Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: पुणे, मुंबई, पालघरसह काही जिल्ह्यांतील शाळांना आज पुन्हा सुट्टी

Maharashtra Breaking News: रत्नागिरी जिल्ह्यातील शाळाही मंगळवारी बंद राहणार आहेत. पालघर जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 07, 2026 | 06:37 PM
Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India

Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. सध्या देशभरात पावसाचा हाहा:कार पाहिला मिळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. असे असताना आता पुणे जिल्ह्याच्या काही भागाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि आंबेगाव तालुक्यातील म्हणजेच सह्याद्री घाट परिसरातील शाळा उद्याही बंद राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील इतर तालुके आणि पुणे शहरातील शाळा मात्र सुरूच राहणार आहेत. नवी मुंबई महापालिका परिसरातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील शाळाही मंगळवारी बंद राहणार आहेत. पालघर जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे.

The liveblog has ended.
  • 07 Jul 2026 06:34 PM (IST)

    07 Jul 2026 06:34 PM (IST)

    बारामती ॲग्रोला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची ‘कारणे दाखवा’

    बारामती, प्रप्रतिनिधी : इंदापूर तालुक्यातील शेळफळगडे येथील बारामती ॲग्रो लिमिटेड या आमदार रोहित पवार यांच्या साखर कारखान्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये कारखान्याला ७ दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४ व वायू (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ अंतर्गत कोणतीही पूर्वसूचना न देता कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • 07 Jul 2026 06:24 PM (IST)

    07 Jul 2026 06:24 PM (IST)

    आयर्लंडकडून पराभव, इंग्लंडविरुद्धही नांगी टाकली; आज न जिंकल्यास Shreyas Iyer च्या कॅप्टन्सीवर लागणार डाग

    India Vs england 3rd T20 Match Live Updates: आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 3 रा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता हा सामना सुरू होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आज भारतीय संघ खेळणार आहे. आज भारताला जिंकणे क्रमप्राप्त असणार आहे. आजचा सामना भारत हरल्यास श्रेयस अय्यरच्या नावावर एक रेओकर्द नोंदनवला जाणार आहे.

  • 07 Jul 2026 06:13 PM (IST)

    07 Jul 2026 06:13 PM (IST)

    Vikram Solar चा तामिळनाडूमध्ये नवा मेगा प्लांट, पहिल्या सोलर मॉड्युलचे यशस्वी उत्पादन; 1500 जणांना मिळणार रोजगार

    भारतातील आघाडीच्या सौर पीव्ही मॉड्यूल उत्पादकांपैकी एक असलेल्या विक्रम सोलरने आज तामिळनाडूतील गंगैकोंडन येथे आपल्या नव्या उत्पादन प्रकल्पाच्या औपचारिक उदघाटनाची घोषणा केली आहे. या प्रकल्पामध्ये पहिल्या सौर मॉड्यूलचे यशस्वीरित्या उत्पादनही करण्यात आले आहे. गेल्या दोन दशकात, विक्रम सोलरने भारतातील सौर मॉड्यूल उत्पादनातील सर्वात विश्वसनीय कंपन्यांपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक नवीन प्रकल्पाच्या उभारणीसोबत आपल्या तांत्रिक क्षमतेचा विस्तारसुध्दा केला आहे.

  • 07 Jul 2026 06:05 PM (IST)

    07 Jul 2026 06:05 PM (IST)

    दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

    राहुरी : अन्न व औषध प्रशासनाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मंचर (जि. पुणे) येथे करून दूध भेसळीतील मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. कृत्रिम दूध निर्मितीच्या संशयातून २६ संशयितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचे धागेदोरे अहिल्यानगरपर्यंत पोहोचले असून तिघांना ताब्यात घेतले आहे. मंचरच्या कारवाईत पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव आदी ठिकाणचे आरोपी समोर आले आहेत. या २६ आरोपींपैकी राहुरी तालुक्यातील तीन आणि नगर तालुक्यातील वाळकी येथील एक असे चौघे अहिल्यानगरचे आहेत.

