Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayandar News : सकाळी पार्किंग, रात्री मुक्काम! आनंद दिघे मैदानावर अतिक्रमणाचा विळखा? मनसे आक्रमक

भाईंदर पूर्व येथील स्वर्गीय आनंद दिघे मैदानावर अतिक्रमण आणि गैरवापर होत असल्याचा आरोप समोर आला आहे. सकाळच्या वेळेत मैदानाचा पार्किंगसाठी वापर केला जात असून रात्री परप्रांतीयांचा मुक्काम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी करत पोलिसांकडून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 08, 2026 | 12:12 PM
सकाळी पार्किंग, रात्री मुक्काम! आनंद दिघे मैदानावर अतिक्रमणाचा विळखा? मनसे आक्रमक

सकाळी पार्किंग, रात्री मुक्काम! आनंद दिघे मैदानावर अतिक्रमणाचा विळखा? मनसे आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • स्व. आनंद दिघे मैदानावर अतिक्रमणाचा विळखा?
  • रात्री परप्रांतीयांचा मुक्काम, मनसे आक्रमक
  • आनंद दिघे मैदानाच्या गैरवापरावर मनसेची पाहणी
विजय काते, भाईंदर पूर्व : भाईंदर पूर्व येथील स्वर्गीय आनंद दिघे मैदानावर रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने परप्रांतीय नागरिक झोपत असल्याची बाब समोर आल्यानंतर परिसरात चर्चा रंगली आहे. यासंदर्भातील बातम्या आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तत्काळ घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.

मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानाची पाहणी करून तेथे झोपणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी संबंधित नागरिकांनी आपण जवळील इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असल्याचे सांगितले. त्यांच्या घरांचे बांधकाम पत्र्याचे असल्यामुळे दिवसभराच्या तीव्र उष्णतेनंतर घरात प्रचंड उकाडा निर्माण होतो. त्यामुळे रात्री झोपण्यासाठी मैदानावर येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Best Accident : स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने दादरमध्ये भीषण अपघात; ३-४ वाहनांना धडक, २ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

दरम्यान, सार्वजनिक मैदाने आणि बागांचा मुक्कामासाठी वापर होत असल्याने स्थानिक नागरिकांनी सुरक्षेचा तसेच स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला आहे. नागरिकांच्या फिरण्यासाठी, मुलांच्या खेळासाठी आणि ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी असलेल्या सार्वजनिक जागांचा अशा प्रकारे वापर होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पाहणीदरम्यान मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी ही भेट दिल्याचे सांगितले. तसेच मैदानावर झोपणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा समावेश नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी पोलिस प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणीही मनसेकडून करण्यात आली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोलिस प्रशासनाला लेखी पत्र देणार असून, स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि सार्वजनिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणावर महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र नागरिकांनी तातडीने पाहणी करून परिस्थितीबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी आणि आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Mumbai News: १५०० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! माहीममधील महानगरपालिकेची शाळा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव

Web Title: Late anand dighe ground encroachment mns demands police inquiry thane news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Anand Dighe
  • MNS
  • thane

संबंधित बातम्या

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश
1

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला
2

Raj Thackeray: ‘रावणाला 1 लाख मुलं, दीड लाख नातवंडं; मग तो कधी जेवत होता की नाही?’ राज ठाकरेंचा हटके प्रश्न अन् एकच हशा पिकला

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!
3

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!

Thane News: ठाण्यात १८० वातानुकूलित ई-बसेस येणार; पण पालिकेला सोसावी लागणार ४५० कोटींची तूट
4

Thane News: ठाण्यात १८० वातानुकूलित ई-बसेस येणार; पण पालिकेला सोसावी लागणार ४५० कोटींची तूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.