Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Best Protest: मुंबईकरांनो लक्ष द्या! १० नोव्हेंबरपासून ‘लाल परी’ थांबणार; बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

Mumbai: "बेस्ट प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात कामगार आक्रमक झाले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'समान कामाला समान दाम' मिळावा यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी १० नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 06, 2025 | 06:31 PM
मुंबईकरांनो लक्ष द्या! १० नोव्हेंबरपासून 'लाल परी' थांबणार (Photo Credit - X)

मुंबईकरांनो लक्ष द्या! १० नोव्हेंबरपासून 'लाल परी' थांबणार (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:
  • मुंबईकरानों लक्ष द्या! बेस्ट कर्मचाऱ्यांचा ‘एल्गार’
  • प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे १० नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन
  • व्यवस्थापनासमोर पुन्हा तणावाचे सावट
मुंबई: बेस्ट (BEST) उपक्रमातील कायम कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि खासगी कंपन्यांमार्फत कार्यरत असलेल्या कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप बेस्ट वर्कर्स युनियन आणि संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या कामगार संघटनांनी १० नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही

युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही. बेस्ट प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात कामगार संघटना आक्रमक झाल्या असून, १० नोव्हेंबरपासून आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

BMC Water Bill Arrears: मुंबई पालिकेची तिजोरी रिकामी? सरकारी संस्थांकडून ₹३७३६ कोटींची पाणी बिल थकबाकी!

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘समान कामाला समान दाम’ची मागणी

बेस्ट वर्कर्स युनियनची प्रमुख मागणी खासगी कंपन्यांमार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात आहे.

  • मागणी: ‘एसएमटीएटीपीएल असोसिएट्स’, ‘मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स’, ‘बीव्हीजी इंडिया लि.’, ‘स्विच मोबिलिटी’, ‘ओलेक्ट्रा’ यांसारख्या खासगी कंपन्यांमार्फत कार्यरत कर्मचाऱ्यांचे काम बेस्टच्या कायम कर्मचाऱ्यांप्रमाणेच आहे.
  • तत्त्व: त्यामुळे या कर्मचाऱ्यानाही ‘समान कामाला समान दाम’ या तत्त्वानुसार बेस्टमधील समकक्ष कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनमान आणि सेवा-शर्ती लागू करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी युनियनने केली आहे.

व्यवस्थापनासमोर पुन्हा तणावाचे सावट

बेस्ट प्रशासन आणि मुंबई महापालिकेकडून मागण्यांवर ठोस निर्णय न मिळाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा स्पष्ट इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिला आहे. संघटनांनी दिलेल्या या चेतावणीमुळे बेस्ट व्यवस्थापनासमोर पुन्हा एकदा मोठे तणावाचे सावट निर्माण झाले आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Mumbai Metro: मुंबईकरांचा मेट्रोप्रवास गर्दीमुक्त होणार! घाटकोपर-वर्सोवा मेट्रो लवकरच सहा डब्यांची; ‘मेट्रो-वन’ची तयारी

Web Title: Lal pari to stop from november 10 best employees warn of agitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 06:31 PM

Topics:  

  • Best
  • Mumbai
  • Protester

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १
3

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.