SIR Update Revision List Deadline Extended
जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी वीरेंद्र जाधव, निवडणूक नायब तहसीलदार एस. एम. पढवे, महसूल अधिकारी रवी महाले उपस्थित होते. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू चौधरी, सरचिटणीस उज्ज्वल देशमुख, सचिव सुरेश रत्नपारखी, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक डॉ. विशाल सोमटकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय बाजड आणि प्रतिनिधी सतीश देशमुख उपस्थित होते.
बैठकीत मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ते (बीएलए) यांच्या नियुक्त्या तसेच दावे व हरकतींच्या निपटाऱ्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यापूर्वी दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत १३ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर प्राप्त दावे व हरकतींवर नोटीस बजावून कार्यवाही पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती.
दरम्यान, मतदारांना पुनरीक्षण प्रक्रियेची माहिती घेता यावी आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करता यावा, यासाठी कार्यवाहीची मुदत आता २५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणेने निर्धारित वेळेत कार्यवाही पूर्ण करावी. अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध केली जाणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वीरेंद्र जाधव यांनी कळविले आहे.
Nashik Politics : नाशिक महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीचा वाद; नवीन शहराध्यक्षांच्या नियुक्तीची चर्चा
Ans: दावे आणि हरकतींवरील कार्यवाही पूर्ण करण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Ans: अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रसिद्ध होणार आहे.
Ans: ही बैठक वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात आयोजित करण्यात आली होती.






