यावेळी सरनाईकांनी आगीच्या वेळी अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेवर न पोहोचल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली. या संदर्भात संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. “अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येतो, त्यामुळे कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.दरम्यान, मंत्री सरनाईक यांनी महानगरपालिका अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेत तातडीच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या. आगीसारख्या आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम आणि तत्पर करण्यावर त्यांनी भर दिला.या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने यापुढे अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
आगीचं नेमकं कारण काय ?
प्लेझंट पार्कमधील लागलेल्या या आगीमुळे अनेकांच्या जीवावर बेतलं. याचं कारण अद्याप असपष्ट आहे. मात्र प्राथमिक तपासानुसार असं सांगितलं जातं की, मुख्य कारण गॅस सिलिंडरचा स्फोट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. एकामागून एक सिलेंडर स्फोट इतक्या तीव्रतेने झाला की, काही कळायच्या आतच आग वेगाने पसरली आणि इमारतींच्या काही घरांनाही तिचा मोठा फटका बसला. या आगीत परिसरात उभ्या असलेल्या दोन ते तीन टेम्पोंचे गंभीर नुकसान झाले असून ते पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. अग्नीशमन दल वेळेत दाखल झाल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं. त्यामुळे इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं. यात मालमत्तेचं नुकसान झालं असलं तरी सुदैवानी कोणतीही जिवितहानी झाली नाही. वेळीच खबरदारी घेत परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आणि त्यामुळे अनर्थ टळला असं सांगण्यात आलं आहे.






