Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : भूमिहीन शेतकरी कुटुंबाला दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांकडून आर्थिक मदतीसह बैल भेट

लातूर जिल्ह्यातील बोंबळी येथील भूमिहीन गायकवाड शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी पत्नीच्या खांद्यावर शेतीचे जोखड असल्याची बाब समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्यात आले असून, शेतीसाठी बैलही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 10, 2026 | 06:43 PM
भूमिहीन शेतकरी कुटुंबाला दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांकडून आर्थिक मदतीसह बैल भेट (फोटो सौजन्य-X)

भूमिहीन शेतकरी कुटुंबाला दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांकडून आर्थिक मदतीसह बैल भेट (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:
  • भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड…
  • लातूर जिल्ह्यातील बोंबळीच्या गायकवाड कुटुंबीयांना दिलासा
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आर्थिक सहाय्यासह, शेतकऱ्याला मिळाला बैल
मुंबई : वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्य़थेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, अन् या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासात बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाई पोटीची रक्कम मिळाली. यात मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश आणि जिल्हा प्रशासनासोबतच, अन्य विभागांनी दाखवलेली संवेदनशीलता चर्चेची ठरली आहे. या संवेदनशीलतेमुळे आता काशिनाथ गायकवाड यांना पत्नीला बैलाच्या जागी जुंपावे लागणार नसल्याने, या कष्टकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्दचे काशिनाथ गायकवाड भूमिहीन शेतकरी असून त्यांच्याकडे असलेल्या बैलजोडीच्या मदतीने गायकवाड व त्यांच्या पत्नी हौसाबाई परिसरातील शेतकऱ्यांची जमीन कसतात. मशागतीची, नांगरणी ते पेरणी, वखरणी अशी मिळेल ती कामे करतात, यावरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यातच त्यांच्याकडील एका बैलाचा शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसात वीज पडून मृत्यू झाला. त्यामुळे मिळालेली कामे पूर्ण करण्यासाठी, गायकवाड यांना पत्नी हौसाबाई यांना जोखडला जुंपावे लागल्याचे वृत्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहचले. यावर त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानुसार प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संपर्कात राहून, लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांना महसूलसह, सर्व यंत्रणांना गायकवाड यांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तहसील कार्यालयासह, पशूसंवर्धन, कृषी सर्व यंत्रणा गायकवाड यांच्यापर्यंत पोहचल्या.

Maharashtra Rain Alert: आता ये रे बाबा! राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम; मान्सूनची स्थिती काय?

पशूसंवर्धन विभागाने एक बैल उपलब्ध करून घेतला आणि तो जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड, तहसिलदार सोमनाथ वाडकर यांच्यासह पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी आदींच्या उपस्थितीत थेट गायकवाड कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. यामुळे काशिनाथ गायकवाड यांच्यासह, त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने दखल घेत, बैल मिळवून दिल्याने गायकवाड यांच्या पत्नी हौसाबाई आणि मुलगा पुंडलिक यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह, जिल्हा प्रशासनाचेही आभार मानले. हौसाबाई म्हणाल्या, आमच्या एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने दुर्दैवाने आमच्यावर अशी वेळ आली. पण आमच्या अडचणीची दखल घेऊन, लगेचच मदत मिळाल्याने बरे वाटले. आता पुढे येणाऱ्या खरीप हंगामासाठी मिळालेली कामे पूर्ण करण्याची चिंता दूर झाली. बैल पण चांगला मिळाला आहे. आता त्याची पण चांगली काळजी घेऊ आणि मिळालेली कामे देखील चांगली होतील असे बघू.

नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. गायकवाड यांच्या दगावलेल्या बैलाचा तातडीने पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून नियमानुसार आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. ही रक्कम गायकवाड यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

Sharad Pawar News: पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे पण; नेहरू-इंदिरा गांधींच्या योगदानावरून शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Web Title: Latur bombli gaikwad family help devendra fadnavis bull financial aid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Latur
  • maharashtra

संबंधित बातम्या

Sikandar Shaikh: प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेखच्या ‘थार’चा भीषण अपघात; हायवेवरील डिव्हायडरला दिली धडक, वाहनाचे मोठे नुकसान
1

Sikandar Shaikh: प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेखच्या ‘थार’चा भीषण अपघात; हायवेवरील डिव्हायडरला दिली धडक, वाहनाचे मोठे नुकसान

MMRDA Projects : वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार; MMR ला 22,611 कोटींची मोठी भेट! घोडबंदर-भाईंदर बोगदा, मेट्रो विस्ताराला हिरवा कंदील
2

MMRDA Projects : वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार; MMR ला 22,611 कोटींची मोठी भेट! घोडबंदर-भाईंदर बोगदा, मेट्रो विस्ताराला हिरवा कंदील

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय ! मंत्रालयीन विभागांची होणार पुनर्रचना, प्रशासकीय विभागांची संख्या वाढणार
3

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय ! मंत्रालयीन विभागांची होणार पुनर्रचना, प्रशासकीय विभागांची संख्या वाढणार

MHT CET PCB Result : पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
4

MHT CET PCB Result : पहिल्या संधीचा पीसीबी समूहाचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.