Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना

श्रावण सुरू होताच मुंबईकरांना आता वेध लागले आहेत ते लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे. यंदा तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, लालबागच्या हीरक महोत्सवी वर्षात २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती हे विशेष आकर्षण ठरणार असून, ही मूर्ती ज्योतिबाच्या रूपावर आधारित असणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 15, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव साकारणार २२ फूट उंच पर्यावरणपुरक गणेशमूर्ती
  • पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून भक्तांना देण्यात येणार संवर्धनाचा संदेश
  • ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना
अवघ्या एक महिन्यावर मुंबईचा गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. पवित्र मास श्रावणाचा आरंभ झाला असून श्रावणी शनिवार, सोमवार, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि गोकुळाष्टमी पूर्वीच मुंबईकरांना वेध लागले आहे ते भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचे, आपल्या लाडक्या बाप्पाच्या मंगल मूर्ती गणरायाच्या आगमनाचे मुंबईतील गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा जपत तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, लालबाग यंदा आपल्या हीरक महोत्सवी वर्षांत गणेशोत्सवाचे भव्य आयोजन करीत आहे. या ऐतिहासिक वर्षाचे विशेष आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे कागदाच्या लगदयापासून साकारण्यात आलेली २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे. यंदाची भव्य गणेशमूर्ती मूर्तिकार राजन झाड यांच्या संकल्पना आणि कलाकौशल्यातून साकारण्यात येत आहे.

पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून भक्तांना देण्यात येणार संवर्धनाचा संदेश

मोठ्या आकाराची मूर्ती असूनही पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा अभिनव प्रयत्न ट्रस्टने केला आहे असे अध्यक्ष राजेंद्र सातार्डेकर सांगतात. गणेश उत्सवात उत्साही सहकारी सचिव संतोष शिंदे आणि खजिनदार अमोल भांबड यांच्यासह ट्रस्टचे तसेच कार्यकर्ते यांचे मोठे योगदान लाभते.

गणेश मंडळांसाठी ‘वन विंडो’ प्रणाली सुरू! मंडप परवानगीसाठी येत्या १३ सप्टेंबरपर्यंत महापालिकेकडे ऑनलाईन अर्ज करा दाखल

पर्यावरणपूरक विचारांची नवी दिशा देणारा उत्सव

हीरक महोत्सवाच्या या ऐतिहासिक पर्वात परंपरा, भक्ती, अध्यात्म आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर मिलाफ साधण्याचा प्रयत्न तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टने केला आहे. गेल्या अनेक दशकांची गणेशोत्सवाची परंपरा पुढे नेत यंदाचा उत्सव सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणपूरक विचारांची नवी दिशा देणारा ठरणार आहे असे सचिव संतोष शिंदे सांगतात.

मूर्तीची संकल्पना ज्योतिबाच्या रूपावर आधारित गणेशोत्सव

यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या गणेशमूर्तीची संकल्पना कोल्हापूर ज्योतिबा रूपावर आधारित आहे. या संकल्पनेमागील धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संदेश ट्रस्टने सध्या गोपनीय ठेवला आहे. त्यामुळे या अनोख्या संकल्पनेचा उलगडा गणेशभक्तांना प्रत्यक्ष दर्शनाच्या वेळीच होणार आहे, असे राजेंद्र सातोंडकर यांनी सांगितले.

Ganeshotsav 2026: डोंबिवलीत पर्यावरणपूरक पंचगव्य गणपतीची पर्वणी; घरच्या घरी करता येणार विसर्जन

‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’चा केला जयघोष

गुलालाची उधळणकरीत येतील भक्तजन ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करीत ज्योतिबाला गुलाल, खोबरे, खारका उडवीत आणि श्रींना दवणा अर्पण करीत दर्शन सोहळ्याचा लाभ घेतील हे मात्र ओघाने आलेच. कोल्हापूर मुंबईकर भाविक ‘सासन काठ्या’ घेऊन दर्शनात आस्थेने सहभागी होण्यासाठी येतानाचे दृष्य ही पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. तसेच दर रविवारी जोतिबाचे खेटे घालण्याची परंपरा असल्याने काही भाविक देवाला ‘खेटे’ घालण्याची परंपरा येथेही करतात का हे पाहण्याचा योग येऊ शकतो, असे भाविकांचे म्हणणे आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: यंदा लालबागमध्ये गणेशमूर्तीचे विशेष आकर्षण काय आहे?

    Ans: यंदा २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती हे लालबाग गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

  • Que: गणेशमूर्तीची संकल्पना कोणी केली आहे?

    Ans: मूर्तिकार राजन झाड यांच्या संकल्पना आणि कलाकौशल्यातून ही मूर्ती साकारली जात आहे.

  • Que: यंदाचा गणेशोत्सव विशेष का आहे?

    Ans: तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट यंदा आपले हीरक महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.

Web Title: Mumbai ganeshotsav 2026 tejukaya sarvajanik ganeshotsav trust to create a 22 foot tall eco friendly ganesh idol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • ganeshostav
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
3

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
4

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.