Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Weather News: ऑगस्टच्या सुरुवातीलाच मुंबईत पावसाची दांडी? आगामी दिवसांत होणार मोठा बदल, पाहा IMD चा नवा अंदाज!

Mumbai Weather: मुंबईत पावसाचा जोर ओसरणार असून तापमान ३२ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ७ ऑगस्टपर्यंत कोणताही अलर्ट जारी केलेला नाही; पाहा सविस्तर अपडेट

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 04, 2026 | 06:55 PM
Mumbai Weather News: ऑगस्टच्या सुरुवातीलाच मुंबईत पावसाची दांडी? (Photo Credit- AI)

Mumbai Weather News: ऑगस्टच्या सुरुवातीलाच मुंबईत पावसाची दांडी? (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:
  • ऑगस्टच्या सुरुवातीलाच मुंबईत पावसाची दांडी?
  • आगामी दिवसांत तापमान वाढणार
  • पाहा IMD चा नवा अंदाज!
Mumbai Weather Update: जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर ऑगस्टच्या सुरुवातीलाच मुंबईसह आसपासच्या उपनगरांमध्ये (Mumbai Weather) पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज (४ ऑगस्ट) पासून मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता असून पारा ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो.

शुक्रवारपर्यंत कोणताही अलर्ट नाही; पावसाचा जोर का कमी झाला?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत आगामी दिवसांत रिमझिम ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवार, ७ ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी कोणताही ‘अलर्ट’ जारी केलेला नाही. जुलैमध्ये कोसळलेल्या धुवाधार पावसानंतर ऑगस्टमध्ये मान्सून मंदावण्याचे मुख्य कारण म्हणजे बाष्प वाहून आणणाऱ्या आणि मान्सूनच्या प्रवाहाला गती देणाऱ्या तीव्र हवामान प्रणालीचा अभाव असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Mumbai Metro वर वाढता विश्वास; अवघ्या १७९ दिवसांत ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार, एमएमआरडीए मेट्रो नेटवर्कची मोठी झेप

मुंबईचे तापमान वाढणार: कमाल पारा ३२ अंशांच्या पार

पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबईतील तापमानात वाढ होणार आहे. आयएमडीच्या मते, दिवसाचे कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या पार जाऊ शकते, तर संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी ते २६ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. जरी या आठवड्यात मुसळधार पाऊस हुलकावणी देणार असला, तरी ऑगस्ट महिन्यात मुंबईत सरासरी ५६१ मिमी (सांताक्रूझ) आणि ४७२ मिमी (कुलाबा) पावसाची नोंद होत असते. त्यामुळे महिन्याच्या उत्तरार्धात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ६६% जास्त पाऊस; धरणांमध्ये ८९.५% पाणीसाठा

जुलै महिन्यात मुंबईने आपल्या सरासरी पावसाचा कोटा तब्बल ६६ टक्क्यांनी ओलांडला होता. १ ते ३० जुलै दरम्यान सांताक्रूझ वेधशाळेत १,४९१.९ मिमी पावसाची नोंद झाली होती, जी ८९८.४ मिमीच्या मासिक सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. सध्या तलावांमध्ये १२.९५ लाख दशलक्ष लिटर म्हणजेच एकूण क्षमतेच्या ८९.५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

Mumbai News: मेट्रो-६ च्या कारशेडचा तिढा अद्याप कायम! तोडगा न काढताच मेट्रो मार्गिका कार्यान्वित करण्याचा प्रयत्न

Web Title: Mumbai weather update rain activity eases temperature rise imd forecast marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • imd
  • Mumbai
  • Mumbai Rain
  • weather news

संबंधित बातम्या

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना
1

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने
2

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित
4

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.