Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Metro वर वाढता विश्वास; अवघ्या १७९ दिवसांत ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार, एमएमआरडीए मेट्रो नेटवर्कची मोठी झेप

Mumbai Metro: एमएमआरडीएच्या मेट्रो नेटवर्कने ३० कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. अवघ्या १७९ दिवसांत शेवटचे ५ कोटी प्रवासी नोंदवले गेले असून, दैनंदिन प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मेट्रो मार्गिका २अ, ७, २ब (टप्पा-१) आणि ९ (टप्पा-१) यांच्या विस्तारामुळे मुंबईकरांचा मेट्रोवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 04, 2026 | 06:40 PM
Mumbai Metro वर वाढता विश्वास; अवघ्या १७९ दिवसांत ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार, एमएमआरडीए मेट्रो नेटवर्कची मोठी झेप

Mumbai Metro वर वाढता विश्वास; अवघ्या १७९ दिवसांत ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार, एमएमआरडीए मेट्रो नेटवर्कची मोठी झेप

Follow Us
Follow Us:
  • MMRDA Metro नेटवर्कची झेप
  • ३० कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा गाठला
  • अवघ्या १७९ दिवसांत ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार
Mumbai Metro: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) संचलित मेट्रो नेटवर्कने ३० कोटी (३०० दशलक्ष) प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा गाठत सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ३ ऑगस्ट २०२६ रोजी गाठलेला हा टप्पा म्हणजे मुंबईकरांनी मेट्रो सेवेला दिलेल्या वाढत्या पसंतीचा आणि विश्वासाचा ठोस पुरावा मानला जात आहे.

सध्या एमएमआरडीएच्या नेटवर्कमध्ये मेट्रो मार्गिका २अ (दहिसर पूर्व–अंधेरी पश्चिम), मार्गिका ७ (दहिसर पूर्व–गुंदवली), मार्गिका २ब (टप्पा-१) (डायमंड गार्डन–मंडाळे) आणि मार्गिका ९ (टप्पा-१) (दहिसर पूर्व–काशीगाव) या मार्गिकांचा समावेश आहे.

Mumbai Metro: मेट्रो ते मॉल प्रवास होणार आणखी सोपा; थेट कनेक्टिव्हिटीमुळे वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार

या यशातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे शेवटचे ५ कोटी प्रवासी अवघ्या १७९ दिवसांत नोंदवले गेले. मेट्रो सेवा सुरू झाल्यापासून हा सर्वात वेगवान टप्पा ठरला आहे. या काळात सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७० लाखांवरून २.७९ लाखांपर्यंत पोहोचली असून, त्यात ३.३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. शनिवार-रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि हंगामी प्रवास असूनही ही वाढ कायम राहिली आहे.

प्रवासीसंख्येची वाढती वाटचाल

२ एप्रिल २०२२ : मेट्रो मार्गिका २अ आणि ७ सुरू

१७ सप्टेंबर २०२२ : ५० लाख प्रवासी

२७ जानेवारी २०२३ : १ कोटी प्रवासी

२० सप्टेंबर २०२३ : ५ कोटी प्रवासी

२८ मे २०२४ : १० कोटी प्रवासी

४ जानेवारी २०२५ : १५ कोटी प्रवासी

४ ऑगस्ट २०२५ : २० कोटी प्रवासी

५ फेब्रुवारी २०२६ : २५ कोटी प्रवासी

३ ऑगस्ट २०२६ : ३० कोटी प्रवासी

“३० कोटी प्रवास हा केवळ एक आकडा नाही; तर मुंबईकरांनी आधुनिक, कार्यक्षम आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर व्यक्त केलेला विश्वास आहे.” एमएमआरडीएच्या मेट्रो नेटवर्कने ३० कोटी प्रवासी संख्येचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी… pic.twitter.com/DlhkvYUZ9A — MMRDA (@MMRDAOfficial) August 4, 2026

७ एप्रिल २०२६ रोजी मेट्रो मार्गिका २ब (टप्पा-१) आणि ९ (टप्पा-१) सुरू झाल्यानंतर नेटवर्कमध्ये ९ नवीन स्थानकांची भर पडली. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील संपर्कक्षमता अधिक मजबूत झाली असून, प्रवासीसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत म्हटले की, “३० कोटी प्रवासी हा केवळ आकडा नसून आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मुंबईकरांनी दाखवलेल्या विश्वासाचा पुरावा आहे. जागतिक दर्जाचे मेट्रो नेटवर्क उभारून भविष्यातील मुंबई अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक करण्याचा आमचा संकल्प आहे.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मत

उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “हा टप्पा मुंबईकरांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. भविष्यात ठाण्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश अखंड मेट्रो नेटवर्कने जोडण्याचा आमचा निर्धार असून प्रत्येक नागरिकाला अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याचे उद्दिष्ट आहे.”

Mumbai Metro 5: ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गिकेला मिळणार चालना! मेट्रो मार्ग 5 ला वेग, 27 हेक्टरमध्ये उभा राहतोय अत्याधुनिक कशेळी डेपो

महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांचे मत

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले की, “३० कोटी प्रवाशांचा टप्पा गाठणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. दररोज जवळपास २.८ लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत असल्याने ती मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. हजारो अभियंते, नियोजक आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा टप्पा गाठता आला असून हा ऐतिहासिक विक्रम आम्ही आमच्या सर्व प्रवाशांना समर्पित करतो.”

एमएमआरडीएच्या मेट्रो नेटवर्कचा सातत्याने होत असलेला विस्तार, वाढती प्रवासीसंख्या आणि आधुनिक सुविधा यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीत मेट्रोचा वाटा दिवसेंदिवस अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

Web Title: Mumbai metro network achieves historic 300 million passenger milestone mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Metro
  • MMRDA
  • Mumbai

संबंधित बातम्या

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना
1

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने
2

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित
4

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.