Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कशेडी घाटात दरड कोसळली! महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम; मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन पूर्णतः बंद

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. घटनास्थळी पोलीस, महसूल विभाग आणि महामार्ग प्रशासनाने तत्काळ धाव घेत पर्यायी मार्गाने एकेरी वाहतूक सुरू केली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 15, 2026 | 09:37 AM
कशेडी घाटात दरड कोसळली! महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम; मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन पूर्णतः बंद

कशेडी घाटात दरड कोसळली! महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम; मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन पूर्णतः बंद

Follow Us
Follow Us:
  • कशेडी घाटातील हॉटेल अन्नपूर्णा परिसरात दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला.
  • प्रशासनाने तळ कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
  • वारंवार होणाऱ्या दरडीच्या घटनांमुळे चौपदरीकरणाच्या कामाच्या पद्धतीवर स्थानिक नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चोळई व धामणदेवी गावच्या मध्यावर हॉटेल अन्नपूर्णा जवळ दरड कोसळून मुंबई दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली असून तहसील व पोलीस प्रशासनामार्फत तळ कोकणात जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सदर घटना मंगळवार रोजी रात्री ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. हॉटेल अन्नपूर्णा समोर महामार्गावरून पोलीस प्रशासनाने मुंबई दिशेने जाणारा रस्ता बंद केला आहे तर चोळई जवळ वाहतूक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर दुहेरी मार्गाने वाहतूक सुरळीत केली आहे.

Mumbai News: ‘सीएसएमटी ‘च्या घुमटाला गळती! जुन्या दगडांचा सच्छिद्रपणा कारणीभूत; आरएलडीएने दिले स्पष्टीकरण

दरड कोसळण्याची घटना समजताच पोलादपूर पोलीस व कशेडी पोलीस यांच्यासह पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदरावडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जागेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेहनत घेतली. या घटनेची माहिती समजताच महाडचे उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे यांनीही घटनास्थळी धाव घेत महसूल अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन व सूचना केल्या आहेत. दरम्यान पावसाळ्याचे दिवस असले तरी गेले आठ दिवस पावसाने दांडी मारून उघडीप दिली असून दरड कोसळल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे

तसेच मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामात ठेकेदार व संबंधित महामार्ग प्रशासन बांधकाम विभाग यांनी कशेडी घाटातील भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेता डोंगर उभे कापल्यामुळे या वारंवार होणाऱ्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न या विभागातील स्थानिक नागरिक आणि प्रवासी जनतेकडून व्यक्त केला जात आहे. रात्रीची वेळ असली तरी तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्यासह पोलादपूर पोलीस, कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी व एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल असून जागता पहारा देत असून वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसून आला आहे.

वारंवार दरडी कोसळण्याच्या आणि जमिनीला भेगा पडण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण आणि चौपदरीकरण झाले पाहिजे ही प्रामुख्याने कोकणातील पत्रकारांची भूमिका होती. मात्र चौपदरीकरण कामात रस्त्याची आधीची वळणे कमी न करता डोंगर माथ्यामध्ये घाटातील डोंगर उभे कापल्याने त्याचा परिणाम कधी ना कधी हे डोंगर सातत्याने खाली कोसळतील हे यापूर्वीच दिसून येत होते

तसेच अतिवृष्टी दरडी कोसळणे जमिनीला भेगा पडणे, संपूर्ण रायगड जिल्ह्यासह कोकणात जिथे जिथे बांधकाम खात्याने छेद दिला तिथे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. मातीचे होणारे उत्खनन, खोदकामात होणारे ब्लास्टिंग यामुळे पावसाळ्यात पडणारे पाणी आणि त्यातून डोंगर भागात निर्माण होणारा ओलावा त्यामुळेही भेगा अधिक पडण्याचे प्रमाण आणि जमीला तडे जाण्याचे प्रमाण दिसून येत आहे, अशी भावना पत्रकारांसह स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

Jayant Patil On Fadnavis Meeting: ‘मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तटकरे-पटेल यांच्यासोबत बैठक’? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

कोकणातील आंबेनळी घाट, कशेडी घाट, वरंधघाट अशा घाटमाथ्यावर होणाऱ्या ह्या दुर्घटना टाळण्यासाठी बांधकाम विभाग प्रशासन यांनी भूगर्भ शास्त्रज्ञांची मदत घेऊन या गोष्टीवर काही उपाययोजना करता येतील का? याचा अभ्यास करणे गरजेचे बनले आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने ताम्हणी घाट, भोर घाट, आंबेनळी घाट या तीनही घाट मार्गावरील एसटी वाहतूक बंद असल्याने पुणे सह पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे मार्ग बंद असल्याने प्रवासी जनतेला याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गेली अनेक दिवस वाहतूक बंद असल्याने एसटी महामंडळालाही याचा मोठा फटका बसला आहे. यासाठी पावसाळ्यादरम्यान वारंवार होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग प्रशासन, राज्यमार्ग प्रशासन, बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी समन्वय साधून यावर मार्ग काढणे गरजेचे बनले आहे.

Web Title: Mumbai goa highway kashedi ghat landslide disrupts traffic one way transport started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Liquor Ban: दारूबंदीचा निर्णय बिहारसाठी ठरला शाप? ‘BAI’च्या नव्या रिपोर्टने मोठी खळबळ; नेमकं काय घडलं?
1

Liquor Ban: दारूबंदीचा निर्णय बिहारसाठी ठरला शाप? ‘BAI’च्या नव्या रिपोर्टने मोठी खळबळ; नेमकं काय घडलं?

कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी गूड न्यूज! Poultry व्यवसायातील कमाई वाढणार; बनणार सर्वात फायदेशीर बिझनेस
2

कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी गूड न्यूज! Poultry व्यवसायातील कमाई वाढणार; बनणार सर्वात फायदेशीर बिझनेस

LPG News: आताच जपून वापरा… पुन्हा गॅस टंचाईचं टेन्शन? ‘होर्मुझ’ तणावामुळे 90% LPG पुरवठा धोक्यात; कंपन्या तोट्यात
3

LPG News: आताच जपून वापरा… पुन्हा गॅस टंचाईचं टेन्शन? ‘होर्मुझ’ तणावामुळे 90% LPG पुरवठा धोक्यात; कंपन्या तोट्यात

‘सगळं उद्ध्वस्त होईल…’, शेतकऱ्यांचा संताप, पंजाबमध्ये India-US Trade Deal विरोधात आंदोलन, नेमक्या मागण्या काय?
4

‘सगळं उद्ध्वस्त होईल…’, शेतकऱ्यांचा संताप, पंजाबमध्ये India-US Trade Deal विरोधात आंदोलन, नेमक्या मागण्या काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.