Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. आझाद मैदान पोलिसांनी 19 सप्टेंबरला होणाऱ्या उपोषणाला परवानगी नाकारली असून, कायदा-सुव्यवस्था आणि गणेशोत्सवातील गर्दीचा दाखला देण्यात आला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 13, 2026 | 04:20 PM
मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

मुंबईत जरांगेंचा प्लॅन फसला? आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Follow Us
Follow Us:
  • 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील उपोषणाला पोलिसांचा नकार
  • गेल्या आंदोलनातील गर्दी आणि वाहतूक कोंडीचा पोलिसांकडून दाखला
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा उपस्थित
 

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. 19 सप्टेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यासाठी जरांगे यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. आपण पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व अटी-शर्तींचं पालन करू, असं हमीपत्रही त्यांनी दिलं होतं. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शाळा, रुग्णालयं, व्यवसाय, न्यायपालिका, सार्वजनिक वाहतूक आणि आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन परवानगी नाकारण्यात आली आहे.

गेल्या आंदोलनाचा पोलिसांकडून दाखला

याआधी झालेल्या जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाचा दाखलाही पोलिसांनी दिला आहे. त्या वेळी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या रस्त्यावर उतरले होते. सीएसएमटी परिसर आणि महानगरपालिका मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती आणि कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे.

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा

मागील वेळी आझाद मैदानात पाच हजार लोकांची मर्यादा ठेवून परवानगी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यापेक्षा मोठी गर्दी जमल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी परवानगी देताना पोलिसांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

गणेशोत्सवामुळेही पोलिसांची चिंता वाढली

यंदा मुंबईत गणेशोत्सवाचा माहोल असल्याने आधीच मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. विसर्जन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे शहरातील अनेक भागांमध्ये वाहतूक आणि सुरक्षेचं मोठं आव्हान असतं. अशा परिस्थितीत जरांगे यांच्या आंदोलनामुळे आणखी मोठी गर्दी होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर आता पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जरांगे या निर्णयावर काय भूमिका घेतात आणि 19 सप्टेंबरच्या मुंबई दौऱ्याबाबत पुढचा निर्णय काय घेतात, याकडे मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Web Title: Maratha reservation manoj jarange patil protest permission denied mumbai police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Mumbai News
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा
1

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा

Mumbai News: आगीचा धोका टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेचा कायापालट! रुग्ण सुरक्षिततेसाठी पालिकेचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल
2

Mumbai News: आगीचा धोका टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेचा कायापालट! रुग्ण सुरक्षिततेसाठी पालिकेचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल

Manoj Jarange Patil : ‘दोन जन्म झाले तरी जरांगेंची मागणी मान्य होणार नाही’; सदावर्तेंचा थेट इशारा, ठाकरेंनाही सुनावलं
3

Manoj Jarange Patil : ‘दोन जन्म झाले तरी जरांगेंची मागणी मान्य होणार नाही’; सदावर्तेंचा थेट इशारा, ठाकरेंनाही सुनावलं

Manoj Jarange Patil : ‘जरांगे भंपक माणूस, ऑस्करसाठी नामांकन पाठवा’; अजय बारसकरांची घणाघाती टीका
4

Manoj Jarange Patil : ‘जरांगे भंपक माणूस, ऑस्करसाठी नामांकन पाठवा’; अजय बारसकरांची घणाघाती टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.