Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

करार रद्दचा परिणाम! मेट्रो एक्वा लाईनवर मोबाईल सेवा बंद, प्रवाशांची मोठी गैरसोय

मुंबई मेट्रो-३ (अक्वा लाईन) मध्ये मोबाईल नेटवर्क सेवा अचानक बंद झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एमएमआरसीएल आणि संबंधित कंपनीमधील वादामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 22, 2026 | 12:30 PM
करार रद्दचा परिणाम! मेट्रो एक्वा लाईनवर मोबाईल सेवा बंद, प्रवाशांची मोठी गैरसोय

करार रद्दचा परिणाम! मेट्रो एक्वा लाईनवर मोबाईल सेवा बंद, प्रवाशांची मोठी गैरसोय

Follow Us
Follow Us:
  • मेट्रो-३ च्या संपूर्ण ३३ किमी भुयारी मार्गावर मोबाईल नेटवर्क सेवा खंडित झाली आहे.
  • पायाभूत सुविधा उभारणाऱ्या कंपनीचा करार रद्द झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली.
  • यामुळे प्रवाशांना सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरण (एमएमआरसीएल), सेल्युलर ऑपरेटर्स आणि एका टेक इन्फ्रा कंपनीमध्ये अटींवर एकमत होत नसल्याने शुक्रवारपासून (२० मार्च) मेट्रो तीन एक्वा लाईनच्या संपूर्ण भुयारी मार्गावरील मोबाईल नेटवर्क सेवा खंडित झाली आहे. एमएमआरसीएलने पायाभूत सुविधांची उभारणी आणि देखभाल करणाऱ्या कंपनीचा करार रद्द केल्यामुळे, अॅक्वा लाईनच्या संपूर्ण ३३ किलोमीटरच्या पट्टयात प्रवाशांना मोबाईल नेटवर्क नसल्याने विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

कौशल्य विकासावर भर; रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या

मेट्रो तीन एक्वालाईन तीन टप्प्यांत सुरू करण्यात आली. यातील पहिला टप्पा आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), दुसरा टप्पा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी आणि तिसरा टप्पा आचार्य अत्रे चौक ते कप परेड असा होता. यात आरे ते आचार्य अत्रे चौक वरळी पर्यंत प्रवाशांना मोबाईल नेटवर्कची सुविधा प्रदान करण्यात आली होती. सौदी अरेबियन फर्मची उपकंपनी असलेल्या ॲडव्हान्स्ड कम्युनिकेशन्स अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम्स कंपनी इंडियाने (एसीईएस इंडिया) यांच्याकडून ही सुविधा दिली जात होती. अंदाजे सुमारे १२० कोटी रुपये खर्च करून भूमिगत दूरसंचार पायाभूत सुविधा उभारण्याचा करार नऊ वर्षांसाठी करण्यात आला होता. मात्र, आता हा संपूर्ण करार रद्द करण्यात आला आहे. करारानुसार, एसीईएस संपूर्ण पायाभूत सुविधा उभारणार होते. ज्याचा वापर स्थानिक सेल्युलर ऑपरेटर्सनी शुल्क भरल्यानंतर करायचा होता.

एसीईएस इंडियाचे कंपनीचे म्हणणे काय ?

एमएमआरसीएलने आम्हाला जुनी यंत्रणा काढून टाकण्यास सांगितले आहे. आता नवीन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी काही महिने, किंबहुना काही वर्षे लागतील. पूर्णपणे कार्यरत असलेल्या मेट्रोमधील कामाचे मर्यादित तास आणि निर्बंधांमुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दूरसंचार कंपन्यांनी एमएमआरसीएलला एक संयुक्त पत्र जारी करून एसीईएसला आपला पाठिंबा दर्शवला आहे. एसीईएसच्या कोणत्याही कृतीमुळे नव्हे, तर एमएमआरसीएलच्या सुधारित आरओडब्ल्यू नियमांनुसार जुळवून घेण्याच्या नकारामुळेच ही सहभागी होण्याची प्रक्रिया थांबली आहे.

भोंदूबाबा अशोक खरातवर उद्धव ठाकरेंकडून लाभाची खैरात; शेतकऱ्यांसाठीचे पाणी ‘शिवनिका’ संस्थेकडे वळवले

मेट्रो प्रशासनाची भूमिका काय ?

मेट्रो लाईन ३ वरील स्थानके आणि भुयारी मार्गात प्रवाशांना सध्या मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याची आम्हाला जाणीव आहे. आपत्कालीन संपर्क सुविधांसह महत्त्वपूर्ण सुरक्षा प्रणाली सर्वकाळ पूर्णपणे कार्यरत आहे. लवकरात लवकर मोबाईल नेटवर्क सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai metro 3 aqua line mobile network down mmrc contract dispute commuters problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • central railway
  • free WiFi
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर
1

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
2

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
3

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
4

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.