Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local Megablock : रविवारी प्रवाशांचा खोळंबा! मेगाब्लॉकमुळे ट्रान्स-हार्बरला फटका; वंदे भारतसह एक्स्प्रेसही होणार लेट

Mumbai Local Megablock : मध्य रेल्वेकडून रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी विद्याविहार-ठाणे पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर तसेच ठाणे-वाशी/नेरुळ ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे-वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यानच्या ट्रान्स-हार्बर लोकल सेवा ब्लॉकदरम्यान बंद राहतील.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 29, 2026 | 12:27 PM
मुंबई लोकल प्रवाशांनो लक्ष द्या! ठाणे-वाशी-नेरुळ मार्गावर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द

मुंबई लोकल प्रवाशांनो लक्ष द्या! ठाणे-वाशी-नेरुळ मार्गावर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द

Follow Us
Follow Us:
  • रविवारी रेल्वे प्रवासाचे नियोजन करताय?
  • मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
  • ट्रान्स-हार्बर सेवा साडेपाच तास बंद
Mumbai Local Megablock : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून तुम्ही जर लोकलने प्रवास करत असाल तर एकदा रविवारचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडा… रविवारी (३० ऑगस्ट २०२६ ) मध्य रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी विद्याविहार-ठाणे दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर तसेच ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbai Local Megablock)

विद्याविहार-ठाणे मार्गावर साडेपाच तासांचा ब्लॉक

विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 8 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे संबंधित गाड्या नियोजित वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

ठाणे-वाशी/नेरुळ ट्रान्स-हार्बर सेवा बंद

ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉकचा मोठा फटका बसणार आहे. ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे ठाणे-वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यानच्या ट्रान्स-हार्बर लोकल सेवा या कालावधीत बंद राहणार आहेत.

रद्द होणाऱ्या सेवांची वेळ

ठाण्याहून वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन सेवा – सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07
पनवेल/नेरुळ/वाशीहून ठाण्याकडे येणाऱ्या अप सेवा – सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 दरम्यान, बेलापूर-उरण मार्गावरील लोकल सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार नियमित सुरू राहतील.

‘या’ डाऊन एक्स्प्रेस होणार प्रभावित

ब्लॉकदरम्यान खालील डाऊन मेल-एक्स्प्रेस विद्याविहार येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाणे येथे पुन्हा पाचव्या मार्गावर आणण्यात येतील. त्यामुळे त्या सुमारे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावू शकतात.

11055 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस
11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्स्प्रेस
16345 लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस
17222 लोकमान्य टिळक टर्मिनस-काकिनाडा पोर्ट एक्स्प्रेस
वंदे भारत, डेक्कन क्वीनसह ‘या’ गाड्यांनाही फटका

ब्लॉकच्या कालावधीत खालील अप मेल-एक्स्प्रेस ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणाऱ्या संबंधित गाड्या विद्याविहार येथे सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या गाड्या गंतव्यस्थानी सुमारे 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे.

22226 सोलापूर-CSMT वंदे भारत एक्स्प्रेस
11010 पुणे-CSMT सिंहगड एक्स्प्रेस
12124 पुणे-CSMT डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
12126 पुणे-CSMT प्रगती एक्स्प्रेस
12134 मंगळुरू-CSMT एक्स्प्रेस
13201 राजगीर-LTT जनता एक्स्प्रेस
17221 काकिनाडा पोर्ट-LTT एक्स्प्रेस
12168 बनारस-LTT सुपरफास्ट एक्स्प्रेस
12321 हावडा-CSMT मुंबई मेल
12812 हटिया-LTT एक्स्प्रेस
प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा

रविवारच्या मेगाब्लॉकमुळे विशेषतः ठाणे, वाशी, नेरुळ आणि पनवेलदरम्यान प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी अतिरिक्त वेळ हातात ठेवून प्रवासाचे नियोजन करणे आणि प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत माध्यमांवरील अद्ययावत वेळापत्रक तपासणे उपयुक्त ठरेल.

Mumbai Local: मुंबई लोकलला पुन्हा ब्रेक! मुलुंडमध्ये ओव्हरहेड वायरवर साहित्य पडून आग; १५ ते २० मिनिटांचा विलंब

Web Title: Mumbai local mega block sunday central railway thane vashi nerul trans harbour services cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • central railway
  • Mega block
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

खेळाडूंसाठी मोठी संधी! पश्चिम रेल्वेत ‘Sports Quota’ अंतर्गत बंपर भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया..
1

खेळाडूंसाठी मोठी संधी! पश्चिम रेल्वेत ‘Sports Quota’ अंतर्गत बंपर भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया..

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’
2

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.