Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime: OTP-PIN शेअर करताय? थांबा! एका क्लिकने खातं होऊ शकतं रिकामं; मुंबई पोलिसांचा नागरिकांना सावधानतेचा इशारा

Mumbai Police Cyber Crime Awareness Campaign: ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत मुंबईतील जे. जे. रुग्णालय आणि संरक्षण मंत्रालय कक्षात दक्षिण सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर जनजागृती वर्गाचे आयोजन करण्यात आले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 07, 2026 | 09:40 PM
Mumbai Police Cyber Crime Awareness Campaign

Mumbai Police Cyber Crime Awareness Campaign

Follow Us
Follow Us:
  • एका क्लिकने होऊ शकतं खातं रिकामं
  • मुंबई पोलिसांकडून सायबर सुरक्षेचा धडा
  • फसवणूक झाल्यास 1930 वर तातडीने कॉल करा
मुंबई: डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या सायबर फसवणुकीचे वाढते प्रकार लक्षात घेऊन नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दक्षिण सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने जे. जे. रुग्णालयाच्या फार्मसी विभागात तसेच संरक्षण मंत्रालय कक्षात विशेष ‘सायबर जनजागृती’ वर्गाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात सायबर सुरक्षेचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक देसले आणि पोलीस कॉन्स्टेबल इम्रान मुलाणी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, फसवणुकीच्या पद्धती आणि त्यापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर माहिती दिली.

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावध

सध्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या ‘डिजिटल अरेस्ट’ आणि बनावट सरकारी अधिकाऱ्यांच्या फोनबाबत मार्गदर्शन करताना, सरकारी यंत्रणा किंवा पोलीस कधीही व्हिडिओ कॉलद्वारे ‘डिजिटल अरेस्ट’ करून पैशांची मागणी करत नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले. अशा प्रकारचे कॉल आल्यास घाबरून न जाता तत्काळ सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.

ओटीपी, पीन, सीव्हीव्ही, पासवर्डबाबत गोपनियता बाळगा

आर्थिक व्यवहार करताना ओटीपी, युपीआय आणि एटीएम पीन, सीव्हीव्ही, पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये, असे सांगण्यात आले. तसेच पैसे प्राप्त करण्यासाठी युपीआय पीन किंवा क्यूआर कोडची आवश्यकता नसते, याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.

बनावट गुंतवणूक आणि पार्ट टाईम जॉबच्या आमिषापासून सावधान

बनावट शेअर गुंतवणूक, ट्रेडिंग योजना, पार्ट टाईम जॉबच्या आकर्षक ऑफर्स, बनावट लिंकस् आणि कस्टमर केअर क्रमांकांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत उपस्थितांना सावध करण्यात आले. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून एनी डेस्क, क्वीक सपोर्ट यासारखे रिमोट अक्सेस अप्स डाऊनलोड करू नयेत, असा सल्लाही देण्यात आला.

एआय आणि डीप फेकबाबतही जनजागृती

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून तयार करण्यात येणारे फेक व्हॉईस आणि डीपफेक व्हीडिओ यांचा गैरवापर करून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडिया अथवा अन्य डिजिटल माध्यमातून मिळालेली माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी, असे आवाहन करण्यात आले. सोशल मीडिया खात्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी टू स्टेप व्हेरीफिकेशन सुरू ठेवणे आणि प्रायमसी सेटिंग्ज योग्य पद्धतीने वापरणे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

फसवणूक झाल्यास तातडीने १९३० वर संपर्क

सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी वेळ न घालवता १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक देसले यांनी केले.

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको, वांद्रे रिक्लेमेशन येथे मध्यरात्री आंदोलन

Web Title: Mumbai police cyber crime awareness digital arrest scam online fraud 1930

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • Cyber ​​police
  • Cyber security
  • J J Hospital Mumbai

संबंधित बातम्या

Cyber Crime : सायबर क्राइमबाबत मुंबई पोलिसांची धडक कारवाई, ‘ही’ टोळी आली समोर
1

Cyber Crime : सायबर क्राइमबाबत मुंबई पोलिसांची धडक कारवाई, ‘ही’ टोळी आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.