  • 07 Jul 2026 05:10 PM (IST)

    07 Jul 2026 05:10 PM (IST)

    भारताचा 'सबका साथ, सबका विकास' मंत्रावर विश्वास; इंडोनेशियाच्या संसदेत PM मोदींचा मोठा संदेश

    PM Modi Indonesia Visit : जकार्ता : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर असून मंगळवारी (०७ जुलै) त्यांनी इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत-इंडोनेशिया मैत्री, लोकशाही, विकास आणि दोन्ही देशांतील संस्कृती संबंधावर भाष्य केले. आपल्या भाषणात त्यांनी संसदेत मिळालेल्या स्वागताबद्दल आणि इंडोनेशियाच्या सरकार आणि नागरिकांचे आभार मानले. तसेच पंतप्रधानांनी भारताच्या सबका साथ, सबका विकास मंत्राचा इंडोनेशियाच्या संसदेत उल्लेख केला. वाचा सविस्तर

  • 07 Jul 2026 05:05 PM (IST)

    07 Jul 2026 05:05 PM (IST)

    Ram Mandir Donation Scam: ‘चंपत राय यांचा हेतू निर्विवाद, पण…’; गोविंद देव गिरी यांचे मोठे विधान

    Ram Mandir Donation Scam: अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरातून राम भक्तांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या दान चोरी प्रकरणाच्या तपासादरम्यान नवनवीन खुलासे आणि विधाने वेगाने समोर येत आहेत. राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीनंतर, गोविंद देव गिरी यांनी चोरीसंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी सांगितले की, ट्रस्टचा अंतर्गत विश्वास आहे की चंपत राय यांचा या प्रकरणात कोणत्याही प्रकारे सहभाग नाही आणि त्यांचे हेतू निर्विवाद आहेत. असं गिरी यांनी म्हटंल आहे. वाचा सविस्तर

  • 07 Jul 2026 05:00 PM (IST)

    07 Jul 2026 05:00 PM (IST)

    अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पूरपरिस्थिती, 1500 नागरिकांची सुटका; तर तब्बल…

    पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहराला झोडपून काढणाऱ्या मुसळधार अतिवृष्टीमुळे थेरगाव, चिंचवडसह शहराच्या विविध भागांत भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी अहोरात्र युद्धपातळीवर बचावकार्य राबवले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत सुमारे १,५०० नागरिकांची बोटींच्या सहाय्याने सुखरूप सुटका केली असून, ५,००० हून अधिक पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. वाचा सविस्तर

  • 07 Jul 2026 04:55 PM (IST)

    07 Jul 2026 04:55 PM (IST)

    पुणेकरांसाठी दिलासा; खडकवासला 81 टक्के भरले, विसर्ग सुरू

    Pune Rain/Khadakwasla Dam: गेल्या दोन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. घाटमाथा आणि पुणे जिल्ह्यात देखील प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू आहे, मात्र आटा एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे लवकरच धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

  • 07 Jul 2026 04:50 PM (IST)

    07 Jul 2026 04:50 PM (IST)

    राम मंदिर देणगी चोरीप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी

    राम मंदिर देणगी चोरीप्रकरणी न्यायालयाने लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा आणि करुणेश पांडे या तिन्ही आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    Police have been granted a one-day custody remand of the three accused - Lavkush Mishra, Anukalp Mishra and Karunesh Pandey - in connection with the Ram Temple donation theft case pic.twitter.com/yoMeBWuxAi

    — IANS (@ians_india) July 7, 2026

  • 07 Jul 2026 04:45 PM (IST)

    07 Jul 2026 04:45 PM (IST)

    नवभारत कॉन्क्लेव्हच्या मंचावर भूमी पेडणेकरने मांडली रोखठोक मते

    Bhumi Pednekar in Navbharat Viksit Bharat Leadership Conclave: ‘नवभारत’ या आघाडीच्या माध्यम समूहाने आयोजित केलेल्या ‘विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये, अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने विकसित भारत, महिला सक्षमीकरण, मानसिक आरोग्य आणि हवामान बदल यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आपली मते मांडली. विकसित भारत घडवण्यात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यांना वगळून देश प्रगती करू शकत नाही, असे तिने नमूद केले. आजच्या काळात मानसिक आरोग्य हे एक मोठे आव्हान बनले आहे, असे भूमी पेडणेकरने अधोरेखित केले. सोशल मीडियावरील वाढते ‘ट्रोलिंग’ आणि मुलांकडे केवळ एक ‘वस्तू’ म्हणून पाहण्याची वृत्ती यांचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. महिला आणि मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भक्कम सामाजिक आणि संस्थात्मक चौकटीची गरज असल्याचे तिने प्रतिपादन केले. वाचा सविस्तर

  • 07 Jul 2026 04:40 PM (IST)

    07 Jul 2026 04:40 PM (IST)

    पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मोठा हल्ला; किमान ९ पोलीस कर्मचारी ठार

    पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात एका पोलीस चौकीवर भीषण हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ९ पोलीस कर्मचारी ठार झाले असून, पाच जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर परिसरातील सुरक्षा यंत्रणांना 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले असून शोधमोहीम सुरू आहे. संबंधित परिसर सील करण्यात आला आहे.

