Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha: “परळ स्थानकात जलद गाडीच्या थांब्यासाठी…”: मंगल प्रभात लोढा

अनधिकृत पार्किंग केलेली बेवारस वाहने,वाहतूक नियंत्रणाचे प्रश्न,पाण्याचा दाब, शिधा वाटपातील समस्या यासह गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे प्रश्न यावेळी नागरिकांनी मांडले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 16, 2025 | 08:27 PM
Mangal Prabhat Lodha: “परळ स्थानकात जलद गाडीच्या थांब्यासाठी…”: मंगल प्रभात लोढा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: बहुराष्ट्रीय कंपन्या आणि विविध कॉर्पोरेट्स कार्यालयांमुळे परळ स्थानकात वर्दळ वाढली आहे. तसेच या भागात अनेक मोठी हॉस्पिटल्स असल्याने या स्थानकात जलद गाडीला थांबा मिळावा अशी जनतेची मागणी असून यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करू असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेतल्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात आयोजित केलेल्या जनता दरबारात ते बोलत होते. या जनता दरबाराला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला.

मंत्री मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, अशी सूचना महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना केली होती. या सूचनेला अनुसरूनच या जनता दरबाराचे आयोजन केल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले. जनता दरबाराच्या माध्यमाने जनतेचे प्रश्न सोडवून त्यांचे समाधान होई पर्यंत कार्यरत राहून लोकशाही अधिक बळकट करू, असेही त्यांनी म्हटले आहे.

Mangal Prabhat Lodha: “गणेश मंडळ आणि भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय…”; मंत्री मंगलप्रभात लोढा

एफ विभाग कार्यालयातल्या जनता दरबारात प्रशासनाच्या विविध बारा विभागांसह रेल्वे प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित होते. हे या जनता दरबाराचे वैशिष्ट्य ठरले. समस्या घेऊन आलेल्यांना एकाच छताखाली अधिकारीही उपलब्ध होत असल्याने आमचे हेलपाटे वाचले, असे उपस्थित नागरिकांनी सांगितले.

अनधिकृत पार्किंग केलेली बेवारस वाहने,वाहतूक नियंत्रणाचे प्रश्न,पाण्याचा दाब, शिधा वाटपातील समस्या यासह गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे प्रश्न यावेळी नागरिकांनी मांडले. या जनता दरबारात तीनशेपेक्षा अधिक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असून त्यातील २०० हुन अधिक नागरिकांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथल्या तिथे समाधान केले. त्याचबरोबर उर्वरित नागरिकांच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष न करता समस्यांचे निराकरण करावे असे आदेश मंत्री लोढा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. जनता दरबारात स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर, महापालिका एफ दक्षिण विभागातील सहायक आयुक्त महेश पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

Web Title: Mangal prabhat lodha said we will try to stop fast train stop in paral station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 08:27 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’ लोकांना सुनावलं; म्हणाले,”स्वातंत्र्यसेनानींचा यापेक्षा मोठा…”
1

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांनी ‘त्या’ लोकांना सुनावलं; म्हणाले,”स्वातंत्र्यसेनानींचा यापेक्षा मोठा…”

मुंबईची Monorail सेवा पुन्हा एकदा ठप्प; वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे MMRDA चा मोठा निर्णय
2

मुंबईची Monorail सेवा पुन्हा एकदा ठप्प; वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे MMRDA चा मोठा निर्णय

Mumbai Local Crime: “गर्दीचा फायदा घेतला आणि मला चुकीच्या…”, लोकलमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन
3

Mumbai Local Crime: “गर्दीचा फायदा घेतला आणि मला चुकीच्या…”, लोकलमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन

Devendra Fadnavis: “पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी…”; CM फडणवीसांनी दिली मान्यता
4

Devendra Fadnavis: “पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी…”; CM फडणवीसांनी दिली मान्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.