Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyoti Waghmare : गारपिटीनंतर डॉ. ज्योती वाघमारे शेतकऱ्यांच्या बांधावर; तातडीने पंचनाम्यांचे प्रशासनाला निर्देश

गारपिटीनंतर खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 27, 2026 | 06:32 PM
गारपिटीनंतर डॉ. ज्योती वाघमारे शेतकऱ्यांच्या बांधावर; तातडीने पंचनाम्यांचे प्रशासनाला निर्देश

गारपिटीनंतर डॉ. ज्योती वाघमारे शेतकऱ्यांच्या बांधावर; तातडीने पंचनाम्यांचे प्रशासनाला निर्देश

Follow Us
Follow Us:
  • गारपिटीनंतर डॉ. ज्योती वाघमारे शेतकऱ्यांच्या बांधावर
  • तातडीने पंचनाम्यांचे प्रशासनाला निर्देश
  • डॉ. वाघमारे यांनी हतबल झालेल्या बळीराजाला धीर दिला
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात येवती-पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी आज प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. “सरकार आणि लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहेत,” असा शब्द देत खासदार डॉ. वाघमारे यांनी हतबल झालेल्या बळीराजाला धीर दिला.

Ashok Kharat Case : अशोक खरातविरुद्ध दहावा गुन्हा दाखल; बनावट सापाची भीती दाखवून 5 कोटींची फसवणूक

नुकसानीची भीषणता आणि शेतकऱ्यांच्या व्यथा

येवती-पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. द्राक्ष बागा, केळी, आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी गोठे आणि घरांचीही पडझड झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना खासदारांसमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

तातडीने मदतीसाठी हालचाली

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. ज्योती वाघमारे यांनी घटनास्थळावरूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मोहोळ तालुक्यातील या नैसर्गिक आपत्तीची माहिती देत त्यांनी शासनाकडून तातडीने मदतीची मागणी केली आहे. तसेच उपस्थित असलेल्या कृषी अधिकारी, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना त्वरित पंचनामे पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या, जेणेकरून एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या दौऱ्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर, नगरसेवक तथा युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, भीम वाघमारे, दीपक पाटील यांच्यासह संबंधित कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, शिवसैनिक आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“शेतकऱ्यांचे नुकसान पाहून मन हेलावले आहे. केवळ पंचनामे करून न थांबता, नुकसानभरपाई प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात पडेपर्यंत पाठपुरावा करेन. उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच दिलासादायक निर्णय होईल.”, अशी प्रतिक्रिया डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी दिली.

मीरा-भाईंदरमध्ये आगीचे तांडव; 4-5 इमारती आगीच्या विळख्यात; परिवहन मंत्री घटनास्थळी दाखल

Web Title: Jyoti waghmare visits hailstorm affected farmers orders immediate damage assessment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • agriculture
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.