Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Budget Session 2026 : विरोधी पक्षनेत्या शिवाय अधिवेशन का? हा भाजपचा अहंकार; संजय राऊतांची जोरदार टीका

विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता राहिलेला नाही. त्यामुळे विरोधकांचा आवाज विधीमंडळामध्ये उरला नसल्याचे दिसून येत आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 23, 2026 | 12:36 PM
Sanjay Raut, ShivSena UBT, Narendra Modi, Prajakt Tanpure,

Sanjay Raut, ShivSena UBT, Narendra Modi, Prajakt Tanpure,

Follow Us
Follow Us:
  • संजय राऊत यांनी घेतली पत्रकार परिषद
  • विरोधी पक्षनेता नसल्यामुळे केली टीका
  • हा भाजपचा अहंकार असल्याचे म्हटले
Maharashtra Budget Session 2026 : मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2026) सुरु झाले आहे. यंदाच्या अधिवेशनाला दुःखाची किनार आहे. दिवंगत नेते अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनावर शोककळा पसरली आहे. तब्बल तीन दशकानंतर अजित पवारांशिवाय अर्थसंकल्प सादर होत आहे. यावेळी मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्यपाल्यांच्या अभिभाषणासह अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. मात्र यावेळी देखील विरोधी पक्षनेता नसल्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर खासदार संजय राऊत (MP Sanjay raut) यांनी देखील सरकरावर टीकास्त्र डागले.

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असे झाले आहे की विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता राहिलेला नाही. त्यामुळे विरोधकांचा आवाज विधीमंडळामध्ये उरला नसल्याचे दिसून येत आहे. तसेच जनतेची बाजू मांडण्यासाठी विरोधी पक्षनेता महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मात्र यावेळी देखील विरोधी पक्षनेत्याशिवाय अर्थसंकल्प सादर होणार आहे. हा भाजपचा अहंकार असून हे लोकशाही साठी बरोबर नाही अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.

हे देखील वाचा :राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; तीन दशकानंतर अजित पवारांशिवाय अधिवेशन

मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, – विरोधी पक्ष नेत्या शिवाय अधिवेशन का चालवले जात आहे? हा कसला अहंकार आहे. भाजप, शिंदे गट तसेच वागत आहे. दिवंगत नेते अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेता असला पाहिजे अशी मागणी होती. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे पाहिजे का ? हे लोकशाही साठी बरोबर नाही. कोणीही विरोधी पक्ष नेता विषयी सोडला नाही … भुजबळ होते ना तेव्हा .. काँग्रेसचा काळात विरोधी पक्षनेत्याला मान दिला होता, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी

मविआचे प्रमुख नेते म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, तर राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसला संधी देण्यात यावी, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, हा प्रामुख्याने विधिमंडळाचा विषय आहे. जेव्हा आमचे तिन्ही पक्षांचे नेते (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी) एकत्र बसतील, तेव्हाच कोणाला कोणती जागा द्यायची हे ठरवले जाईल. अद्याप याची कोणतीही अधिकृत कार्यवाही सुरू झालेली नाही,उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा विधिमंडळात सक्रिय व्हावे, ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, त्यांची स्वतःची इच्छा काय आहे, याची चाचपणी आम्हाला करावी लागेल. तिन्ही पक्षांची भूमिका ऐकून घेतल्यावरच अंतिम निर्णय जाहीर होईल. अनेक नेते बाहेर मतप्रदर्शन करतात, त्यांना करु दे, अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.

Web Title: No leader of opposition in the maharashtra legislative assembly mp sanjay raut criticizes bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Budget Session
  • Maharashtra Politics
  • MP Sanjay Raut

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधीं आज पुणे दौऱ्यावर; तरुणांशी साधणार संवाद,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क
1

Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधीं आज पुणे दौऱ्यावर; तरुणांशी साधणार संवाद,दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क

Maharashtra Breaking News Today 2026:  NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर
2

Maharashtra Breaking News Today 2026: NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?
3

Maharashtra Politics: फडणवीसांची सावध पाऊले; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार का घेतला स्वतःकडे?

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण
4

Navi Mumbai bars closed: नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.