Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांचा त्रास वाढणार; बेस्टच्या १०० बस जाणार भंगारात

मुंबई:  मुंबईकरांची सेकण्ड लाईफलाईन असलेल्या बेस्टने खर्चात कपात करण्यासाठी स्वमालकीच्या बस खरेदी न करता भाडेतत्वावरील बस घेण्याचा निर्णय घेतला. परंतु नवीन बस बेस्टच्या ताफ्यात येण्याचे प्रमाण कमी आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 13, 2025 | 08:10 AM
bus (फोटो सौजन्य- pinterest)

bus (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  मुंबईकरांची सेकण्ड लाईफलाईन असलेल्या बेस्टने खर्चात कपात करण्यासाठी स्वमालकीच्या बस खरेदी न करता भाडेतत्वावरील बस घेण्याचा निर्णय घेतला. परंतु नवीन बस बेस्टच्या ताफ्यात येण्याचे प्रमाण कमी आहे. बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या १०० बस आयुर्मान संपल्याने एप्रिल महिन्यात भंगारात निघणार आहेत. तर दुसरीकडे, चालकांचे प्रशिक्षण पूर्ण न झाल्याने ताफ्यात येऊनही नवीन बस आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे मे महिन्यात मुंबईकरांचा त्रास आणखी वाढणार आहे. बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या तसेच भाडेतत्त्वावरील बस आहेत. पाच कंत्राटदारांकडून मुंबईतील विविध मार्गावर भाडेतत्वावरील बस चालविण्यात येतात.

देशात सर्वात जास्त विसराळू ठरले मुंबईकर; तर पुण्याचा तिसरा क्रमांक

सध्या बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या ७४३, तर भाडेतत्त्वावरील दोन हजार ७४ बस आहेत. बेस्टच्या ताप्यातील स्वमालकीच्या बसची संख्या ११ डिसेंबर २०२४रोजीच्या ९९३ वरून, १ एप्रिल २०२५ रोजी ७५९वर आली आहे. त्यातच, एप्रिलमध्ये बेस्टच्या मालकीच्या १०० बसचे आयुर्मान संपत आल्याने त्या टप्प्याटप्प्याने भंगारात काढल्या जाणार आहेत. त्यामुळे बसची संख्या आणखी कमी होईल. त्याच वेळी, दुसरीकडे बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन बस अद्याप पोत विना वापर उभ्या आहेत.

कुर्ला येथील अपघातानंतर ८४ बस आगारातच उभ्या

बेस्ट उपक्रमाने गेल्या वर्षी २३ मे रोजी निविदा प्रक्रिया राबवून, दोन हजार १०० इलेक्ट्रक सिंगलडेकर एसी बस पुरवण्याचे कंत्राट ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनीला दिले होते. यातील ३२५ हून अधिक बस ताफ्यात आल्या आहेत. त्याशिवाय, आणखी ८४ बस दाखल झाल्या आहेत. मात्र कुर्ला येथील बेस्ट बस अपघातानंतर चालकांच्या प्रशिक्षणाचा कालावधी एक महिना करण्यात आल्याने, भरती प्रक्रिया व प्रशिक्षण कालावधीमुळे ८४ बस विविध मार्गांवर चालविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या बस आगारातच उभ्या आहेत.

वर्षअखेरपर्यंत आणखी ७०० बसना निरोप
नोव्हेंबर २०२५ पर्यंत ७०० नॉन एसी बस टप्प्याटप्प्याने भंगारात काढल्या जाणार आहेत. जून २०२५ पर्यंत बेस्टच्या ताफ्यातील ९० मिडी बसनाही निरोप दिला जाणार आहे.

Web Title: Mumbaikars troubles will increase 100 best buses will go to scrapyard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 08:10 AM

Topics:  

  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
3

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?
4

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.