Mumbai News: मुंबईला पावसातून मोठा दिलासा! पालिकेने 5 दिवसांत उपसले तब्बल 180 कोटी लिटर पाणी
Satara News: पोलीस बंदोबस्तात मसूर ग्रामपंचायतीकडून बेकायदेशीर व्यापारी गाळे सील
मुंबई सखल भागात वसलेली असल्याने दरवर्षी पावसाचे पाणी साचण्याची समस्या मुंबईकरांना भेडसावते. यावर मात करण्यासाठी पालिकेच्या पर्जन्यजलवाहिनी विभागाने यंदा शहर आणि उपनगरात मिळून एकूण ५४७हाय-कॅपॅसिटी पाणी उपसा पंप तैनात केले होते. पावसाचा जोर आणि पाण्याचा साठा पाहून काही पंप २ तास, तर काही संवेदनशील भागांतील पंप सलग २४ तास अविरतपणे चालवण्यात आले. (फोटो सौजन्य: Pinterest)
दरवर्षी पावसाळ्यात मुंबई पाण्याखाली जाते अशी टीका पालिकेवर होते. मात्र, यंदा आधुनिक तंत्रज्ञान आणि सूक्ष्म नियोजनामुळे पालिकेने ही टीका खोडून काढली आहे. पाऊस ओसरल्यानंतर अवघ्या तासाभरात पाण्यावा उपसा करण्यात पर्जन्य जलवाहिनी विभागाला यश आले. या यशस्वी मोहिमेबद्दल बोलताना पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईकरांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून आमचे कर्मचारी २४ तास मैदानावर होते. ५४७ पंपांच्या मदतीने १८० कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी उपसणे हे एक मोठे आव्हान होते, जे पालिकेने यशस्वीपणे पेलले.
या कामगिरीसाठी पालिकेने मुंबई शहरात १४६ पंप, पूर्व उपनगरात १७८ पंप आणि सर्वाधिक पाणी साचण्याची शक्यता असलेल्या पश्चिम उपनगरात २२३ पंप असे एकूण ५४७ पंप तैनात केले होते. पालिकेच्या या तत्परतेमुळे यंदाच्या पहिल्या मोठ्या पावसाच्या स्पेलमध्ये मुंबई सुरक्षित राहिली असून, मुंबईकरांनीही पालिकेच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.
Slum Rehabilitation: झोपडपट्टी पुनर्वसनाचा मार्ग मोकळा! फडणवीसांकडून नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी
या पाच दिवसापैकी २ आणि ३ जुलै रोजी मुंबईत पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला होता. याच दोन दिवसात समुद्रात मोठी भरती असतानाही, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे कर्मचारी २४ तास तैनात होते. या संकटसमयी पालिकेने सर्वाधिक पाण्याचा निचरा केला, ज्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि लोकल सेवा विस्कळीत झाली नाही.






