Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS Morcha : मराठी मोर्चावरून राडा, कार्यकर्त्यांची धरपकड; मीरा-भाईंदरमध्ये कलम 144 लागू

Mira Bhayandar MNS Morcha: मनसेकडून आज मीरा भाईंदर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी मनसैनिकांची अडवणूक केली आहे. अनेकांना ताब्यात घेतले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 08, 2025 | 11:44 AM
मराठी मोर्चावरून राडा, कार्यकर्त्यांची धरपकड; मीरा-भाईंदरमध्ये कलम 144 लागू (फोटो सौजन्य-X)

मराठी मोर्चावरून राडा, कार्यकर्त्यांची धरपकड; मीरा-भाईंदरमध्ये कलम 144 लागू (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Mira Bhayandar MNS Morcha News in Marathi : गेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदरमध्ये हिंदी-मराठी वाद उफाळून आला आहे. येथील ओम शांती चौकात व्यापाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्याच चौकातून आज (8 जुलै) मराठी एकीकरण समितीचा मोर्चा निघाला आहे. या मोर्चासाठी येणाऱ्या मराठी लोकांना आणि मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मीरा भाईंदर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून जमावबंदी केली जात आहे.

MNS Morcha : मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी का नाकारली परवानगी? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कोणत्याही पक्षाशी संबंध नसलेल्या मराठी महिला आणि पुरुषांनाही पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवून ताब्यात घेतले जात आहे. महाराष्ट्रात मराठी लोकांना परवानगी नाकारली जात आहे, मोरारजी देसाई यांच्या सरकारच्या अस्तित्वाबाबत मोर्चांकडून व्यक्त केला जाणारा हा निषेध आहे. विशेष म्हणजे, ३ जुलै रोजी याच चौकातून मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर मराठी एकजूट दाखवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले त्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.

दरम्यान मनसेकडून आज मीरा भाईंदर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी मनसैनिकांची अडवणूक केली आहे. अनेकांना ताब्यात घेतले आहे. मोर्चाच्या मार्गावर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

मराठी माणसाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सोमवारी रात्रीपासूनच ओम शांती चौकाला छावणीचे स्वरुप आले आहे. मंगळवारी पहाटे ३.३० वाजता मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आज सकाळी १० वाजल्यापासून मोर्चा काढण्यात आला. ओम शांती चौकात मराठी माणूस येथे एकवटू लागला त्यानंतर येथे महिला आणि पुरुषांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचे काम पोलिसांकडून सुरु करण्यात आले आहे.

मीरा रोड येथील मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत याचा निषेध केला आहे.

मीरा रोड येथे पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. पोलिसांचा विरुद्ध असतानाही ‘मराठी एकजुटीचा विजय असो’ अशी घोषणा देत मोर्चा निघाला आहे.या मोर्चात मराठी एकीकरण समिती, मनसे, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.महाराष्ट्रात मोरारजी देसाईचे राज्य आहे का, असा संतप्त सवाल मोर्चेकऱ्यांकडून केला जात आहे. महाराष्ट्र सरकारचा निषेध मोर्चेकऱ्यांकडून केला जात आहे.

Sanjay Raut: ‘त्या दलाल दुबेला सांगा महाराष्ट्राच्या नादी लागू नको’; संजय राऊतांनी दुबेंचे वाभाडे काढले

Web Title: Mira bhayandar mns morcha police prevention action 144 in mira bhayandar mns shiv sena ubt marathi manus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • mira bhayandar
  • MNS
  • Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai: पालिकेच्या तिजोरीत आता पर्यत विक्रमी वार्षिक कर भरणा; आतापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता कर वसुली
1

Navi Mumbai: पालिकेच्या तिजोरीत आता पर्यत विक्रमी वार्षिक कर भरणा; आतापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता कर वसुली

Single Screen Cinema Hall : मुंबईतील २४ सिंगल स्क्रीन सिनेमा गृह होणार इतिहासजमा, काय आहे आता नवीन प्लॅन?
2

Single Screen Cinema Hall : मुंबईतील २४ सिंगल स्क्रीन सिनेमा गृह होणार इतिहासजमा, काय आहे आता नवीन प्लॅन?

Mira-Bhayander : गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; एमडी ड्रग्ज बनवणारा कारखाना उद्ध्वस्त
3

Mira-Bhayander : गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; एमडी ड्रग्ज बनवणारा कारखाना उद्ध्वस्त

लालबाग राजाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा अपघात, भरधाव वाहनानं दोन चिमुकल्यांना चिरडलं, 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू तर एक जखमी
4

लालबाग राजाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा अपघात, भरधाव वाहनानं दोन चिमुकल्यांना चिरडलं, 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू तर एक जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.