     

  • 07 Jul 2026 04:35 PM (IST)

    07 Jul 2026 04:35 PM (IST)

    केळघर येथील रामजीबुवापूलावरील वाहतुक पूर्ववत

    मेढा : दोन दिवसांपासून जावळीत संततधार पाऊस असल्याने केळघर येथील वेण्णा नदीवर बांधण्यात आलेला रामजीबुवा पुलाच भराव काही प्रमाणात खचला होता. मात्र बांधकाम विभागाकडून तात्काळ या ठिकाणी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली असून, या पुलावरील वाहतूक सोमवारी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

  • 07 Jul 2026 04:30 PM (IST)

    07 Jul 2026 04:30 PM (IST)

    हिंदुत्ववादी प्रोपोगंडाच्या आरोपांवर प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

    मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटांवर अनेकदा हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रचार केल्याचे आरोप झाले आहेत. मात्र, या आरोपांवर आता प्रवीण तरडे यांनी स्पष्ट भूमिका मांडत सडेतोड उत्तर दिलं आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 07 Jul 2026 04:16 PM (IST)

    07 Jul 2026 04:16 PM (IST)

    नवभारत कॉन्क्लेव्हमध्ये नितीन गडकरींनी सांगितला देशाचा पैसा वाचवण्याचा महाप्लॅन

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज, मंगळवारी ६ जुलै रोजी दिल्ली येथे देशातील आघाडीचा माध्यम समूह ‘नवभारत’ द्वारे आयोजित ‘विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये सहभाग घेतला. इथेनॉलबाबत बोलताना गडकरी यांनी नमूद केले की, देश २३ लाख कोटी रुपयांचे इंधन आयात करतो, म्हणजेच ही रक्कम देशाबाहेर जाते.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 07 Jul 2026 04:00 PM (IST)

    07 Jul 2026 04:00 PM (IST)

    FRAME Marathi Movie : जग कॅमेरा पलीकडचं… नागराज मंजुळेंचा नवा चित्रपट ‘फ्रेम’! ‘या’ तारखेपासून पाहता येणार ZEE 5 वर

    नागराज मंजुळे यांचा नवा सिनेमा ‘Frame’ ZEE5 वर भेटीला येत आहे. 10 जुलैपासून हा सिनेमा OTT वर पाहता येणार आहे. दरम्यान, सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यामुळे सिनेप्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘फ्रेम’ हा सिनेमा दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील छायाचित्रकारांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांच्या विचारसरणीतील फरक, काम करण्याची शैली आणि बदलत्या काळातील दृष्टिकोन यांवर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा आहे. वाचा सविस्तर

  • 07 Jul 2026 03:55 PM (IST)

    07 Jul 2026 03:55 PM (IST)

    पोर्तुगालमध्ये वणव्याचा कहर

    पोर्तुगालमध्ये भीषण उष्णता आणि जंगलातील वणव्यांनी मोठे संकट निर्माण केले आहे. यंदा ४,५९२ आगीच्या घटना घडल्या असून यामध्ये आतापर्यंत ३०,१५५ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. परिस्थिती गंभीर असल्याने देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. १२ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे.

    WORLD WEATHER NEWS DEVASTATING WILDFIRES CONTINUE TO RAVAGE SOUTHERN EUROPE

    Good morning everyone,

    The wildfire situation across southern Europe continues to deteriorate, with firefighters battling around the clock as huge blazes tear through forests, grassland and… pic.twitter.com/vtq0Bm2IAE

    — Kernow Weather Team (@KWTWeather) July 7, 2026

  • 07 Jul 2026 03:50 PM (IST)

    07 Jul 2026 03:50 PM (IST)

    क्रिकेटविश्व हादरलं! Team India मध्ये घडामोडींना वेग; ‘हा’ खेळाडू असणार नवा हेड कोच, कारण काय?

    Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 5 टी सामने आणि 3 वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात व्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पाहणार आहेत. वाचा सविस्तर

  • 07 Jul 2026 03:45 PM (IST)

    07 Jul 2026 03:45 PM (IST)

    आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवसांपैकी एक - पंतप्रधान मोदी

    पंतप्रधान मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित केले. त्यांनी म्हटले की, इंडोनेशियातील नागिरकांनी, लहान मुले, महिला, आणि तरुणींना समाविष्ट असलेला हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस बनवला आहे. त्यांनी सांगितले की, इंडोनेशियातील लोकांनी त्यांचे ज्या प्रेमाे स्वागत केले ते कधीच विसरु शकत नाहीत.

    #WATCH | जकार्ता: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इंडोनेशिया की संसद को संबोधित करते हुए कहा, "इनडोनेशिया के लोगों ने, यहां के बच्चों, महिलाओं, युवाओं ने आज के दिन को मेरे जीवन के सबसे यादगार दिनों में से एक बना दिया है। आज की सुबह जिस तरह इनडोनेशिया के लोगों ने मुझे अपना प्रेम… pic.twitter.com/IlqUC2SZRz

    — ANI_HindiNews (@AHindinews) July 7, 2026

  • 07 Jul 2026 03:40 PM (IST)

    07 Jul 2026 03:40 PM (IST)

    Anand Mahindra यांची मोठी भविष्यवाणी! बदलत्या जगात भारताची महत्त्वाची भूमिका, बनेल Connector Economy

    सध्याच्या काळात भारताचा आर्थिक दर्जा जागतिक स्तरावर विस्तारत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात भारत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. या सगळ्या अनुषंगाने महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी भारताच्या भविष्याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा अर्थ काय? आणि जागतिक स्तरावर भविष्यात भारताची भूमिका काय असणार आहे? सविस्तर जाणून घेऊयात.

  • 07 Jul 2026 03:35 PM (IST)

    07 Jul 2026 03:35 PM (IST)

    ‘भारतीय आयुर्वेदाने होणार जगाचे कल्याण…’, नवभारत कॉन्क्लेव्हमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा मोठा दावा

    Prataprao Jadhav in Navbharat Viksit Bharat Leadership Conclave 2026: देशातील आघाडीचा माध्यम समूह असलेल्या ‘नवभारत ग्रुप’तर्फे आयोजित ‘नवभारत विकसित भारत कॉन्क्लेव्ह’ची (Navbharat Viksit Bharat Conclave) पहिली आवृत्ती ७ जुलै २०२६ रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. या परिषदेत देशाचा विकास आणि भविष्यातील योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. परिषदेच्या दुसऱ्या सत्रात आरोग्य आणि कुटुंब कल्याण या विषयांवर सखोल चर्चा झाली. आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे या कार्यक्रमातील प्रमुख उपस्थित होते. त्यांनी भारतात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा आणि आयुष मंत्रालयाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आयुष मंत्रालयाने भारताच्या पारंपरिक उपचार पद्धतींची ताकद ओळखली आहे आणि त्यांना राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे जागतिक स्तरावर नेले आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मंत्री जाधव यांनी अधोरेखित केले. वाचा सविस्तर

  • 07 Jul 2026 03:30 PM (IST)

    07 Jul 2026 03:30 PM (IST)

    इराणबाबत पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिका नाराज

    पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची प्रशंसा केली. तसेच त्यांनी कोणत्याही परिस्थिती पाकिस्तान इराणच्या पाठीशी उभा राहिले असे जाहीर केले. त्यांच्या या विधानानंतर अमेरिकेकेचे  रिपब्लिकन सिनेटर रिक स्कॉट यांनी नारीज व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, जगाने पाकिस्तानचे खरे स्वरूप विसरू नये. हा तोच देश आहे जिथे अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेन अनेक वर्षे लपून राहिला होता.

    We need to remember who Pakistan really is in the middle of all this.

    We’re talking about a country where bin Laden hid out for a decade, where they selectively enforce lopsided blasphemy laws to persecute Christians, and where the Prime Minister just praised the genocidal mass… https://t.co/7SRIGGwyI1

    — Rick Scott (@SenRickScott) July 6, 2026

  • 07 Jul 2026 03:25 PM (IST)

    07 Jul 2026 03:25 PM (IST)

    पालखीसाठी उभारलेल्या सुविधांवर पाणी; अन्नदानासह स्वागत मंडप अन् आरोग्य केंद्र गेले वाहून

    पिंपरी : पुण्यासह राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री. तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले असून, बुधवारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. मात्र सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून, पालखी सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या अनेक सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. वाचा सविस्तर

     

  • 07 Jul 2026 03:20 PM (IST)

    07 Jul 2026 03:20 PM (IST)

    भरधाव कारने १० जणांना उडवले

    नवी मुंबई: नवी मुंबई येथून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. तळोजा सेकटोर १० मध्ये भीषण अपघात झाला असून कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारचालकाने 8 ते 10 जणांना उडवले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी आहेत. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. नेमकं काय घडलं?

