Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बीएलओ मशिदींमध्ये जाऊन एका विशिष्ट समाजातील…’; Mangal Prabhat Loadha यांची तक्रार

मंत्री लोढा म्हणाले "काही लोक डबल रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रयत्नात आहेत. विविध राज्यात त्यांचे मतदार म्हणून नाव आहे. पश्चिम बंगाल मध्ये हा कट उघडकीस आला म्हणून तिथून ९७ लाख वोटर्स कमी झाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 25, 2026 | 03:21 PM
‘बीएलओ मशिदींमध्ये जाऊन एका विशिष्ट समाजातील…’; Mangal Prabhat Loadha यांची तक्रार
Follow Us
Follow Us:
  • SIR प्रक्रियेदरम्यान मशिदींमध्ये बैठका 
  • मंगल प्रभात लोढा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली तक्रार
  • काही लोक डबल रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रयत्नात
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान मालबार हिल मतदारसंघात निदर्शनास आलेल्या गंभीर अनियमिततांबाबत महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आज विल्सन महाविद्यालय येथे मुख्य निवडणूक अधिकारी, मलबार हिल बाळासाहेब वाघचौरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

यावेळी मंत्री लोढा यांनी बीएलओ मशिदींमध्ये जाऊन एका विशिष्ट समाजातील नागरिकांच्या मतदार यादी नोंदणीसाठी बैठका घेत असल्याच्या तक्रारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केल्या. अशा बैठकींमधून मतदार नोंदणी प्रक्रियेवर चुकीचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात येत असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती मंत्री लोढा यांनी दिली.

मंत्री लोढा म्हणाले “काही लोक डबल रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रयत्नात आहेत. विविध राज्यात त्यांचे मतदार म्हणून नाव आहे. पश्चिम बंगाल मध्ये हा कट उघडकीस आला म्हणून तिथून ९७ लाख वोटर्स कमी झाले. पण इथे असे डबल रजिस्ट्रेशन चालणार नाही त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी बीएलओ किंवा तसं अधिकाऱ्यांच्या मदतीने मशिदींमध्ये बैठकी घेतल्या जात आहेत. नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. येथे असा प्रकार बंद झाला असला तरी इतर ठिकाणी सुरु असल्याची माहिती आमच्याकडे आहे”

‘किंग एडवर्ड हा कसाब सारखा…’; विधानपरिषदेत Mangal Prabhat Lodha विरोधकांवर भडकले

मालबार हिलमधील नागरिकांच्या SIR प्रक्रियेसंदर्भातील मागण्या

SIR प्रक्रियेसंदर्भात मालबार हिलमधील नागरिकांनी विविध मागण्या मांडल्या आहेत. सध्या तात्पुरत्या स्वरूपात अन्यत्र वास्तव्यास असलेल्या नागरिकांची मतदार नोंदणी SIR प्रक्रियेदरम्यान त्यांच्या तात्पुरत्या पत्त्यावर न करता कायमस्वरूपी पत्त्यावरच ठेवण्यात यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. कारण तात्पुरता पत्ता हा केवळ काही काळासाठीचा निवास असून संबंधित नागरिक भविष्यात पुन्हा त्यांच्या कायमस्वरूपी निवासस्थानी परतणार आहेत. त्यामुळे तात्पुरत्या पत्त्यावर मतदार नोंदणी केल्यास भविष्यात पुन्हा पत्ता बदलण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया करावी लागणार आहे. या व इतर मागण्यांसंदर्भात मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नागरिकांच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले.

मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले की, “मतदार पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध पद्धतीने राबविण्याची आमची मागणी आहे. कोणत्याही पात्र मतदारावर अन्याय होणार नाही, याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. धोकादायक इमारती, पुनर्विकास प्रकल्प, SRA प्रकल्प या मुळे अनेक नागरीक मूळ निवास्थानापासून दूर राहत आहेत. त्यांची नोंदणी झालेली नाही किंवा इतर ठिकाणी झालेली आहे.

|

विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान मलबार हिलमध्ये निदर्शनास आलेल्या गंभीर बाबी आज मुख्य निवडणूक अधिकारी श्री. बाळासाहेब वाघचौरे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. बीएलओंकडून मशिदींमध्ये जाऊन एका विशिष्ट समाजाच्या मतदार नोंदणीसाठी बैठका घेतल्या जात असल्याच्या… pic.twitter.com/shVWdOzqhr — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) June 25, 2026

हा प्रश्न फक्त मुंबईमध्ये नसून संपूर्ण महाराष्ट्रात आहे. अशा नागरिकांना त्यांच्या तात्पुरत्या पत्त्यावर सूचना पाठविणे, विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करणे अथवा स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देणे यासारख्या उपाययोजना तातडीने व्हायला हव्यात. तसेच मतदार पडताळणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या बीएलओ/बीएलए यांना अधिकृत मान्यता किंवा तत्सम पत्र मिळाले नसल्याने कामामध्ये अडथळा निर्माण होत आहे. त्यांना लवकरात लवकर आवश्यक ती कागदपत्रे मिळावीत”

Web Title: Mangal prabhat lodha filed complaint meetings in masjid for sir process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News
  • SIR

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?
2

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध
4

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.