Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“अत्याधुनिक कौशल्याची गरज ओळखून नव्या विद्यापीठांना…”; Mangal Prabhat Lodha यांनी केले स्पष्ट

उद्योग व बाजारपेठेच्या बदलत्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार करून कुशल मनुष्यबळ तयार करणे यामुळे शक्य होणार आहे. ही खाजगी विद्यापीठे आधुनिक आणि उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 24, 2026 | 06:54 PM
"अत्याधुनिक कौशल्याची गरज ओळखून नव्या विद्यापीठांना..."; Mangal Prabhat Lodha यांनी केले स्पष्ट

"अत्याधुनिक कौशल्याची गरज ओळखून नव्या विद्यापीठांना..."; Mangal Prabhat Lodha यांनी केले स्पष्ट

Follow Us
Follow Us:

रोजगाराच्या संधी वाढविण्यावर विशेष भर
अत्याधुनिक कौशल्याची गरज ओळखून नव्या विद्यापीठांना मान्यता
कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत केले स्पष्ट

मुंबई: राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी देण्यात आली. या विधेयकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. नव्या युगातल्या अत्याधुनिक कौशल्याची गरज ओळखून नव्या विद्यापीठांना मान्यता देण्यात आल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले.

देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी देशभरात सुरु केलेली स्किल इंडिया योजना आतापर्यंत यशस्वीपणे राबवली जात आहे. याच धर्तीवर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वात कौशल्यपूर्ण आणि रोजगारक्षम महाराष्ट्र घडवण्याचं उदिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

रोजगारक्षम होण्याकरिता आवश्यक अशा नव्या युगातील कौशल्य शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असल्याने राज्यात कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना करण्याबाबतचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. यानुसार महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ ( सुधारणा) विधेयक आणण्यात आले आहे. या अनुषंगाने आता बांबू लागवड क्षेत्रात महतपूर्ण योगदान देणारे पाशा पटेल स्किल टेक् युनिव्हर्सिटी, लातूर आणि पुणे येथे फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जीसिंग लाईव्ह ( FUEL) या संस्थेचे फ्युएल स्किल टेक एंटरप्रेन्यूअरशिप युनिव्हर्सिटी या विद्यापीठांना मान्यता येण्यात आली आहे.

कौशल्य विकासावर भर; रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या

बदलत्या काळानुसार अत्याधुनिक अभ्यासक्रम
फ्युएल स्किल टेक एंटरप्रेन्यूअरशिप युनिव्हर्सिटी मध्ये बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील पदवी आणि डिप्लोमा अभ्यासक्रम तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात अत्याधुनिक तंत्रज्ञान AI क्षेत्रातील पदवी तसेच डिजिटल मार्केटिंग मधील अभ्यासक्रम ही यासंस्थेत घेतले जाणार आहे.
पाशा पटेल स्किल टेक् युनिव्हर्सिटी प्रामुख्याने पर्यावरण संवर्धनात विविध अत्याधुनिक अभ्यासक्रम राबवणार आहे. पर्यावरणातील विविध घटक आणि मानवी जीवन या आधारित हे अभ्यासक्रम असतील. त्याचबरोबर वन्यजीव संवर्धन, वातावरणीय बदल आणि उपाययोजना यासंदर्भातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रमही घेण्यात येणार आहेत. याच बरोबर पाशा पटेल कौशल्य विद्यापीठात माध्यम क्षेत्रातील कौशल्यावर आधारित मिडिया मॅनेजमेंट, ब्रॅण्डिंग आणि जाहिरात क्षेत्रातील विविध नावीन्यपूर्ण प्रशिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

खाजगी कौशल्य विद्यापीठामुळे शासनावर कोणताही आर्थिक भार न येता विद्यार्थ्यांना कौशल्य क्षेत्रात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योग व बाजारपेठेच्या बदलत्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार करून कुशल मनुष्यबळ तयार करणे यामुळे शक्य होणार आहे. ही खाजगी विद्यापीठे आधुनिक आणि उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक पातळीवरच रोजगारक्षम प्रशिक्षण मिळून त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

“गुढीपाडव्याच्या आधी गिरगावातील रस्त्यांची…”; Mangal Prabhat Lodha यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

राज्यातील युवकांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यासाठी अशा संस्थांची गरज आहे. या निर्णयामुळे राज्यातील कौशल्याधारित शिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळणार असून, उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दुवा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा यावेळी विधेयकाच्या चर्चेदरम्यान उपस्थित आमदारांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील स्थलांतर कमी करून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. विधान परिषदेनंतर विधानसभेत ही विधेयक मंजूर झाल्या नंतर या दोन्ही विद्यापीठाच्या कार्यवाहीच मार्ग मोकळा होणार आहे.

Web Title: Mangal prabhat lodha said new universities granted recognition in recognition of need state art skills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Mangal Prabhat Lodha
  • Skill Department

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
2

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
3

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश
4

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.