  • 07 Jul 2026 03:15 PM (IST)

    07 Jul 2026 03:15 PM (IST)

    मॅक्रॉन यांच्या सीरिया दौऱ्यात भीषण स्फोट

    Macron Syria Visit News in Marathi : दमास्कस : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सध्या सीरियाच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राजधानी दमास्कसमध्ये झालेल्या भीषण स्फोटांमुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन वास्तव करत असलेल्या हॉटेलबाहेर दोन जोरदार स्फोट घडल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात १८ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. वाचा सविस्तर

  • 07 Jul 2026 03:10 PM (IST)

    07 Jul 2026 03:10 PM (IST)

    ‘आज भारत अमेरिकेच्याही पुढे…’, नवभारत कॉन्क्लेव्हमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले ‘विकसित भारताचे’ ३ महामंत्र

    Jyotiraditya Scindia in Navbharat Viksit Bharat Leadership Conclave: देशातील आघाडीचा माध्यम समूह असलेल्या ‘नवभारत’ने आज, मंगळवारी, ६ जुलै रोजी राजधानी दिल्लीत आयोजित केलेल्या ‘विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये केंद्रीय मंत्र्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात बोलताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नमूद केले की, कोणत्याही राष्ट्राच्या इतिहासात किंवा प्रवासात तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यांनी या गोष्टी ‘दूरदृष्टी’ (व्हिजन), ‘नेतृत्व’ आणि ‘अंमलबजावणीची क्षमता’ अशा असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताकडे या तिन्ही गोष्टी आहेत, हे भारताचे भाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक दशकांपासून मागे राहिलेल्या आणि संधींपासून वंचित असलेल्या देशाला पंतप्रधान मोदींनी नवी दिशा दिली, असेही त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर

  • 07 Jul 2026 03:05 PM (IST)

    07 Jul 2026 03:05 PM (IST)

    ‘कॉकरोच जनता पार्टी’चे X खाते पूर्ववत होणार

    Delhi high Court on CJP: दिल्ली उच्च न्यायालयाने कॉकरोच जनता पार्टीचे ट्विटर एक्स खाते पूर्ववत करण्याचे आदेश देत केंद्र सरकारला धक्का दिला आहे. सीजेपीने सोशल मिडीयावर सरकारविरोधात आंदोलन सुरू केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच लाखो फॉलोवर्स वाढले होते. पण केंद्र सरकारने अचानक सीजेपीचे एक्स खाते ब्लॉक करण्याचा आदेश दिला. त्यानंतर हे खाते बंद करण्यात आले. पण केंद्र सरकारचा आदेश रद्द करत न्यायालयाने, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील अशा निर्बंधांची कायदेशीर आधारावर तपासणी केली पाहिजे, असा निर्वाळा दिला. नीट (NEET) पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ब्लॉक करण्यात आलेले कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरील निर्बंध हटवण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. वाचा सविस्तर

     

  • 07 Jul 2026 03:00 PM (IST)

    07 Jul 2026 03:00 PM (IST)

    जम्मू-काश्मीरमध्ये पूर आणि दरडी कोसळल्याने मोठे नुकसान

    जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील 'थाथरी' (Thathri) भागात अचानक भयानक पूर आला असून अनेक दरडी कोसळल्या आहेत. यामुळे अनेक घरे व दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर परिसरातील नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून, सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

     

    #WATCH | डोडा, जम्मू-कश्मीर: डोडा के ठाठरी में अचानक आई बाढ़ और भूस्खलन से कई दुकानें और घर बुरी तरह क्षतिग्रस्त हो गए हैं। pic.twitter.com/SUBQxsLVpK

    — ANI_HindiNews (@AHindinews) July 7, 2026

  • 07 Jul 2026 02:59 PM (IST)

    07 Jul 2026 02:59 PM (IST)

    सरकारचा मोठा यू-टर्न? पेट्रोलमध्ये 25% इथेनॉल मिश्रणाचा निर्णय लांबणीवर?

    भारतात पेट्रोलमध्ये २५% इथेनॉल मिश्रणाच्या E25 प्रस्तावित निर्णयाला वाहनधारक आणि ऑटोमोबाईल क्षेत्राकडून होणारा विरोध पाहता, सरकारने हा निर्णय तूर्तास पुढे ढकलण्याचे संकेत दिले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या E20 पेट्रोलच्या सर्व्हेमधील ग्राहकांच्या तीव्र नाराजीनंतर सरकारने हा पाऊल मागे घेतल्याची चर्चा आहे.

  • 07 Jul 2026 02:50 PM (IST)

    07 Jul 2026 02:50 PM (IST)

    नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेला

    नाशिक परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पहिने भिलमाळ रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला पूल वाहून गेला आहे. नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या खालीपर्यंत गोदावरीच्या पुराचे पाणी पोहोचलं आहे. पाण्याची पाणी वाढत आहे.

  • 07 Jul 2026 02:42 PM (IST)

    07 Jul 2026 02:42 PM (IST)

    पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

    पुढील तीन तासांत पुणे परिसरात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता हवामाना विभागाने व्यक्त केली आहे.

  • 07 Jul 2026 02:31 PM (IST)

    07 Jul 2026 02:31 PM (IST)

    मानाच्या पालख्यांना, वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट

    आषाढीवारी मधील १० मानाच्या पालख्या ज्या मार्गावरुन जातात त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग/राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना, वारकरी तसेच भाविकाच्या वाहनांना पथकरातून सूट देणेबाबत सार्वजनिकबांधकाम विभागाचे परिपत्रक जारी.

