Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MHADA lottery 2026: म्हाडाच्या 2,640 घरांसाठी नागरिकांचा तुफान प्रतिसाद! 75 हजारांहून अधिक अर्ज दाखल

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या 2,640 सदनिकांच्या संगणकीय सोडतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या सोडतीसाठी तब्बल 75,366 अर्ज प्राप्त झाले असून प्रत्येक सदनिकेसाठी सरासरी 28.54 अर्ज दाखल झाले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 01, 2026 | 05:50 PM
म्हाडाच्या 2,640 घरांसाठी नागरिकांचा तुफान प्रतिसाद! 75 हजारांहून अधिक अर्ज दाखल

म्हाडाच्या 2,640 घरांसाठी नागरिकांचा तुफान प्रतिसाद! 75 हजारांहून अधिक अर्ज दाखल

Follow Us
Follow Us:
  • म्हाडाच्या 2,640 घरांसाठी नागरिकांचा तुफान प्रतिसाद!
  • 75 हजारांहून अधिक अर्ज दाखल
  • नव्याने बांधकाम चालु असलेल्या सदनिका
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सोडतीसाठी ७५,३६६ अर्ज प्राप्त झाले असून प्रती सदनिका सरासरी २८.५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. ही बाब मुंबईकरांचा म्हाडावरील वाढता विश्वास आणि परवडणाऱ्या घरांसाठीची मोठी मागणी अधोरेखित करते.

मुंबई मंडळातर्फे संगणकीय सोडतीच्या प्रक्रियेची तयारी पूर्ण करण्यात येत असून विधान परिषद निवडणुकांसाठी लागू आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीची तारीख, वेळ व स्थळ जाहीर करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता (MCC) लागू असून सदर आचारसंहितेची अंतिम तारीख २५ जून, २०२६ आहे. भारतीय निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याच्या दिवसापासून ते संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अधिकृतपणे पूर्ण होईपर्यंत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सोडतीचा दिनांक जाहीर करण्यात येईल.

Sanjay Raut PC: ‘मोदींचा विकास कुणी समजावून सांगितला, तर मीही भाजपमध्ये जाईन’; संजय राऊतांचे खुले आव्हान

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ व मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाव्दारे प्राप्त विविध वसाहतीमधील विक्री योग्य एकुण २६४० सदनिका उपलब्ध झाल्या. या सदनिकांमध्ये नव्याने बांधकाम चालु असलेल्या सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) अंतर्गत विकासकांकडून प्राप्त सदनिका व पणन विभागातील विविध कारणांमुळे रिक्त व प्रतिक्षायादी संपुष्टात असलेल्या सदनिकांच्या विक्रीसाठी दिनांक ३० मार्च २०२६ रोजी विविध वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. यानुसार इच्छुक अर्जदारांना २८ मे २०२६ रोजीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली. मुंबई मंडळांने सदनिकांची कमी केलेली विक्री किमंत, काही योजनांना दिलेल्या सुविधा, पार्कीग सुविधा, उत्कृष्ठ दर्जाचे बांधकाम, योजनांची महत्वाची ठिकाणे, बाजारमुल्यापेक्षा कमी किंमत इत्यादीचा अर्जदारांकडून विचार करता सोडतीसाठी भरघोस प्रतिसाद प्राप्त झाला आहे.

सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी १० जून, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दि. १२ जून, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन दावे व हरकती दाखल करता येतील. त्यानंतर प्राप्त दावे-हरकतींची छाननी करून दि. १६ जून, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मुंबई मंडळाने ३० मार्च, २०२६ रोजी कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांसाठी २,६४० सदनिकांची संगणकीय सोडत जाहीर केली होती. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८, मध्यम उत्पन्न गटासाठी ७९८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी ८३९ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी बांधकाम सुरू असलेल्या सदनिकांच्या गटातील कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील संकेत क्रमांक ५३८ व ५३९ मधील १,२२१ सदनिकांच्या विक्री किमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आली. मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या १,२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका नवीन संकेत क्रमांक ५३८-अ व ५३९-अ अंतर्गत केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. या निर्णयामुळे उच्च उत्पन्न गटातील अधिकाधिक नागरिकांना आधुनिक सुविधा असलेले आणि परवडणाऱ्या किमतीतील घर मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली व त्यासही अर्जदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. संगणकीय सोडतीची तारीख, वेळ आणि स्थळ याबाबतची सविस्तर माहिती पुढील काळात म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला मोठा कात्री! ८० लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली

Web Title: Mhada mumbai lottery 2640 flats over 75366 applications draw after mcc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • MHADA Lottery 2026
  • Mumbai

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
2

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
3

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
4

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.