Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS Protest : ‘सात दिवसांत नाले साफ करा’; कुर्ल्यात मनसे आक्रमक, जनआंदोलनाचा इशारा

कुर्ला परिसरातील नालेसफाईची कामे रखडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे नेते प्रदीप वाघमारे यांनी प्रशासनाला सात दिवसांत नालेसफाई पूर्ण करण्याचा इशारा देत अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर रखडलेल्या कामांमुळे नागरिकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2026 | 05:06 PM
‘सात दिवसांत नाले साफ करा’; कुर्ल्यात मनसे आक्रमक, जनआंदोलनाचा इशारा

‘सात दिवसांत नाले साफ करा’; कुर्ल्यात मनसे आक्रमक, जनआंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • कुर्ल्यात नालेसफाई रखडली
  • मनसेचा आंदोलनाचा इशारा
  • सात दिवसांचा अल्टिमेटम
वत्सलाताई नगर, कुर्ला येथील नाल्याची सफाई अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही संबंधित नाल्याची साफसफाई रखडलेली असल्यामुळे परिसरातील नागरिकांना संभाव्य पूरस्थिती तसेच विविध साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह वत्सलाताई नगर परिसराला भेट देऊन नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी परिसरातील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, नाल्याच्या साफसफाईकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली.

MMRDA : मान्सूनपूर्व महा मुंबई मेट्रो अलर्ट मोडवर; २,४९६ सीसीटीव्ही अन् २अ, २ब, ७ आणि ९ मार्गिकांवर आराखडा लागू

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, नाल्यात साचलेल्या कचऱ्यामुळे व दुर्गंधीमुळे परिसरात अस्वच्छतेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे टायफॉईड, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. यावेळी बोलतान प्रदीप वाघमारे यांनी महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावर टीका करत प्रशासनाला इशारा दिला. येत्या सात दिवसांच्या आत सदर नाल्याची संपूर्ण साफसफाई करण्यात आली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वत्सलाताई नगर येथे मोठे जनआंदोलन उभारेल, अशी स्पष्ट घोषणा त्यांनी केली.

तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून नालेसफाईच्या कामाचा आढावा घ्यावा, अशी मागणीही वाघमारे यांनी केली. नालेसफाईच्या कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली. स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Mira Bhayandar News: ‘आठवा अजूबा’ ब्रीजवर पुन्हा वाद; नवराष्ट्रच्या बातमीनंतर मनसे प्रशासनाला धारेवर धरणार

Web Title: Kurla drain cleaning delay mns protest warning pradeep waghmare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • kurla
  • Monsoon Update
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष
1

Mumbai Local: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा
2

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा
3

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या
4

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.