नावावर मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयात सादर करीत असून त्यामुळे ही कारवाई केवळ मर्यादित राहिल्याचे स्पष्ट होत आहे .राज्यात आजही हजारो अवैध छोटी वाहने तसेच काही परवानाधारक वाहनेही नियमांचे उल्लंघन करत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करत आहेत. परवानगी नसताना सुरू असलेल्या टप्पे वाहतुकीमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील सुमारे ३५ टक्के मार्ग या अवैध वाहतुकीमुळे प्रभावित झाले असल्याचा दावाही बारगे यांनी केला आहे.

Ashok Kharat Case : वर्षातून तीनदा परदेशात जाऊन पूजा केल्यास भरभराट; खरात मारायचा मोठमोठ्या थापा

चालू आर्थिक वर्षात एसटी महामंडळाला सुमारे १२००० कोटी रुपये इतके उत्पन्न मिळणार असल्याचे आता पर्यंतच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले असून फक्त ७५० कोटी रुपयांची तूट होईल असा अंदाज आहे. मात्र, या ३५ टक्के प्रभावित मार्गांवर काटेकोर नियोजन करून आणि संयुक्त कारवाई केली तर उपलब्ध साधनसामग्री व मनुष्यबळाच्या जोरावर एसटी महामंडळाला नफ्यात आणणे शक्य असल्याचा विश्वासही बरगे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून त्याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. खासगी वाहने, ट्रॅव्हल्स, जीप, टेम्पो आदींमधून बेकायदेशीररीत्या प्रवासी वाहतूक केली जात असल्याने एसटीच्या नियमित प्रवाशांची संख्या घटत आहे. परिणामी, महसूल कमी होत असून महामंडळाचा तोटा वाढत चालला आहे.

ग्रामीण व दुर्गम भागात एसटी हीच मुख्य वाहतूक सेवा असताना, अवैध वाहतूक स्वस्त दर आणि तत्काळ उपलब्धतेमुळे प्रवासी त्याकडे वळत आहेत. मात्र या वाहनांमध्ये सुरक्षेचे कोणतेही निकष पाळले जात नसल्याने अपघातांचा धोका अधिक वाढतो. तसेच कर व नियमांचे पालन न केल्याने शासनालाही महसुली तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर एसटी अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचे आरोप होत असून, अवैध वाहतुकीवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. योग्य नियोजन, तपासणी मोहिमा आणि कठोर अंमलबजावणी केल्यासच या समस्येवर नियंत्रण मिळवता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Aghori Puja Claims: राष्ट्रवादीवर ताबा मिळवण्यासाठी पटेल-तटकरेंकडून काळी जादू, खरातचा सहभाग? रोहित पवारांचा आरोप

Web Title: Illegal transport in maharashtra hits st revenue officials accused of inaction news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.