Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local : मध्य रेल्वेवर १५ तासांचा विशेष ब्लॉक, अनेक लोकल ट्रेन रद्द, कसं असणार वेळापत्रक?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणासाठी आणि प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी १५ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 28, 2025 | 05:33 PM
मध्य रेल्वेवर १५ तासांचा विशेष ब्लॉक, अनेक लोकल ट्रेन रद्द, कसं असणार वेळापत्रक?

मध्य रेल्वेवर १५ तासांचा विशेष ब्लॉक, अनेक लोकल ट्रेन रद्द, कसं असणार वेळापत्रक?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई लोकल आणि मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणासाठी आणि प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी १५ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल सेवा आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. या ब्लॉकमुळे ३ मेल एक्स्प्रेस आणि ५९ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

८०३ मीटर लांब, १७.२ मीटर रुंद…, मुंबईचा महालक्ष्मी केबल ब्रिज कधी खुला होणार?

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १२ आणि १३ची लांबी २४ डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी वाढवण्यात येत आहे. फलाट विस्तारीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशामध्ये मध्य रेल्वेने दोन दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे मध्यरात्रीच्या वेळी हा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री ५ तासांचा. तर शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पहिला ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शुक्रवारी रात्री ११.३० ते शनिवारी पहाटे ४.३० वाजताच्या दरम्यान घेण्यात येणार आहे. तर दुसरा ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा/ वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद आणि धिम्या मार्ग/ अप आणि डाऊन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री ११.१५ ते रविवारी सकाळी ९.१५ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

Mumbai Heat Wave: मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत उष्णतेचा तडाखा, तापमान 38 अंशांवर; IMD ने दिली मोठी अपडेट

या ब्लॉकचा परिणाम मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवेवर होणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान लोकलसेवा रद्द राहणार आहेत. या दोन दिवसीय ब्लॉक कालावधीमध्ये ५९ लोकल आणि तीन मेल-एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत. तर ४७ मेल-एक्स्प्रेसवर या ब्लॉकचा परिणाम होणार आहे. काही मेल-एक्स्प्रेस दादर स्थानकावर थांबवण्यात येणार असून त्याच स्थानकावरून त्या परतीचा प्रवास सुरू करतील.

या ब्लॉक कालावधीमध्ये पुणे-सीएसएमटी डेक्कन, पुणे-सीएसएमटी इंटरसिटी आणि नांदेड-सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. प्रवाशांनी या कालावधीमध्ये मेल-एक्स्प्रेसच्या सविस्तर थांब्यांसाठी मध्य रेल्वेच्या वेबसाईटवरून माहिती घेण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Mega block mumbai local 15 hour mega block on central railway konw it local time table marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • Mega block
  • Mega Block Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Mumbai Local: मध्य रेल्वेवरील गर्दी कमी होणार! आता ठाणे-डोंबिवली मार्गावरून धावणार 15 डब्यांची लोकल
1

Mumbai Local: मध्य रेल्वेवरील गर्दी कमी होणार! आता ठाणे-डोंबिवली मार्गावरून धावणार 15 डब्यांची लोकल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.