Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताप, डेंग्यू अन् लेप्टोची धास्ती! मुंबईत पावसाळी आजारांचा वाढता धोका; मान्सून ओपीडींमध्ये रुग्णांची गर्दी

मुंबईत पावसाचा जोर वाढत असताना ताप, डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिससारख्या पावसाळी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यासाठी महापालिकेच्या मान्सून ओपीडींमध्ये लवकर निदान आणि तातडीच्या उपचारांवर भर दिला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2026 | 10:54 AM
ताप, डेंग्यू अन् लेप्टोची धास्ती! मुंबईत पावसाळी आजारांचा वाढता धोका; मान्सून ओपीडींमध्ये रुग्णांची गर्दी

ताप, डेंग्यू अन् लेप्टोची धास्ती! मुंबईत पावसाळी आजारांचा वाढता धोका; मान्सून ओपीडींमध्ये रुग्णांची गर्दी

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील प्रमुख रुग्णालयांमध्ये मान्सून ओपीडी सुरू असून ताप, डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोच्या संशयित रुग्णांची नियमित तपासणी केली जात आहे.
  • लक्षणे आढळल्यास रुग्णांना तातडीने दाखल करून रक्त तपासणी आणि आवश्यक उपचार सुरू केले जात आहेत.
  • संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन काही रुग्णालयांमध्ये अतिरिक्त खाटा आणि विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे.
सायन रुग्णालयाच्या मान्सून ओपीडीबाहेर तपासणीसाठी थांबलेले रुग्ण… कूपरमध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या संशयित रुग्णांची वाढती संख्या… तर शताब्दी रुग्णालयात लेप्टोच्या लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवणारे डॉक्टर… मुंबईत पावसाचा जोर वाढत असताना पावसाळी आजारांविरोधातील लढाईसाठी महापालिकेची मान्सून ओपीडी यंत्रणा सज्ज झाली आहे. १ जूनपासून सुरू झालेल्या या विशेष मान्सून ओपीडींमध्ये आतापर्यंत शेकडो रुग्णांची तपासणी झाली असून आवश्यकतेनुसार त्यांना तातडीने दाखलही केले जात आहे.

भिवंडीत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, 7 जणांचा मृत्यू

मुंबईत पावसाचा जोर कायम असताना पावसाळी आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या मान्सून ओपीडींमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिसच्या संशयित लक्षणांसह नागरिक तपासणीसाठी रुग्णालयांकडे धाव घेत असल्याचे चित्र प्रमुख तसेच उपनगरीय रुग्णालयांमध्ये पाहायला मिळत आहे. या ओपीडींमधून पावसाळी आजारांचे लवकर निदान आणि तातडीने उपचार देण्यावर भर दिला जात आहे. सायन रुग्णालयातील मान्सून ओपीडीमध्ये सकाळपासूनच रुग्णांची ये-जा सुरू असल्याचे दिसून आले. ताप आणि व्हायरल संसर्गाच्या लक्षणांसह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दररोज सरासरी १० ते १५ रुग्ण; आवश्यकतेनुसार उपचार

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी सांगितले की, १ जूनपासून दररोज सरासरी १० ते १५ रुग्ण मान्सून ओपीडीमध्ये येत आहेत. प्रत्येक रुग्णाची तपासणी करून आवश्यकतेनुसार रक्त तपासण्या आणि पुढील उपचार केले जात आहेत. तर कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातही पावसाळी आजारांच्या तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांनी, आतापर्यंत सुमारे १८० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीत डेंग्यू किंवा लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे आढळल्यास संबंधित रुग्णांना तातडीने दाखल करून उपचार सुरू केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयातील चित्र अधिक व्यस्त दिसून आले.

मोठी बातमी ! तुकाराम मुंढेंविरोधात त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांची तक्रार; थेट मंत्र्यांनाच दिले पत्र

अतिरिक्त खाटांची व्यवस्था

  • रुग्णालयाच्या अधिष्ठात्री डॉ. छाया शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून ओपीडीमध्ये आतापर्यंत २५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
  • त्यामध्ये १९० पुरुष आणि ७६ महिलांचा समावेश आहे. या काळात मलेरियाचे सहा रुग्ण, डेंग्यूचे १९ रुग्ण आणि लेप्टोस्पायरोसिसचा एक रुग्ण आढळून आला आहे.
  • प्रकृतीनुसार १५ रुग्णांना पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयातही मान्सून ओपीडी सक्रिय असून आतापर्यंत १५० रुग्णांची तपासणी झाली आहे.
  • मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजूसिंग राठोड यांनी सांगितले की, संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन रुग्णालयात अतिरिक्त ३० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
 

Web Title: Mumbai monsoon opd dengue malaria leptospirosis fever patients bmc hospitals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • Health Tips
  • Mumbai News
  • viral infection

संबंधित बातम्या

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
1

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’
2

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी
3

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी
4

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.