Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 ‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवणार! काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

केंद्र शासनाने २०२९ पर्यंत देश अमली पदार्थमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून अमली पदार्थांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई आणि व्यापक जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 28, 2026 | 07:43 PM
 ‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवणार! काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
Follow Us
Follow Us:

अमली पदार्थांविरुद्ध देशभरात उभारण्यात आला मोठा लढा
मंगल प्रभात लोढा नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष
‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचे मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार

मुंबई:  “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात अमली पदार्थांविरुद्ध एक मोठा लढा उभारण्यात आला आहे. याच लढ्याला महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या नेतृत्वाखाली अधिक बळ मिळत आहे. ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचे मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती’ची स्थापना होणार आहे. माझ्या निवेदनाची दखल घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानतो,” असे नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

या समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी सातत्याने जनजागृती केली जाईल. विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल वेळेत ओळखून त्यांना आवश्यक समुपदेशन उपलब्ध करून देणे, पालक व शिक्षकांमध्ये समन्वय साधणे तसेच गरज भासल्यास संबंधित तज्ज्ञांकडे मार्गदर्शनासाठी संदर्भित करण्याची जबाबदारीही या समित्यांवर असेल.

Mumbai: ड्रग्ज’ मृत्यू प्रकरणाने मुंबई हादरली! मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बोलावली तातडीची बैठक; ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा इशारा

केंद्र शासनाने २०२९ पर्यंत देश अमली पदार्थमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून अमली पदार्थांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई आणि व्यापक जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनानेही राज्यात व्यसनमुक्तीची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

३० जुलै रोजी वरळी डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ होत आहे. हा केवळ उद्घाटनाचा कार्यक्रम नसून वर्षभर चालणारी जनचळवळ आहे. या अभियानामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यात आला आहे.

“नशामुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र दिनापासून…”; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वर्षभर विविध जनजागृतीपर उपक्रम, मार्गदर्शन सत्रे, समुपदेशन कार्यक्रम तसेच व्यसनमुक्तीविषयी संवादात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. व्यसनमुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या या लोकचळवळीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्वयंसेवी संस्था तसेच सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

Web Title: Mangal prabhat lodha stated the drug free mumbai model will be expanded across maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Drugs News
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: आगीचा धोका टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेचा कायापालट! रुग्ण सुरक्षिततेसाठी पालिकेचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल
1

Mumbai News: आगीचा धोका टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेचा कायापालट! रुग्ण सुरक्षिततेसाठी पालिकेचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पा मोरया! गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्स्प्रेस’ कोकणकडे रवाना

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
3

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

लालबागच्या राजाच्या प्रसादाने उजळणार BMC हॉस्पिटल्स; काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या संकल्पना
4

लालबागच्या राजाच्या प्रसादाने उजळणार BMC हॉस्पिटल्स; काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.