Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadanvis: सागर बंगल्यावर घडामोडींना वेग; भाजप नेत्यांसह मनसेचा ‘हा’ शिलेदार फडणवीसांच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले. तसेच मनसेच्या मदतीने भाजपचा मुख्यमंत्री होईल अशा प्रकारचे विधान त्यांनी केले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 22, 2024 | 03:44 PM
Devendra Fadanvis: सागर बंगल्यावर घडामोडींना वेग; भाजप नेत्यांसह मनसेचा 'हा' शिलेदार फडणवीसांच्या भेटीला

Devendra Fadanvis: सागर बंगल्यावर घडामोडींना वेग; भाजप नेत्यांसह मनसेचा 'हा' शिलेदार फडणवीसांच्या भेटीला

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यास काहीच कालावधी शिल्लक राहील आहे. दरम्यान एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती आणि महविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन्ही बाजूने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान राज्यात निकाल जाहीर होण्याआधीच वेगवान घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची वर्दळ वाढली आहे. बहुमत न मिळाल्यास महायुतीने प्लॅन बी देखील तयार केला असल्याचे समजते आहे.

विधानसभा निकालाआधी सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची बैठक बोलवल्याचे समजते आहे. भाजपचे अनेक मोठे नेते या बैठकीला हजर असल्याचे समजते आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांना एकत्रित करण्यासाठी किंवा पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावली असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे मनसेचे नेते बाळा नांदगांवकर देखील या बैठकीला उपस्थित असल्याचे समजते आहे.  विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे. गिरीश महाजन, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आले आहेत. तर, मनसेचे बाळा नांदगावकर यांन देखील फडणवीसांची भेट घेतली आहे.

काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे

 

पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 77 ते 108 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला 37 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसला 18 ते 30 जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत कॉँग्रेसला 28 ते 47 जागा मिळू शकतात. ठाकरेंच्या शिवसेनेला 16 ते 35 तर शरद पवार यांच्या पक्षाला 25 ते 39 जागा मिळू शकतात.

हेही वाचा:  Maharashtra Exit Polls 2024: महाराष्ट्राच्या जनतेनं कौल दिला; एक्झिट पोलमध्ये समोर आली आश्चर्यकारक आकडेवारी

चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येत असल्याचे दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 150 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर 6 ते 8 जागांवर अपक्ष उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, हा अंदाज चाणक्य एक्झिट पोलने दिलेला आहे.

पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येताना दिसत आहे. महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यात अपयश दिसत आहे. पीपल्स प्लसच्या अंदाजानुसार राज्यात महायुतील 182 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी शंभरी देखील पार करू शकत नाही असे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीला विधानसभेत केवळ 97 जागा मिळतील असा अंदाज पीपल्स पल्सने  व्यक्त केला आहे.

हेही वाचा:  Maharashtra Exit Polls 2024: महाराष्ट्राच्या जनतेनं कौल दिला; एक्झिट पोलमध्ये समोर आली आश्चर्यकारक आकडेवारी

 मनसेची भूमिका ठरणार महत्वाची

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले उमेदवार जाहीर केले. तसेच मनसेच्या मदतीने भाजपचा मुख्यमंत्री होईल अशा प्रकारचे विधान त्यांनी केले होते. सध्या समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा किंगमेकर होण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title: Mns bala nandgaonkar and many bjp leader meet devendra fadanvis at sagar bunglow before election result

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
3

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
4

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.