Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप

मुंबईतील देवनार परिसरात जुन्या वादातून 14 वर्षीय हफिस शेख याला कथितरित्या विहिरीत ढकलल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या मुलांमध्ये वाद झाल्यानंतर ही घटना घडली. गोवंडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 09, 2026 | 08:15 PM
Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप
Follow Us
Follow Us:
  • देवनारमध्ये जुन्या वादातून 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकलल्याचा आरोप.
  • हफिस शेखचा बुडून मृत्यू; रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले.
  • गोवंडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका १४ वर्षीय मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या मुलाचे नाव हफिस शेख असे आहे. तो बैंगनवाडी परिसरात राहत होता. काही मित्रांसोबत तो देवनार गावाजवळील एका मोकळ्या जागेत खेकडे पकडण्यासाठी गेला होता. या परिसरात अनेक झुडपे आणि एक जुनी विहीर आहे. मुलांचा गट विहिरीजवळ खेळत आणि खेकडे पकडण्यात व्यस्त असताना अचानक वाद झाल्याचे सांगितले जात आहे. याच वादात एका अलपवयीन मुलाने हफिसला जोराचा धक्का दिला. तो थेट विहिरीत पडला. हफिसला पोहता येत नसल्याने तो पाण्यातून बाहेर येऊ शकला नाही. काही वेळातच तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले.

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर

हफिसला तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही शोककळा पसरली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर गोवंडी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि पूर्वीचा वाद कशामुळे होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास आणि कारवाई पोलीस करत आहे.

मुंबईतील राज्यपालांच्या लोकभवनात SRPF जवानाची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या

मुंबईतील मलबार हिल परिसरातील राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या लोकभवनातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरक्षेच्या ड्युटीवर असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) 26 वर्षीय जवानाने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

 

खंडणी मागणारे ‘ते’ पाच पोलिस अटकेत; आता फरार पोलिस नाईकाचा शोध सुरू

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत मुलाचे नाव काय आहे?

    Ans: हफिस शेख.

  • Que: घटना कशी घडली?

    Ans: वादादरम्यान धक्का लागून तो विहिरीत पडला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: हत्येचा गुन्हा दाखल करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

Web Title: Mumbai crime 14 year old boy pushed into well while catching crabs murder alleged over old dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स
1

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स

Akola Crime: पैशांच्या वादातून मित्राचाच खून; अपघाताचा बनाव करत रुग्णालयात दाखल, पण 3 तासांत पोलिसांनी उलगडला कट
2

Akola Crime: पैशांच्या वादातून मित्राचाच खून; अपघाताचा बनाव करत रुग्णालयात दाखल, पण 3 तासांत पोलिसांनी उलगडला कट

Mumbai Lake Level: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! सात तलावांमधील पाणीसाठा ४८ टक्क्यांच्या पार; ‘तुळशी’, ‘विहार’ तलाव ओव्हरफ्लो…
3

Mumbai Lake Level: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! सात तलावांमधील पाणीसाठा ४८ टक्क्यांच्या पार; ‘तुळशी’, ‘विहार’ तलाव ओव्हरफ्लो…

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर
4

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.