Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग! 20 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

Mumbai Rain: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम दिसून येत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 20, 2026 | 09:54 AM
Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग! 20 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग! 20 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

Follow Us
Follow Us:
  • मुंबईसह ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.
  • हवामान विभागाने महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करत पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला.
  • मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे, तर पश्चिम आणि हार्बर रेल्वे 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत.
Rain Update: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, घाटकोपर या भागांमध्ये रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे आता अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली आहे. याचा परिणाम रस्ते वाहतूकीवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पाणी साचल्यामुळे आणि पावसामुळे दृष्यमानता कमी झाल्यामुळे रस्ते वाहतूकीचा वेग मंदावला आहे. तसेच मध्य रेल्वेवर देखील पावसाचा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने आज 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून पुढील आठवड्यात राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर व्हीआयपी दर्शन बंद; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियम पाळत घेतले केवळ मुखदर्शन

राज्यभरात पावसाचा जोर वाढला

बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभरातील पावसाचा जोर वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आजपासून हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

20 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागाने आज 20 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये पुणे आणि सातारा यांचा देखील समावेश आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, तसेच हिगोंली आणि परभणी या भागांमध्ये आज ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकते, असे देखील सांगण्यात आले आहे. खरं तर, गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता सुरु झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

बोरिवली तहसील कार्यालयात बनावट शिक्क्यांचा वापर; उत्पन्न दाखल्यांच्या ३० अर्जांवर संशय

रेल्वे वाहतूकीवर परिणाम

मुंबई आणि ठाण्यातील सततच्या पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतूकीवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रस्ते वाहतूक मंदावली असून रेल्वे वाहतूक देखील उशीराने सुरु आहे. मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा 10 ते 15 मिनिटांनी उशीराने सुरु असल्याचे सांगितलं जात आहे. तर पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक देखील 5 ते 10 मिनिटे उशीराने धावत आहे. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. तर कल्याण आणि डोंबिवली या भागांमध्ये देखील पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुदेव हॉटेल रोड आणि आंबेडकर रोड परिसरात पावसाचे साचण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: Mumbai rain update yellow alert issued for 20 districts central railway services delayed heavy rain maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Mumbai Rain
  • Rain Update

संबंधित बातम्या

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….
1

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….

Weather Update: राज्यात धो-धो पाऊस बरसणार! ‘या’ तारखा कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करा
2

Weather Update: राज्यात धो-धो पाऊस बरसणार! ‘या’ तारखा कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.