Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाला गती द्या; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Devendra Fadnavis : महा कॅम्पाच्या निधीतून व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित क्षेत्रांतील गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वनीकरणाच्या कामांची उपग्रह आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पडताळणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 26, 2026 | 05:11 PM
Devendra Fadnavis : व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाला गती द्या; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Devendra Fadnavis : व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनाला गती द्या; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Follow Us
Follow Us:
  • अधिक पारदर्शकता आणण्याच्या सूचना
  • कुरण विकास कार्यक्रमावरही चर्चा
  • आतापर्यंत 55 गावांचे पुनर्वसन
वनसंवर्धन राखीव क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांच्या जीवनात आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी कॅम्पा अंतर्गत असलेल्या निधीचा मोठा हातभार लागू शकतो. या निधीच्या उपयोगातून व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी दिले आहेत.

तसेच या निधीतून पूर्ण केलेल्या वनीकरण, मृद व जलसंधारणाच्या कामांची उपग्रह व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पडताळणी करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दिल्या. सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणाची (महा कॅम्पा) बैठक झाली. यावेळी आढावा घेताना मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते.

अधिक पारदर्शकता आणण्याच्या सूचना

मुख्यमंत्री म्हणाले, कॅम्पाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची सध्याची पडताळणीची पद्धत बदलून कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यात यावी. पूर्ण झालेल्या वनीकरणाच्या कामांपैकी काही नमुने निवडून त्यांचे सर्वेक्षण करावे. संबंधित यंत्रणांनी मृद व जलसंधारण तसेच वनीकरण कामांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही कामे पूर्ण करावीत. राष्ट्रीय कॅम्पा निधीतून राज्यातील राखीव वनक्षेत्रातील गावांचे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यासाठी केंद्राकडे निधीची मागणी करावी. त्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. राज्यस्तरीय कॅम्पा प्राधिकरणाला मनुष्यबळ उपलब्धतेसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात यावी.

तसेच राज्याच्या राखीव निधीसाठी रिझर्व बँकेमध्ये खाते उघडण्याची कार्यवाही पूर्ण करावी. या निधीवरील अधिकच्या व्याजासाठी चांगले गुंतवणूक पर्याय निवडून प्रयत्न करावे. राज्याच्या महत्वाकांक्षी 300 कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी या निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वनीकरण करावे आणि वनेतर जमीन वनांखाली आणावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुंबईचा विकास वेगात! उंच इमारती, सागरी पूल अन् मेट्रोचे जाळे; पाहा बदलत्या शहराची झलक

कुरण विकास कार्यक्रम राबवावा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सध्या असलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये या निधीचा उपयोग करीत कुरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. यामधून चाऱ्याची उपलब्धता आणखी सुनिश्चित करता येईल. बैठकीस वन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, अपर मुख्य सचिव (वित्त) विकासचंद्र रस्तोगी, पर्यावरण सचिव जयश्री भोज, कृषी सचिव परिमल सिंग, ग्रामविकास सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी आणि कॅम्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी याटबोन उपस्थित होते.

Mumbai Crime: पतीच्या क्रूरतेने मुंबई हादरली; पत्नीशी भांडण अन् ९ महिन्यांच्या बाळाला  उंचावरून फेकले

पर्यायी वनीकरण अंतर्गत आतापर्यंत 1 लाख 7 हजार 865  हेक्टरवर रोपवनाची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच 2019-20 ते 2025-26 या कालावधीत 562 निवासस्थाने आणि 83 कार्यालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्याचप्रमाणे महिलांकरिता 62 विश्रामगृहे तयार करण्यात आली. कुरण विकास कार्यक्रमांतर्गत 15, 724 हेक्टर क्षेत्रावर कुरण विकासाची कामे पूर्ण करण्यात आली. या निधीच्या उपयोगातून व्याघ्र प्रकल्प, इतर संरक्षित क्षेत्रांमधील 55 गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महा कॅम्पा म्हणजे काय?

    Ans: महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरणाला ‘महा कॅम्पा’ असे म्हणतात. पर्यायी वनीकरण आणि संबंधित संवर्धनाच्या कामांसाठी या निधीचा उपयोग केला जातो.

  • Que: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणते निर्देश दिले?

    Ans: व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रांतील गावांच्या पुनर्वसनाची कामे पूर्ण करावीत, तसेच वनीकरण आणि मृद व जलसंधारणाच्या कामांची आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पडताळणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

  • Que: महा कॅम्पाच्या निधीतून आतापर्यंत किती गावांचे पुनर्वसन झाले?

    Ans: उपलब्ध माहितीनुसार, या निधीच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्प आणि इतर संरक्षित क्षेत्रांतील 55 गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

Web Title: Maha campa tiger reserve village rehabilitation devendra fadnavis rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Ganesh Naik
  • tiger

संबंधित बातम्या

राजकीय उलथापालथ होणार? गणेश नाईकांच्या भाकितावर गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपनंतर चर्चांना उधाण
1

राजकीय उलथापालथ होणार? गणेश नाईकांच्या भाकितावर गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपनंतर चर्चांना उधाण

Karjat Torrent Power Project : ‘फेक नरेटिव्ह पसरवू नका, कर्जत प्रकल्प पर्यावरणाला पूरक’ वृक्षतोडीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
2

Karjat Torrent Power Project : ‘फेक नरेटिव्ह पसरवू नका, कर्जत प्रकल्प पर्यावरणाला पूरक’ वृक्षतोडीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर

Nagpur News : प्राचीन भारतीय शिक्षणाचा वारसा जपणे काळाची गरज! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
3

Nagpur News : प्राचीन भारतीय शिक्षणाचा वारसा जपणे काळाची गरज! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.