Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “हिंदू समुदायावर अन्याय करणाऱ्यांना…”; मंगलप्रभात लोढा काय म्हणाले?

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून त्यांनी त्या पीडित महिलेची भेट घेतली तसेच मालवणी पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कडक कारवाईची मागणी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: May 19, 2026 | 10:07 PM
Maharashtra Politics: “हिंदू समुदायावर अन्याय करणाऱ्यांना…”; मंगलप्रभात लोढा काय म्हणाले?
Follow Us
Follow Us:

मालवणीमधल्या अनधिकृत बांधकामाने पीडित महिलेची लोढा यांनी घेतली भेट 
अधिकाऱ्यांकडे कडक कारवाईसंदर्भात लोढा यांनी केली माहिती 
हिंदू समुदायावर अन्याय करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले जाणार 

मुंबई: मालवणी येथील स्थानिक नगरसेवक आणि आमदाराच्या आशीर्वादानेच अनधिकृत बांधकामाला खतपाणी मिळत असून स्थनिकांवर दबावतंत्राचा वापर करून बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आश्रय दिला जात असल्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. भू माफियांचा आणि अनधिकृत बांधकाम करणारे हिंदू समुदायावर अन्याय करत असून आता हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, तर त्यांना सडेतोड उत्तर देणार असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

बांगलादेशी आणि रोहिंग्यांची अनधिकृत बांधकामं देशाच्या सुरक्षेला धोका असून त्या विरोधात संघर्ष सुरूच राहील असेही लोढा यांनी सांगितले. मालवणी परिसरातील सावरिया मशीद येथे रागिणी रमाशंकर चौरसिया या महिलेचा घरचा दरवाजा बंद करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्या पीडित महिलेची भेट घेतल्या नंतर मंत्री लोढा पत्रकारांशी बोलत होते.

“कामगारांच्या कष्ट आणि योगदानामुळेच महाराष्ट्राचे…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

मालवणी अब्बासिया कंपाऊंड येथे राहणारी रागिणी रामशंकर चौरसिया या महिलेच्या घराला लागूनच शौकत हुसेन आबिद हुसेन सैय्यद यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीतर चौरसिया कुटुंबीयांना त्यांनी घरचा दरवाजा बंद करण्यास भाग पाडले. स्थानिक हिंदू संघटनांनी या बाबत आवाज उठवला होता. मात्र अबिद आणि हुसेन यांनी त्याकडे दुर्लक्ष करत ही बांधकाम अधिकृत असल्याचे सांगितले. मात्र प्रकरण पोलिसात गेल्यानंतर ते बांधकाम अधिकृतच असल्याचे निष्पन्न झाले.

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून त्यांनी त्या पीडित महिलेची भेट घेतली तसेच मालवणी पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कडक कारवाईची मागणी केली.आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी देशभरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्वांना सुरक्षित वातावरण निर्माण केले आहे.

“महाराष्ट्रात कुशल, प्रामाणिक आणि…”; ‘महाचतुर एआय चॅटबॉट’ बाबत काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

राज्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनात गृह विभाग अतिशय प्रभावीपणे कार्यरत आहे. या राज्यात हिंदू समुदायावरील अत्याचार सहन केला जाणार नाही, तर आरोपींवर कडक कारवाई होईल की, कुणाचेही हिंदू समुदायावर अन्याय करण्याचे धाडस होणार नाही, असा इशाराच असा इशाराच यावेळी मंत्री लोढा यांनी दिला.

स्थानिक आमदार असलम शेख यांचे नगरसेवक पुत्र इस्लाम शेख यांनीच अब्बासिया कंपाऊंड येथे रस्त्यावर अवैध छबील (पाणपोई) बांधकामाचे उद्घाटन केले होते. कोणतीही परवानगी नसताना ६ फूट बाय १२ फूट लांबी-रुंदीचे सिमेंट-विटांचे बांधकाम तब्बल १४ फूट उंचीपर्यंत वाढवण्यात आले आहे. यासाठी ६ लोखंडी खांब उभे करण्यात आले आहेत. यावर आता महापालिकेची कारवाई होत असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर ही फौजदारी कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Mangal prabhat lodha stated befitting reply who commit injustice against hindu community malvani rohingya people mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 10:07 PM

Topics:  

  • hindu religion
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mhada चा मोठा निर्णय! GTB नगरच्या रहिवाशांना मिळणार महिन्याला २० हजार, तर…
1

Mhada चा मोठा निर्णय! GTB नगरच्या रहिवाशांना मिळणार महिन्याला २० हजार, तर…

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
2

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग
3

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग

Mumbai Crime News: मैदानात खेळत होता १२ वर्षीय मुलगा; मागून आले अन् मानेत इंजेक्शन टोचलं, घाटकोपरमध्ये खळबळ
4

Mumbai Crime News: मैदानात खेळत होता १२ वर्षीय मुलगा; मागून आले अन् मानेत इंजेक्शन टोचलं, घाटकोपरमध्ये खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.