Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : शीव रुग्णालय 3286 खाटांचे होणार, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सायनच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. ३,२८६ खाटांची क्षमता, अत्याधुनिक तपासण्या आणि वाढीव ऑपरेशन थिएटरमुळे उपचार जलद व सुलभ होणार. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 27, 2026 | 11:09 AM
शीव रुग्णालय ३,२८६ खाटांचे होणार, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन (फोटो सौजन्य-ChatGPT)

शीव रुग्णालय ३,२८६ खाटांचे होणार, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • पालिकेच्या सायन रुग्णालयाचा पुनर्विकासाच्या ‘फेज-२’ चा फंडा
  • रुग्णांसाठी अधिक खाट, तत्पर सेवा आणि अत्याधुनिक उपचार
  • आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन
मुंबई : सायन येथील मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका (सायन) रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यामुळे मुंबईसह राज्यभरातून येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या इमारतींमुळे रुग्णसेवा अधिक जलद, सुसज्ज आणि रुग्णाभिमुख होणार असून, उपचारांसाठीची प्रतीक्षा वेळ कमी होण्याची शक्यता असून रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक उपकरणे अन नवीन तंत्रज्ञानतुन रुग्णसेवा, जास्त खाटा, कमी प्रतीक्षा आणि जलद उपचार अशा सूत्रीवर रुग्णसेवा केली जाणार असल्याची ग्वाही रुग्णालय अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी सांगितले.

“व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी…”; काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर?

रुग्णालय पुनर्विकास दुसऱ्या टप्प्यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णशय्या क्षमतेत एकूण ३,२८६ खाटांची व्यवस्था उपलब्ध होणार असून, त्यातच २,२०० खाटांची १५ मजली मुख्य इमारत उभारली जाणार आहे. येथे स्थिर रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष, तसेच पूर्ण मजला अतिदक्षता विभागासाठी राखीव असेल. त्यामुळे गंभीर रुग्णांवर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे.

रुग्णांना एकाच छताखाली बहुतेक सर्व तपासण्या मिळणार ही या प्रकल्पाची मोठी जमेची बाजू ठरणार आहे. एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी-स्कॅन, एमआरआय अशा अत्याधुनिक तपासण्या एकाच इमारतीत उपलब्ध राहणार आहेत. तसेच ऑपरेशन थिएटरची संख्या १२ वरून २४ पर्यंत वाढवण्यात येणार असल्याने शस्त्रक्रियांसाठी प्रतीक्षा कमी होईल.

आपत्कालीन सेवांमध्येही मोठा बदल

आपत्कालीन सेवांमध्येही मोठा बदल होणार आहे. १४ मजली स्वतंत्र आपत्कालीन इमारतीत ६०० खाटांची व्यवस्था, ट्रॉमा केअर, मोठ्या अपघातांसाठी विशेष विभाग आणि अत्याधुनिक लाइफ सपोर्ट प्रणाली उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे अपघातग्रस्त व गंभीर रुग्णांना तत्काळ उपचार मिळणे शक्य होईल. दररोज मोठ्या संख्येने येणाऱ्या बाह्य रुग्णांसाठी स्वतंत्र १३ मजली इमारत उभारण्यात येणार असून, १०० हून अधिक तपासणी कक्ष, मोठे प्रतीक्षालय, रक्तपेढी आणि प्रयोगशाळा यामुळे रुग्णांची गर्दी व्यवस्थापन अधिक सुलभ होईल. याशिवाय, ‘न्यूमॅटिक शूट’ प्रणालीमुळे तपासणी नमुने काही मिनिटांत प्रयोगशाळेत पोहोचतील. त्यामुळे वेळेची बचत होऊन निदान आणि उपचार प्रक्रिया वेगवान होणार आहे.

कर्करोग रुग्णांसाठी स्वतंत्र इमारत

कर्करोग रुग्णांसाठी स्वतंत्र १३ मजली इमारत, रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि आधुनिक निदान सुविधा उपलब्ध होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मोठा आधार निर्माण होणार आहे. एकूणच, सायन रुग्णालयाचा हा दुसरा टप्पा म्हणजे ‘जास्त खाटा, कमी प्रतीक्षा आणि जलद उपचार’ या त्रिसूत्रीवर आधारित रुग्णसेवेचा नवा अध्याय ठरणार आहे.

“सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यामुळे रुग्णसेवेत गुणात्मक बदल घडणार आहे. वाढीव रुग्णशय्या, अत्याधुनिक तपासणी सुविधा आणि स्वतंत्र आपत्कालीन तसेच कर्करोग विभागामुळे रुग्णांना एकाच छताखाली सर्व उपचार वेळेत मिळतील. विशेषतः गरीब आणि दूरवरून येणाऱ्या रुग्णांसाठी ही सुविधा अधिक दिलासादायक ठरेल. आमचा भर ‘कमी प्रतीक्षा, जलद निदान आणि तत्काळ उपचार’ यावर आहे.” अशी माहिती लो. टिळक सर्वसाधारण सायन रुग्णालय अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली.

आज उदघाटन

आज २७ मार्च रोजी शुक्रवारी सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्याचा भूमिपूजन सोहळा दुपारी २.०० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महापौर रितू तावडे, यांच्या सह सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, खा. अनिल देसाई, आम. तामील सेल्वन, आदी उपस्थित राहणार आहेत.

डबेवाल्यांच्या ताफ्यात आता 105 ई-बाईक्स! महापौर रितू तावडे यांच्याकडून मुंबईच्या ‘खऱ्या प्रतिनिधीं’साठी महत्त्वाचा निर्णय

Web Title: Lokmanya tilak hospital sion redevelopment phase 2 more beds modern facilities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • BMC
  • Mumbai

संबंधित बातम्या

Sugar Black Marketing: साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु
1

Sugar Black Marketing: साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, भांडुप स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अर्बन डिझायनरची मदत
2

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, भांडुप स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अर्बन डिझायनरची मदत

लॉजिस्टिक्सला मिळणार मोठा बूस्ट! पारादीप पोर्टवर AM/NS India ला मोठी संधी; कॅप्टिव्ह बर्थसाठी 30 वर्षांची कन्सेशन
3

लॉजिस्टिक्सला मिळणार मोठा बूस्ट! पारादीप पोर्टवर AM/NS India ला मोठी संधी; कॅप्टिव्ह बर्थसाठी 30 वर्षांची कन्सेशन

मुंबईच्या आमदारांनी किती केले काम? रिपोर्ट कार्ड जाहीर; काँग्रेसचे आमदार अव्वल, तर शिंदेंच्या आमदाराची सर्वांत खराब कामगिरी
4

मुंबईच्या आमदारांनी किती केले काम? रिपोर्ट कार्ड जाहीर; काँग्रेसचे आमदार अव्वल, तर शिंदेंच्या आमदाराची सर्वांत खराब कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.