Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

MSRTC News: एसटी महामंडळावर चालू महिन्यात 1,071 कोटी रुपयांची थकबाकी झाल्याच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने आर्थिक व्यवहारांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. एसटीला दिलेल्या 200 कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाच्या परतफेडीसह विविध आर्थिक मुद्द्यांचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 09, 2026 | 11:33 AM
एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशेब (फोटो सौजन्य-ChatGPT)

एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशेब (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • एसटीवर 1,071 कोटींच्या थकबाकीचा डोंगर
  • वित्त विभागाचा कठोर पवित्रा
  • आर्थिक व्यवहारांचा अहवाल मागवला
MSRTC News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर (एसटी) चालू महिन्यात एक हजार ७१ कोटी रुपयांच्या थकबाकीचा डोंगर उभा राहिल्याच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने महामंडळाच्या आर्थिक व्यवहारांबाबत कठोर पवित्रा घेतला असून, एसटीला यापूर्वी दिलेल्या 200 कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाच्या परतफेडीसह विविध मुद्द्यांवर सविस्तर अहवाल मागवला आहे, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी बुधवारी दिली. (MSRTC News)

एसटी महामंडळाची गेल्या दोन , तीन वर्षातील सुमारे 4500 कोटी रुपयांहून अधिक वैधानिक देणी थकीत आहेत. त्यात कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅज्युइटीची सुमारे 3,000 कोटी रुपयांची थकबाकी असून, हल्लीच झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ फरकाची 480 कोटी 53 लाख रुपयांची रक्कम शासनाने कबूल करूनही एसटीला दिलेली नाही.,डिझेल आणि सुट्या भागांपोटी आणखी सुमारे 100 कोटी रुपये देणे बाकी आहे, असेही बरगे यांनी सांगितले.

ST Bus Smart Card: आधी कार्ड काढा, मग पैसे भरा अन् सवलत मिळवा! STच्या स्मार्ट कार्ड नियमांमुळे ग्रामीण प्रवाशांची खरी कसोटी

वेतन देण्याच्या क्षमतेवरही दबाव

एकीकडे महामंडळाचा संचित तोटा सातत्याने वाढत असताना, दुसरीकडे कर्मचारी देणी, पीएफ-ग्रॅज्युइटी, डिझेल, सुटे भाग आणि इतर देयकांची थकबाकी वाढत आहे. त्यामुळे एसटीच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर तसेच भविष्यातील वेतन देण्याच्या क्षमतेवरही दबाव वाढत असल्याचे बरगे यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना निव्वळ वेतन देण्यातही अडचणी

एसटी कर्मचाऱ्यांच्या पूर्ण वेतनाला महिन्याला 540 कोटी रुपये लागतात पण पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने सध्या 330 कोटी रुपये इतके नक्त वेतन दिले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची देणी रक्कम मोठ्या प्रमाणावर थकीत असून”थकबाकीचा हा डोंगर वाढत असताना एसटीसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांना निव्वळ वेतन देण्यातही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे,” असे बरगे म्हणाले. दरम्यान, शासनाच्या वित्त विभागाने एसटी महामंडळाला दिलेल्या 200 कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाची रक्कम अद्याप शासनाकडे परत का जमा करण्यात आलेली नाही, याचा स्वयंस्पष्ट अहवाल मागितला आहे.

प्रस्तावासोबत सादर करण्याचे निर्देश

विशेष लेखापरीक्षणाचा (Special Audit) अहवाल प्राप्त झाला असल्यास तो सादर करावा, तसेच लेखापरीक्षण अहवालासह संबंधित प्रतिपूर्तीबाबत सविस्तर तपशील पुढील प्रस्तावासोबत सादर करण्याचे निर्देश वित्त विभागाने दिले आहेत. डॅशबोर्डवर मागील कालावधीतील रकमा समाविष्ट करण्याची कार्यवाही झाल्याचे दिसून येत नसल्याने, त्यासाठी वित्त विभागाला आवश्यक लॉगिन उपलब्ध करून देण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

वित्त विभागाने एसटीच्या आर्थिक व्यवहारांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. शासनाकडून मिळालेल्या 200 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड का झाली नाही, याचा अहवाल मागविणे ही गंभीर बाब आहे, असे बरगे यांनी सांगितले. “एका बाजूला संचित तोटा वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला देणी थकीत आहेत. शासनाने या गंभीर आर्थिक परिस्थितीत तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे,” असे बरगे यांनी सांगितले.

Pratap Sarnaik: ‘विना वाहक’ बससेवा वाढवणार? एसटीचा आर्थिक डोलारा मजबूत करण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा नवा मंत्र

Web Title: Msrtc news financial crisis rs 1071 crore dues finance department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी
1

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी
2

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई
3

Private Coaching Classes Rules: ट्यूशन क्लासेसच्या मनमानीला चाप: शाळेतील पूर्णवेळ शिक्षकांना शिकवणी घेण्यास सक्त मनाई

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण
4

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.