  • 07 Jul 2026 02:20 PM (IST)

    07 Jul 2026 02:20 PM (IST)

    आमचं आंदोलन मोठं होऊ नये म्हणून ढगफुटीची अफवा - हर्षवर्धन सपकाळ

    आमचं आंदोलन मोठं होऊ नये म्हणून ढगफुटीची अफवा पसरविण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विषय भरकटवून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुलतानी संकट आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज नाशिक येथे केली.

  • 07 Jul 2026 02:11 PM (IST)

    07 Jul 2026 02:11 PM (IST)

    काँग्रेस आमदाराच्या घरात दिवसाढवळ्या चोरी, चोरटे जेरबंद

    उमरेडचे काँग्रेस आमदार संजय मेश्राम यांच्या घरात दिवसाढवळ्या चोरी झाली आहे. रोख रकमेसह सह्या केलेले धनादेश चोरट्यांनी लांबविले. बँकेतून पैसे काढत असतानाच चोरट्यांना पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • 07 Jul 2026 02:00 PM (IST)

    07 Jul 2026 02:00 PM (IST)

    गुंतवणकूदारांनो लक्ष द्या! शेअर बाजारात धमाका होणार

    शेअर बाजारात सध्या IPO चा मोठा धमाका पाहायला मिळत आहे. जगभरातील मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनी करत असलेल्या ग्लोबल रोडशो आणि बैठका घेतल्या जात आहेत. सप्टेंबरमध्ये या IPO चा डेब्यू होणार आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPO च्या शुभारंभाची तयारी जोरात सुरू आहे. औपचारिक मार्केटिंग प्रोसेस पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. मार्केटमध्ये येताच हा IPO चांगलाच धुंवा उडवणार आहे. आम्ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE च्या आयपीओबद्दल बोलत आहोत, ज्याला आता एक मोठे अपडेट समोर येत आहे.

  • 07 Jul 2026 01:55 PM (IST)

    07 Jul 2026 01:55 PM (IST)

    बेल्जियमची दमदार खेळी! अमेरिकेला 4-1 ने लोळवत Quarter Final मध्ये धमाकेदार एंट्री

    बेल्जियमने फिफा विश्वचषक २०२६ मध्ये यजमान अमेरिकेला ४-१ ने पराभूत करून उत्कृष्ट कामगिरी केली. या विजयासह बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिएटल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बेल्जियमने सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्चस्व गाजवले आणि अमेरिकेला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. आता बेल्जियमचा सामना उपांत्यपूर्व फेरीत स्पेनशी होईल. यावर्षी फिफा वर्ल्ड कपमध्ये अनेक अशा टीमने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे, ज्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नव्हती. तर पोर्तुगालसारखी टीम फायनल्समधून बाहेर गेल्याचेही समोर आले आहे. 

  • 07 Jul 2026 01:45 PM (IST)

    07 Jul 2026 01:45 PM (IST)

    टेम्पो वाहताना चालकाला काढले बाहेर, वाहतूक पोलिसांमुळे वाचला जीव

    पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि धाडसी बचावकार्यामुळे एका टेम्पो चालकाचा जीव वाचला आहे. बोपोडी अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यात टेम्पो घातल्यानंतर टेम्पोसह चालक वाहून जाऊ लागला. पण, समोर असलेल्या पोलिसांनी पाण्यात उतरून त्या चालकाला टेम्पोतून बाहेर काढत दोरीने सुखरूप काठावर आणले. पोलिसांच्या या शौर्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. सोमवारी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

  • 07 Jul 2026 01:40 PM (IST)

    07 Jul 2026 01:40 PM (IST)

    महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?

    राज्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरू आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथी होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर आता शरद पवार यांच्याही राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार यांच्यातील एक गट भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याची मागणी करत आहे, तर दुसरा गट काँग्रेससोबत जाण्याचा आग्रह करत आहे.

  • 07 Jul 2026 01:35 PM (IST)

    07 Jul 2026 01:35 PM (IST)

    इमरान हाश्मीच्या ‘Awarapan 2’चं पहिलं गाणं ‘जुनून’ प्रदर्शित

    अभिनेता इमरान हाश्मीच्या बहुप्रतीक्षित ‘आवारापन २’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर आणि टीझर रिलीज झाल्यानंतर आता निर्मात्यांनी या सिनेमातील पहिलं गाणं ‘जुनून’ प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, चाहत्यांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

  • 07 Jul 2026 01:30 PM (IST)

    07 Jul 2026 01:30 PM (IST)

    रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण

    पुणे-लोणावळा प्रवासादरम्यान पर्यटकांना अडवून, त्यांना अमली पदार्थांच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पोलीस दलातील सहा अज्ञात पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणवेशातील या गुन्हेगारांनी चार पर्यटकांचे अपहरण करून त्यांना तब्बल सात तास बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले होते, मात्र एका तरुणाने आपल्या ‘स्मार्ट वॉच’चा कौशल्याने वापर करून मदतीचा संदेश पाठवल्याने या धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे.

