Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा

रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान मिळाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदाबाबत मोठा दावा केला. तर आमदार अनिकेत तटकरे यांनी अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेमंडळी घेतील, असे स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Aug 15, 2026 | 07:14 PM
भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांची ‘आग्रा’वरील मिश्किल टिप्पणी चर्चेत

भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांची ‘आग्रा’वरील मिश्किल टिप्पणी चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • ध्वजारोहणाचा मान मिळाल्यानंतर भरत गोगावलेंचा पालकमंत्रीपदावर दावा
  • ‘पालकमंत्रीपद मिळण्यात कुठलाही अडथळा नाही’ : भरत गोगावले
  • अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेमंडळी घेतील : अनिकेत तटकरे
 

रायगड : देशभरात आज ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध जिल्ह्यांमध्ये मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मात्र, रायगडचे पालकमंत्रीपद अद्याप निश्चित झालेले नसल्याने या कार्यक्रमानंतर राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले.

ध्वजारोहणानंतर माध्यमांनी भरत गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला. त्यावर गोगावले यांनी आपल्यालाच पालकमंत्रीपद मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे, त्याचप्रमाणे पालकमंत्रीपदाचाही निर्णय लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले.

‘पालकमंत्रीपद मिळण्यात अडथळा नाही’

रायगडचे पालकमंत्रीपद मिळण्यात आता कोणताही अडथळा राहिलेला नाही, असा दावा भरत गोगावले यांनी केला. त्यामुळेच आपण पालकमंत्रीपदाबाबत ठामपणे बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते’, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; मुंडेंनी मंत्रिपदाची अट घातल्याचा चव्हाणांचा दावा

महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न चर्चेत आहे. रायगडमध्ये भरत गोगावले आणि अदिती तटकरे हे दोन्ही नेते पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या पदाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

अनिकेत तटकरे म्हणाले, ‘वरिष्ठ निर्णय घेतील’

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांनीही रायगडच्या पालकमंत्रीपदावर भाष्य केले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेतेमंडळी या विषयावर निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

रायगडच्या हितासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीतील सर्व घटक एकत्रितपणे काम करतील, अशी भूमिका अनिकेत तटकरे यांनी मांडली. त्यामुळे पालकमंत्रीपदाचा निर्णय कोणाच्या बाजूने लागणार, याबाबतची उत्सुकता कायम आहे.

रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय कधी?

एकीकडे शिवसेना शिंदे गटाकडून भरत गोगावले यांचे नाव पालकमंत्रीपदासाठी पुढे केले जात आहे. स्वतः गोगावले यांनीही पद लवकरच आपल्याला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांचे नाव चर्चेत असल्याने महायुतीतील समीकरणांकडे लक्ष लागले आहे.

‘संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा’; हर्षवर्धन सपकाळांचा RSS-BJP वर हल्लाबोल

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर गोगावले यांच्या वक्तव्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय आता लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवर होणार असल्याने अधिकृत घोषणेची प्रतीक्षा कायम आहे.

Web Title: Raigad guardian minister post bharat gogawale big statement independence day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Mahayuti
  • raigad
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
1

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
2

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
3

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना
4

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.