मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी खासदार शिवसेना नेते संजय राऊत नवाब मलिक त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक, मुलगी सना खान, बहीण नगरसेविका सईदा खान यांच्या सह सर्व कुटुंब उपस्थित आहे. तर संजय राऊत यांच्यासह त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत ही उपस्थित आहेत.
ऐकीकडे अंमलबजावणी संचालनालयाने नवाब मलिक यांना अटक केल्यापासून भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. परंतु महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांच्या पाठीशी असून त्यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे. या सगळ्या पार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी मंत्री नवाब मलिकांच्या घरी भेट घेतली.
[read_also content=”सोलापुरात राज्यपालांच्या दौऱ्यात जोरदार निदर्शनं; छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा होतोय विरोधात https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/solapur/violent-protests-during-governor-bhagat-singh-koshyari-visit-to-solapur-contrary-to-the-statement-made-about-chhatrapati-shivaji-maharaj-nrps-248965.html”]
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप नेत्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजप आमदार जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करत आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांच्या शेजारी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी बॅनर ठेवला असून त्यावर भाजपचे सर्व आमदार स्वाक्षरी करत आहेत. नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विधीमंडळाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते.