Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूर कुठं आणि किती येणार हे आता आधीच समजणार; टेक्नॉलॉजीने केली कमाल

सध्या हे मॉडेल दक्षिण भारतातील पश्चिम घाट आणि किनारी भागांसाठी विकसित करण्यात आले असले, तरी आवश्यक पुनर्प्रशिक्षण आणि स्थानिक भौगोलिक घटकांचा समावेश केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 07, 2026 | 08:40 AM
जिल्हा अतिवृष्टीच्या संकटात असतानाच सार्वजनिक बांधकाम अधिकारी गेले सहलीवर; नागरिकांमधून संताप

जिल्हा अतिवृष्टीच्या संकटात असतानाच सार्वजनिक बांधकाम अधिकारी गेले सहलीवर; नागरिकांमधून संताप

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात सलग चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गावांचा संपर्क तुटणे, रस्ते पाण्याखाली जाणे आणि नागरिकांचे स्थलांतर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी पूर नेमका कुठे येईल आणि पाणी किती साचू शकते, याचा अचूक अंदाज देणारे आयआयटी मुंबईने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मॉडेल आपत्ती व्यवस्थापनासाठी मोठे वरदान ठरण्याची शक्यता आहे.

हवामान अभ्यास या आंतरविद्याशाखीय कार्यक्रमंतर्गत हे तयार करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईचे डॉ. कशिश साधवानी आणि प्रा. टी. आय. एल्दो यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आलेली ही दुहेरी मशीन लर्निंग प्रणाली उपग्रहावरील सेंटिनेल-१ रडार डेटा, जमिनीची समुद्रसपाटीपासूनची उंची आणि भौगोलिक माहितीचा वापर करून ३० मीटर रिझोल्यूशनवर तब्बल ९३ टक्के अचूकतेने पूरप्रवण क्षेत्रांची ओळख करू शकते.

पुणे, मुंबई, पालघरसह काही जिल्ह्यांतील शाळांना आज पुन्हा सुट्टी; अनेक ठिकाणी पावसाचा हाहा:कार

विशेष म्हणजे ही प्रणाली केवळ पूराचा इशारा देत नाही, तर त्या ठिकाणी पाणी किती खोलीपर्यंत साचेल, याचाही अंदाज वर्तवते. त्यामुळे बचावकार्य, नागरिकांचे स्थलांतर, रुग्णालये, शाळा आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण, यासाठी प्रशासनाला वेळेत निर्णय घेणे शक्य होणार आहे. पूराचा अंदाज बांधण्यासाठी केवळ पावसाचे प्रमाण हा निकष पुरेसा नसून, जमिनीवरून वाहणारे पृष्ठभाग वाह हा अधिक निर्णायक घटक आहे.

महत्त्वाचे शस्त्र ठरणार

सध्या हे मॉडेल दक्षिण भारतातील पश्चिम घाट आणि किनारी भागांसाठी विकसित करण्यात आले असले, तरी आवश्यक पुनर्प्रशिक्षण आणि स्थानिक भौगोलिक घटकांचा समावेश केल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील पूरप्रवण भागांसाठीही ते प्रभावीपणे वापरता येऊ शकते, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

पुराचाच नाहीतर पाण्याचाही मिळणार अंदाज

हे मॉडेल केवळ पूर येईल की नाही, एवढेच सांगत नाही; तर पाणी किती साचेल, याचाही अंदाज देत असल्याने आपत्तीपूर्व नियोजन, संसाधनांचे वाटप आणि बचावकार्यात मोठी मदत होऊ शकते.

– कशिश साधवानी, आयआयटी, मुंबई

Web Title: It will now be possible to know in advance where and to what extent floods will occur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Rain News
  • Water Issue

संबंधित बातम्या

महत्त्वाची बातमी ! पुण्यातील बहुतांश भागांत गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी
1

महत्त्वाची बातमी ! पुण्यातील बहुतांश भागांत गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद; शुक्रवारीही कमी दाबाने पाणी

राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…
2

राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
3

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…
4

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.