  • 07 Jul 2026 01:25 PM (IST)

    07 Jul 2026 01:25 PM (IST)

    मंचरमध्ये बनावट दूध रॅकेटचा भांडाफोड

    महाराष्ट्राला हादरवणारी घटना मंचरमध्ये घडली. मंचरमध्ये बनावट दूध रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला असून, ५ रुपयांच्या रासायनिक मिश्रणातून ७० रुपयांना विषारी दूध विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवसायातून जवळपास वर्षाला दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल गेल्या सहा-सात वर्षांपासून चालू असल्याचे वास्तव समोर आले आहे.

  • 07 Jul 2026 01:15 PM (IST)

    07 Jul 2026 01:15 PM (IST)

    मुसळधार पावसामुळे मिरा-भाईंदरमध्ये पूरसदृश परिस्थिती

    मिरा-भाईंदर शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक सखल भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणारा पाऊस, सोसाट्याचा वारा आणि समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर पोलीस प्रशासनाने शहरातील सर्व प्रमुख समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

  • 07 Jul 2026 01:02 PM (IST)

    07 Jul 2026 01:02 PM (IST)

    प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा

    प्रतापनगर परिसरातील एका व्यावसायिकाच्या बंगल्यात घुसलेल्या चार मास्कधारी दरोडेखोरांनी दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने असा सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना ६ जुलै रोजी पहाटे ३.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी मास्कधारी दरोडेखोरांविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 07 Jul 2026 12:48 PM (IST)

    07 Jul 2026 12:48 PM (IST)

    जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी घेतली विशाल पाटलांची भेट

    सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नामदेव पाटील यांनी काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत सातारा जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्यासाठी प्रभावी नेतृत्व करण्याचा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी विधानपरिषद सदस्य मोहन कदम यांनीही नामदेव पाटील यांना आशीर्वाद देत संघटन विस्तारासाठी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा सल्ला दिला. या भेटीदरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील चिखलीकर, मुकेश मोहिते, अबरार आदी उपस्थित होते.

  • 07 Jul 2026 12:36 PM (IST)

    07 Jul 2026 12:36 PM (IST)

    पाटणमध्ये दरड कोसळून तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू

    मावळ तालुक्यात सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसाने भीषण रूप धारण केले असून, पाटण गावात घडलेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर मावळ तालुक्यातील सर्व दरडप्रवण गावांचे तातडीने भूगर्भीय सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे, तसेच अशा भागांमध्ये कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटण गावातील शेतकरी नंदकुमार दत्तू तिकोणे, त्यांची पत्नी अनिता नंदकुमार तिकोणे आणि मुलगा ज्ञानेश्वर उर्फ माऊली तिकोणे हे घरात झोपलेले असताना पहाटे साडेचारच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग त्यांच्या घरावर कोसळला. संततधार पावसामुळे डोंगराची माती खचून संपूर्ण घर माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, मातीचा प्रचंड ढिगारा असल्याने स्थानिकांचे प्रयत्न अपुरे पडले. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच स्थानिक स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिघांचेही मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले.

  • 07 Jul 2026 12:24 PM (IST)

    07 Jul 2026 12:24 PM (IST)

    पुरंदरला दमदार पावसाने बळीराजा सुखावला

    अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुरंदर तालुक्यावर अखेर वरुणराजाची कृपा झाली असून, सर्वत्र जोरदर पाऊस झाला आहे. त्यामुळे बळीराजा एकदाचा सुखावला आहे. जमिनीतील पाण्याचा निचरा होताच पाळी, पेरणीच्या कामाला वेग येईल असे वातावरण सर्वत्र आहे. तसेच जोरदार पावसामुळे काही दिवसांत पाण्याचा प्रश्न मिटण्यास मोठी मदत होईल. यंदाच्या पावसाळ्यातील जून महिना केव्हाच संपला असून, जुलै महिन्यातील पहिला आठवडा सरला आहे. मात्र पुरंदर तालुक्यातील बहुतेक भाग अद्यापही पावसापासून वंचित असल्याने जोरदार सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. तालुक्यातील सर्व धरणे, विहिरी, ओढे, नाले अद्यापही कोरडेच असून शेतातील कामेही सुरु झालेली नव्हती. तर काही तासांच्या अंतरावर संतांचे पालखी सोहळे सरू होत असल्याने वारीला जायचे कि पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत थांबायचे ? अशा चिंतेत बळीराजा सापडला होता.

