Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Mayor Bomb Threat : ‘१५ ऑगस्टपूर्वी मेट्रो, शाळा, शेअर बाजार बॉम्बने उडवणार…’, मुंबईच्या महापौरांना पुन्हा बॉम्बची धमकी

Mumbai Mayor Bomb Threat: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा मेल आला आहे. महापौर कार्यालयासह मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजाराला लक्ष्य करण्याचा दावा या मेलमध्ये करण्यात आला असून 15 ऑगस्टपूर्वी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 07, 2026 | 12:47 PM
'१५ ऑगस्टपूर्वी मेट्रो, शाळा, शेअर बाजार बॉम्बने उडवणार...', मुंबईच्या महापौरांना पुन्हा बॉम्बची धमकी

'१५ ऑगस्टपूर्वी मेट्रो, शाळा, शेअर बाजार बॉम्बने उडवणार...', मुंबईच्या महापौरांना पुन्हा बॉम्बची धमकी

Follow Us
Follow Us:
  • मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना पुन्हा बॉम्बची धमकी
  • 15 ऑगस्टपूर्वी हल्ल्याचा ई-मेल
  • मुंबई पोलिसांचा तपास सुरू
Mumbai Mayor Bomb Threat News In Marathi: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. महापौरांच्या अधिकृत ई-मेल खात्यावर आलेल्या या धमकीच्या मेलमध्ये त्यांच्या कार्यालयासह मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजार उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच 15 ऑगस्टपूर्वी हल्ला केला जाईल, असा दावाही मेलमध्ये करण्यात आला आहे.

मेट्रोने प्रवास करू नका…

या धमकीच्या ई-मेलमध्ये काही खलिस्तान समर्थक घोषणा तसेच काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या धमकीचे गांभीर्य अधिक वाढले आहे. ई-मेलमध्ये नागरिकांना मुलांना शाळेत पाठवू नये तसेच मेट्रोने प्रवास करू देऊ नये, असा इशाराही देण्यात आला आहे. यापूर्वीही महापौर रितू तावडे यांना दोन वेळा अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाले होते. त्यामुळे पुन्हा आलेल्या या मेलनंतर मुंबई पोलीस प्रशासन सतर्क झाले असून संबंधित सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

Aditya Thackeray: ‘महापौरांना मुंबईची नाही, तर…’, आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघाती प्रहार; ‘या’ मुद्द्यावरूनही घेरले

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आणि सायबर पोलिसांकडून सुरू असून ई-मेल कोणत्या IP Address वरून पाठवण्यात आला, त्याचा मूळ स्रोत काय आहे आणि तो नेमका कोणी पाठवला, याचा शोध घेतला जात आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येण्याची शक्यता असून तपास यंत्रणा प्रत्येक बाबीची सखोल चौकशी करत आहेत.

तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महापौर बंगल्याच्या दुरुस्ती खर्चाबाबत सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण देत विरोधकांवर फेक नरेटिव्ह पसरवल्याचा आरोप केला आहे. महापौर बंगल्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा चुकीचा असून, संबंधित निविदेचा महापौर बंगल्याशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रितू तावडे म्हणाल्या, “हे संपूर्ण काम राणीच्या बागेचे आहे. मात्र त्याचा महापौर बंगल्याशी संबंध जोडून दिशाभूल केली जात आहे. महापौर नाव जोडले की काहींना राजकीय मायलेज मिळते, म्हणून हा फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, महापौर बंगला हा हेरिटेज (वारसा) इमारतीच्या श्रेणीत येतो. त्यामुळे त्या इमारतीसंदर्भातील कोणतीही निविदा प्रक्रिया वेगळी असते. सध्या चर्चेत असलेला 2 कोटी 89 लाख रुपयांचा टेंडर हा राणी बाग (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय) येथील उद्यान विभागाने काढलेला असून, त्याचा महापौर बंगल्याशी कोणताही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

रितू तावडे या घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 132 मधून सलग दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. महापालिकेतील अभ्यासू आणि आक्रमक नगरसेविका अशी त्यांची ओळख असून, सध्या त्या मुंबईच्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

मुंबईचे प्रवेशद्वार हिरवळीने फुलणार! वाशी, ऐरोली नाक्यावर होणार हरित विकास; महापौर रितू तावडेंकडून स्थळपाहणी

Web Title: Mumbai mayor ritu tawde receives fresh bomb threat email before independence day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • Bomb threat
  • Mumbai
  • Ritu Tawde

संबंधित बातम्या

Threat-email : सोमनाथ मंदिर, गुजरातमधील भाजप कार्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी, सर्च ऑपरेशन करताच निघाला फुसका बार!
1

Threat-email : सोमनाथ मंदिर, गुजरातमधील भाजप कार्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी, सर्च ऑपरेशन करताच निघाला फुसका बार!

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित
3

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
4

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.