Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FSSAI परवाना नसल्याची कबुली, दोन रुग्णालयांतील कॅन्टीन बंद; रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

मुंबईतील महापालिका रुग्णालयांच्या कॅन्टीनच्या परवान्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आवश्यक परवाने आणि कंत्राटांच्या मुद्द्यामुळे दोन रुग्णालयांतील कॅन्टीन सेवा बंद झाल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2026 | 10:35 AM
FSSAI परवाना नसल्याची कबुली, दोन रुग्णालयांतील कॅन्टीन बंद; रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

FSSAI परवाना नसल्याची कबुली, दोन रुग्णालयांतील कॅन्टीन बंद; रुग्णांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • ट्रॉमा केअर रुग्णालयातील कॅन्टीन चालकाने आवश्यक परवाने नसल्याचे मान्य केले.
  • राजावाडी रुग्णालयातील कॅन्टीनही कंत्राटाची मुदत संपल्याने बंद.
  • दोन्ही ठिकाणी कॅन्टीन बंद असल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना बाहेरून खाद्यपदार्थ घ्यावे लागत आहेत.
सार्वजनिक रुग्णालयांमधील कॅन्टीनच्या परवान्ऱ्यांचा आणि कंत्राटांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महापालिका ट्रॉमा केअर रुग्णालयातील कॅन्टीन परवान्यांअभावी बंद झाल्यानंतर आता घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातील कॅन्टीनही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना चहा-नाश्ता तसेच जेवणासाठी रुग्णालयाबाहेर धाव घ्यावी लागत आहे.

Bhuleshwar Ganapati Incident: मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट; ‘भुलेश्वरचा राजा’ची मूर्ती कोसळली, दोघांचा मृत्यू

एचबीटी ट्रॉमा केअर रुग्णालयातील कॅन्टीन चालविणाऱ्या केटरर्सने ३ ऑगस्ट रोजी वैद्यकीय अधीक्षकांना पत्र देऊन कॅन्टीन सेवा तत्काळ बंद करण्याचे कळविले, केटरर्सने एफएसएसएआय, आरोग्य आणि अग्निशमन विभागाचे वैध परवाने उपलब्ध नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. आवश्यक वैधानिक परवान्यांअभावी कॅन्टीन सुरू ठेवणे कर्मचारी आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचेही चालकाने दिलेल्या म्हटले आहे.

खबरदारी म्हणून सेवा बंद केल्याची चर्चा

दरम्यान, संबंधित महापालिका विभागाकडून कॅन्टीनची पाहणी करून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे एफडीएच्या संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर कॅन्टीन चालकाने खबरदारी म्हणून सेवा बंद केल्याची चर्चा आहे. महापालिकेकडून या कॅन्टीनची तपासणी केली असल्याची माहिती मिळत आहे, तर ट्रॉमा केअर रुग्णालयातील कॅन्टीनकडून मे महिन्यात आवश्यक अनुपालन करण्यात आले आहे. सध्या कोणतीही बाब प्रलंबित नसल्याचे एका एफडीए अधिकाऱ्याने सांगितले.

मोठी बातमी ! बोगस लाडक्या बहिणींचा 9605 कोटींवर डल्ला; राज्य सरकार आता ‘त्या’ महिलांकडून पैसे करणार वसूल?

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय

राजावाडी रुग्णालयातील कॅन्टीनही बंद झाले आहे. येथे कॅन्टीन चालकाचा करार संपल्याने सेवा थांबविण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नवीन निविदा काढून कंत्राटदार नियुक्त होईपर्यंत कॅन्टीन बंद राहणार आहे. त्यामुळे दोन्ही रुग्णालयांतील कॅन्टीन बंद पडल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय वाढली आहे. या घटनांमुळे महापालिका रुग्णालयांतील कॅन्टीनसाठी अन्नसुरक्षा परवाने, इतर वैधानिक मंजुरी आणि कंत्राटांची नियमित तपासणी होते का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai hospital canteen license fssai health permits trauma care rajawadi hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • Ghatkopar Incident
  • Hospital
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

जगभरातील 2,400 संशोधनांमध्ये डॉ. प्रांजल काशिव अव्वल; सिडनीत मिळाला आंतरराष्ट्रीय सन्मान
1

जगभरातील 2,400 संशोधनांमध्ये डॉ. प्रांजल काशिव अव्वल; सिडनीत मिळाला आंतरराष्ट्रीय सन्मान

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
2

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
3

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
4

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.