  • 07 Jul 2026 12:12 PM (IST)

    07 Jul 2026 12:12 PM (IST)

    डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल

    शाळेतील प्रवेश प्रक्रिया, शिक्षकांचे वेतन, शैक्षणिक सहलींचा खर्च अशा प्रकरणांत आर्थिक गैरव्यवहार करून शैक्षणिक संस्थेची ४ कोटी ९८ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १ ऑक्टोबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल येथे घडला आहे. याप्रकरणी शाळेच्या माजी संचालकाविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल आनंदराव गावंडे (५०, रा. बिल्डिंग एफ-५, फ्लॅट क्र. १८, कॅम्प गार्डन, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माजी संचालकाचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या खजिनदार महिला यांनी फिर्याद दिली आहे.

  • 07 Jul 2026 12:00 PM (IST)

    07 Jul 2026 12:00 PM (IST)

    थरकाप उडवणारा प्रकार! वृद्धेला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेलं, अत्याचार केला आणि आतडी बाहेर येईपर्यंत…

    नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथे वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ दिवसांनी आरोपीला अटक केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि चौकशीनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

  • 07 Jul 2026 11:50 AM (IST)

    07 Jul 2026 11:50 AM (IST)

    ‘मी प्लेबॉय होतो’; राम कपूरच्या वक्तव्याने खळबळ, एकता कपूरने गौतमीला दिला होता इशारा?

    टीव्ही अभिनेता राम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका रिअॅलिटी शोमध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत केलेल्या स्पष्ट वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. लग्नाआधी आपली ‘प्लेबॉय’ अशी प्रतिमा होती, अशी कबुली राम कपूरने दिली. तसेच, पत्नी गौतमी गाडगीळ हिच्याशी लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर निर्माती एकता कपूर  ने तिला दिलेल्या सल्ल्याचाही त्याने उल्लेख केला. एका संवादादरम्यान सहस्पर्धकाने राम कपूरला त्याच्या भूतकाळातील प्रेमसंबंधांबाबत प्रश्न विचारला. प्रश्न टाळण्याऐवजी रामने प्रामाणिकपणे उत्तर देत सांगितलं, “लग्नाआधी मी प्लेबॉय होतो.” त्याच्या या कबुलीनंतर उपस्थित स्पर्धकांसह अनेक चाहत्यांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.

  • 07 Jul 2026 11:40 AM (IST)

    07 Jul 2026 11:40 AM (IST)

    बांगलादेश हादरला! NCP च्या रॅलीत मोठा बॉम्बस्फोटाने खळबळ; हसीना विरोधी आंदोलनाला हिंसक वळण

    बांगलादेशची राजधानी ढाका येथे मोठा स्फोट घडला आहे. सोमवारी नॅशनल सिटिझन पार्टी(NCP) च्या रॅलीदरम्यान अचानक बॉम्बस्फोट झाला. या स्फोटानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. यामुळे रॅलीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावण निर्माण झाले. सुदैवाने या स्फोटात कोणती मोठी जीवितहानी झालेली नाही, परंतु ३ जण जखमी असल्याचे वृत्त आहे.

  • 07 Jul 2026 11:30 AM (IST)

    07 Jul 2026 11:30 AM (IST)

    वीजमाफियांच्या जाळ्यात अडकली अनेक नागरिकांची आयुष्ये

    मुसळधार पावसामुळे मुंबई ठप्प झाली असून, मुंबईकरांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आणखी एक भीषण दृश्य समोर येत आहे. येथे, कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे पसरलेल्या उघड्या आणि बेकायदेशीर विजेच्या तारा मोठ्या संकटाला आमंत्रण देत आहेत. विजेचे वाढते दर आणि आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे, या भागातील रहिवासी वीज माफियांच्या जाळ्यात अडकण्यास भाग पडले आहेत आणि हतबल झाले आहेत. हे माफिया काही रुपयांसाठी लोकांचे जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे वीजपुरवठा करतात. वीजमाफियांच्या या जीवघेण्या तारा लोकांच्या घरांच्या छपरांमधून, खिडक्यांमधून आणि अरुंद गल्ल्यांमधून जातात. अनेक ठिकाणी या तारा पूर्णपणे उघड्या आणि जीर्ण झालेल्या आहेत. पावसाळ्यात थोडासा निष्काळजीपणाही जीवघेणा ठरू शकतो.

Web Title: 7 july 2026 live breaking news marathi maharashtra politics national politics crime sports pune maharashtra monsoon flood alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Monsoon Alert

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
1

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
2

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
3

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.